बाबा प्लीज मला आग्रह नका करू लग्नाचा- एक हृदयस्पर्शी कथा.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

बाबा आज पिऊच्या शाळेत गॅदरिंग आहे तुम्ही याल ना बघायला. दोन पास मिळाले आणि सगळ्या मुलांचे आई-बाबा दोघेही आलेले पाहून मी एकटीच गेलेली पाहून हिरमुसला होतो तो. स्वराने आग्रह करत सासऱ्यांना विचारले. वामन रावांची तब्येत तर फारशी बरी नव्हती.

पण स्वराचा आग्रह त्यांना मोडवेना आणि ध्रुवचा हिरमुसला चेहराही डोळ्यासमोर आला. येतो अस म्हणत वामनराव तयारीला लागले. ध्रुवचा डान्स मस्त झाला, डान्स करताना त्याचे डोळे आईला व आजोबांना शोधत होते. हे पाहून वामन रावांना गंमत वाटत होती.

गॅदरिंग संपली आणि मुले आप-आपल्या आई-बाबांकडे पळाली. हे पाहतांना ध्रुव हिरमुसला होतोय असे वामनरावांना वाटून गेले. घरी परत आल्यावर ध्रुव जेऊन झोपला आणि वामनरावांनी स्वराला हाक मारली. स्वरा ये स्वरा काय बाबा म्हणतच स्वरा लगेचच आली.

बस इथे मी इतके दिवस काय सांगतोय याचा विचार केला का अशी किती दिवस एकटी राहणार आहेस. तरुण आहेस अजून, अख्खे आयुष्य पडले तुझ्या समोर, ध्रुवचा विचार कर ना जरा त्याला नसेल वाटत का बाबांची कमी. एका दमात वामनरावांनी आपल्या मनातील विचार बोलून दाखवले.

अर्थात ही आजची काही पहिली वेळ नव्हती. वरुणच्या आकस्मित निधनानंतर दोन-तीन महिन्यानंतरच वामनरावांनी स्वराला ये सुचवले होते. स्वरा यावर नेहमी प्रमाणे नाही नाही करत उठून जाऊ लागली. आज मात्र वामनरावांनी सोक्षमोक्ष लावायचाच असे ठरवले होते.

बस खाली, आज मला तुझे उत्तर हवे आहेचे. आवाज वाढवून जरा वामनराव म्हणाले. नाही बाबा मी पुन्हा लग्नाचा विचार करणार नाही आणि ध्रुवला तुम्ही आहात ना बाबा तुम्ही तेवढेच लाड करता त्याचे, अग पण बाबा ते बाबा आजोबाला नाही सरत त्याची आणि मी असा किती दिवस पुरणार आहे तुम्हाला.

स्वराला समजावत वामनराव म्हणाले शेवटी नाईलाजाने स्वरा म्हणाली, बाबा आता खर सांगू का? माझी नोकरी व्यवस्थित आहे त्यामुळे पैशाची काळजी नाही. ध्रुव सारे नीट करू शकते आणि वरूनला शब्द दिला आहे ती शेवटपर्यंत तुमची नीट काळजी घेईल म्हणून. तेव्हा बाबा मला प्लिज आग्रह करू नका लग्नाच असे म्हणत स्वरा निघूनच गेली आतल्या खोलीत.

दुसऱ्या दिवशी थोडेसे डोके दुखत असल्याने स्वरा कामावरून जरा लवकरच परतली. कुलूप उघडून घरात येणार दोस्तीला बाबा व त्यांचे मित्र रमेश राव बोलतांना ऐकू आले. विषय विषय तिचाच होता म्हणून ती तिथेच थबकली. बाबा म्हणत होते अरे आता कस समजावू या पोरीला माझ्यामुळे दुसऱ्या लग्नाला नाही म्हणते बघ.

मला माहित नाही कारे तिला संसाराची किती आवड आहे ते तरुण आहे अजून आणि पैसे असले की सगळे होते का? बाकीच्या गरजा काही असतात की नाही. मी पाहतो किती तरी वेळ तिच्या बेडरूमचा लाईट चालू असतो किंवा हॉलमध्ये येरझारा घालत असते नुसती. मला कळते रे तिला वरून ची खुप उणीव जाणवते.

मी पडलो पुरुष माणूस आता हे कसे समजावून सांगू तिला, हा रमेश रावांनी नुसताच होकारा दिला. त्यांनाही काही कळेना यावर काय बोलावे ते. वामन रावच शांतपणे पुढे बोलू लागले.

माझ्यामुळे तिची जर आडकाठी होत असेल तर आता माझ्यापुढे मरणा शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. अरे काहीतरीच काय बोलतोय रमेश राव एकदम ओरडलेच. काय करू रे मग खूप विचार केला यावर ती मला वृद्धाश्रमात पण जाऊ देणार नाही.

एकटे राहू देणार नाही आणि माझ आयुष्य किती आहे कोणास ठाऊक तोपर्यंत तिला अशीच झुलत राहतांना पाहू का? आता बाहेर स्वराच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती घाईघाईने दार उघडत आत येत म्हणाली बाबा तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे.

पण पुन्हा तुमच्या म-रणाचा विषय नाही हा काढायचा. नाही बाळा तू सुखी झालीस तर अजून ५० वर्ष जगेन बघ. भरल्या डोळ्यांनी वामनराव म्हणाले, आता यावर एक झक्कास चहा होऊन जाऊ द्या. वातावरण हलके करत हसतच रमेश रावांनी फर्माईश केली.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *