हातात लग्नाची पत्रिका ठेवत ती म्हणाली.. लग्नाला नाही आलास तरी चालेल, पण मला विसरून जा.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

हॅलो ऐकतेस का काव्य तू बोलली नाही तरी चालेल पण निदान ऐक तरी पलीकडून काहीच आवाज आला नाही. तसा विराज थोडा कावरा बावरा झाला. त्याला शेवटच भेटायच होत. पण तिच्या मनात काहीतरी वेगळच होत. विराज काव्याच्या आठवणीत फार खचून गेला होता.

भुत काळातलेते सर्व क्षण त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले. अवचित एका सकाळी विराजला ती भेटली गोड गुलाबी ओठावरती नाजूक कळी उमलेली, पापण्यांच्या तरुणांमध्ये सारा निसर्ग सामावलेली. कानातले दोन नाजुकसे झुंबर तिच्या सुंदर चेहऱ्याला पहारा देत होतव. केसात माळलेला मोगर्‍याचा गजरा सुगंधाची उधळण करत होता.

तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ ओठावर स्मितहास्य झळकत होत. काहीच न बोलता खूप काही सांगणारा तिचा चेहरा काळजात घर करत होता. विराज भानावर आला आणि त्याने तिला शेवटचा कॉल करायच ठरवल हॅलो काव्या तू बोलत का नाहीस. पण प्लीज भेटायला ये तू भेटायला आलीस तर पुन्हा नव्याने सुरुवात होईल आणि नाही आलीस तर शेवटचा कॉल असेल. मी आणखी एक तास वाट पाहतो ओके बाय.

डोळ्यातले अश्रू लपवत काव्याने फोन ठेवला आणि ती घराबाहेर पडली तिने मनाशी ठरवल विराजला भेटून समजावून सांगायच आणि त्याच्या आयुष्यातून कायमच निघून जायच. तिने मेसेज टाईप केला मी येते, मी येते विराजची मॅसेज टून वाजली आणि त्याला पहिल्या मेसेज ची आठवण झाली पहिल्या भेटीनंतर दोन दिवसांनी तिचा मेसेज आला होता.

दोन चांदण्यांच्या मध्ये पाच शब्द शुभ सकाळ अस वाटल कानातून नाजुकसे झुंबर घालून ती समोर उभी आहे. तिच्या एवढ्या शब्दाने विराजचा दिवस आनंदात गेला खरच काय जादू असते प्रेमाची, सौंदर्याची की शब्दाची.

आणि त्या भेटी नंतर दोन दिवसांनी तिचा मेसेज आला होता शब्द शुभ सकाळ झुंबर घालून ही समोर उभी आहे तिच्या या शब्दांने वीर आजचा दिवस आनंदात गेला खरच काय जादू असते. वीराज तिच्या सौंदर्याच्या आणि ती त्याच्या शब्दांच्या प्रेमात पडली होती.

विराज एक शब्द वेडा माणूस त्याच्या शब्दात सांगायचे तर माझ्या शब्दांना काव्याची प्रेरणा मिळाली आणि कविता तयार होत गेली. तिची कविता, तिच्यासाठी कविता, जगण आणि मरण फक्त माझी कविता. ती वाचायची मला आणि माझ्या कवितेच्या प्रत्येक शब्दाला आणि विचारायची न समजल्यागत ही कविता कोणावर आहे.

माझ्या निशब्द भावनेतून तिला उत्तर मिळायचे. तिचा माझ्यावर आणि माझ्या शब्दावर अधिकार होता कारण तिच्या शिवाय शब्द आणि शब्दा शिवाय मी शक्यच नव्हतो. मी तिला म्हणायचो माझ्या प्रत्येक शब्दावर अधिकारी तुझाच आहे. ही भावनांची कहाणी प्रत्येक कविताच तूच आहे काव्या कवितेपासून दूर गेली. पण विराजला कधी कळलेच नाही.

कोरड्या आभाळाकडे नजर ठेवून विराज आता फक्त तिची वाट पाहत होता. अजून एक तास संपलेला नव्हता म्हणून त्याच्या मनात आशा कायम होती. विराजला आनंद झाला काव्या आली होती. कदाचित आता ही शेवटची भेट, हातात लग्नाची पत्रिका ठेवत ती म्हणाली लग्नाला नाही आलास तरी चालेल पण मला विसरून जा.

विराज थक्क झाला, तिच्या हाताच्या मेहंदी कडे पाहत म्हणाला व्यवहार छान जमतो तुला मला कधीच जमला नाही. मलाही मान्य आहे शब्दांनी पोट भरत नाही भरता फक्त मने. प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे पण तू कधी विचारलेच नाही वाटला आता तरी विचारशील. स्वतःला सावरत काव्याने विचारल काय विचारायच?

संसार कसा करायचा, तुला नोकरी कधी लागणार, संसार करण्यासाठी शब्द नाही. पैसा लागतो रे माझा निर्णय ठरला आहे त्यात बदल होणार. तारुण्याच्या उंबरठ्यावर तुझ्या प्रेमात पडण्याची चूक माझ्याकडून झाली असेल पण लग्न करून मी पुन्हा चुक करणार नाही.

काव्याला सुखद धक्का देण्याचा विचार विराजचा होता. पण विराज निचल झाला, शब्दाचा किमयागार आज नि:शब्द झाला. व्यवहार आणि भावना मध्ये व्यवहाराचा विजय झाला. विराजच्या मनात मात्र शब्द जमा होऊ लागले त्याच्या मनात सहज विचार आला शब्दाने माणसे कुठे बांधाता येतात बांधता येतात फक्त मने.

सकाळी उमलेल सुंदर फूल दुपारच्या तप्त उन्हात कोमेजून गेल. फुलांची निखारे काळजात ठेवून जगताना आता भान ठेवावे लागणार. मोगऱ्याच्या सुंदर फुलावर फुलण्याचा गुन्हा आता करता येणार नाही. विराजने मनातल्या विचारांना थांबवले आणि त्याच्या काळजात शब्द बाहेर पडले. जिथे असशील तिथे सुखी राहा तुझ्या परतण्याची मी वाट पाहणार नाही.

कारण कोणत्या स्वप्नात जगण्याचा अधिकार मला नाही तो अधिकार तू हिरावून घेतला आज. म्हणून एकदा स्वप्नांची राख रांगोळी पाहता येणार नाही काव्याला अखेरचा निरोप देताना विराजही व्यवहार शिकला.

नोकरी लागल्याची आनंदाची बातमी काव्याला सांगितली असती. तर विराजला गमावल्याचे दुःख तिला आयुष्यभर सल्ल असत आणि काव्याला दुःखी करण्याचा विचार विराजच्या मनात नव्हता. कारण अजूनही प्रेमाच्या भावनेला व्यवहाराचा स्पर्श नव्हता.

काव्या पाठमोरी झाली, तसे विराजच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि विराजच्या मनातल्या विचारांनी मात्र ताबा घेतला. आयुष्याच्या पटलावरती किती माणस भेटतात पण विसरता येत नाहीत ते पहिल प्रेम. आणि करता येत नाही शेवटच प्रेम.

फुले फुलतात मने भ्रमित होतात आणि प्रेमात पडतात माझे पहिले प्रेम तू आहेस, कधीच विसरता येणार नाही. पण शेवटच प्रेम नाहीस माझे शेवटचे प्रेम तू दिलेला व्यवहार आहे. म्हणून पून्हा आता प्रेमात पडायची इच्छाच राहिली नाही. तुझ्या व्यवहाराला घेऊन सुखाने जगेल पण माझे शेवटचे प्रेम शेवटचेच ठरेल.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *