रायगडावरील या पायरीचे महत्व तुम्हाला माहित आहे का? जाणून आश्चर्याचा धक्का बसेल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

महाराष्ट्र या महाराष्ट्राची ओळख ३५० वर्षापूर्वी अवघ्या जगाला झाली ती सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांनी उंचच उंच कठाड्यानी, कडेकपाऱ्यांनी आणि अभेद्य अशा गढ कोटानी. गेले कित्येक वर्ष सेवेची लाखो उदाहरण आपण पाहात आलोय.

पण ३५० वर्षांपूर्वी सेवा काय असते याच जगाच्या पाठीवरच सर्वात आदर्श उदाहरण या महाराष्ट्राच्या मातीने पाहिले आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बांधायच ठरवल. महाराजांनी हे काम हिरोजी इंदुलकरांवर सोपवलं आणि महाराज मोहिमेवर निघून गेले.

त्यावेळी हिरोजी इंदुलकर स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते. खुप मस्त बांधकाम कौशल्य त्यावेळी त्यांच्याकडे होत. हिरोजी यांनी काम सुरू केले. जेवढ शक्य होईल तेवढ कौशल्य पणाला लावून स्वराज्याची राजधानी उभी करण्यासाठी ते प्रयत्न करत होते.

एक एक काम पूर्ण होत होत. पण त्याच वेळी पैसा संपला हिरोजी ह्यांना काही कळेना काहीही करून पैसे आणावा लागेल. स्वराज्याची राजधानी करावी लागेल. महाराजांनी माझ्यावरती सोपवलेल काम थांबता कामा नये.

म्हणून हिरोजी यांनी स्वतःचा राहता वाडा विकला, शेती विकली, घरदार विकून पैसा जमा केला आणि स्वराज्य उभे करायला पुन्हा एकदा नव्यान सुरुवात केली. राणीवसा, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, हत्ती तलाव, महादरवाजा हे सगळ काही हिरोजी नी अवघ्या अडीच वर्षात बांधून पूर्ण केल.

ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती बांधकाम पाहायला गेले. त्यावेळी हिरोजी यांचे काम पाहून महाराजांचा विलक्षण अभिमान वाटला. हिरोजीच राजांनी तोंड भरून कौतुक केल.

पुढे ६ जून १६७४ साली महाराजांच्या राज्याभिषेका वेळी महाराजांनी हिरोजीना विचारल. हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला हिरोजी तुम्हाला बक्षीस म्हणून काय हवय. त्यावेळी हिरोजी बोलतात काही नको राज.

महाराज बोलतात हिरोजी स्वतःचे घरदार विकून राजधानीचा गढ तुम्ही बांधला तुम्हाला बक्षिस म्हणून काहीतरी मागावच लागेल. राजांच्या या हट्टापायी हिरोजी बोलले तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे या मग मी काहीतरी मागणार आहे.

त्यानंतर महाराज जगदेश्वराच दर्शन करण्यासाठी मंदिरात निघाले. त्यावेळी बाहेर हिरोजी हातात एक दगड घेऊन उभे होते. राज एकच मागण हाय तुमच्याकड तुम्ही म्हणाला होता काहीतरी बक्षीस म्हणून माग हा दगड या पायरीवर लावण्याची अनुमती द्या. त्यात दगडावर माझं नाव कोरले आहे राज.

राजांना आश्चर्य वाटल सोने-चांदी, जमीन जुमला काहीच नाही मागितल. मागून काय मागितल तर एका दगडावर नाव कोरण्याची अनुमती. राजांनी विचारल हिरोजी का? त्यावर हिरोजी बोलतात. राज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनाला याल. जाताना तुमचा पाय या पायरीवर पडेल.

तुमच्या पायाची पायधूळ या पायरीवर म्हणजे माझ्या नावावर सतत अभिषेक करत राहील. राज एवढ भाग्य फक्त पदरात टाका. सेवा काय असते तर याच जगाच्या पाठीवर सर्वात आदर्श उदाहरण असलेली ही पायरी आजही किल्ले रायगडावर ती अस्तित्वात आहे.

त्या पायरीवर काही अक्षर कोरलीत ती अक्षर आहेत स्वराज्याचे त्या वेळेत बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर यांची. ती अक्षर आपल्याला संदेश देतात सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर हिरोजींन सारख्या तमाम निस्वार्थी मावळ्यातून हे स्वराज्य उभ राहिलं होत.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *