हृदयस्पर्शी कथा- लग्न होऊनही ती नवऱ्याला अंगाला हात लागत लावू देत नव्हती कारण जाणून डोळ्यात पाणी येईल. भाग-२

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

त्यानंतर राधा मोहन च्या आई बाबांची खूप छान प्रकारे जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण मोहनचे गुपित करारानुसार अंतर ठेवून राहत असते आणि मोहन पण. मधल्या काळात महत्त्वाची काम खोळंबली असल्याचे निमित्त करून मोहनचे आई वडील आपल्या गावच्या घरी राहायला निघून जातात.

जेणेकरून या दोघांनाही एकांत मिळू शकेल एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळेल. आता तीन महिन्यानंतर, राधा मी निघतो ऑफिसला जायला दरवाजा बंद करून घे आतून नीट मी कचऱ्याचा डबा बाहेर ठेवलाय. कचरावाला घेऊन गेला तर ठीक. नाहीतर ऑफिसला जातानी तो डबा आत मध्ये ठेव. आणि हो दरवाजाची केली शेजारच्या काकूंकडे ठेवून जा.

राधा म्हणते हो मी करते सगळे तू आधी आत मध्ये ये आणि चहा बिस्कीट खाऊन घे आणि मी पण चपाती भाजी बनवलली आहे तर तू पण डबा घेऊन जा. मोहन आश्चर्याने म्हणाला डब्बा, माझ्यासाठी अग कशाला उगाच मी खाल्ल असत बाहेर काहीतरी.

राधा मानले ठीके ना माझ्यासाठी बनवतेस डब्बा मी तर त्यात तुला थोड थांब तू घेऊन जा डब्बा मोहन म्हटला चालेल पण लवकर दे उशीर होतोय मला. संध्याकाळी काही आणायच का बाजारातून मला मेसेज कर मी घेऊन येतो. राधा म्हणाली काही नको मी आज लवकर येणार आहे घरी तर मी आणेल सर्व.

काही राहिले तर मी तुला फोन करून सांगेल. तू मला जमल तर लवकर घरी ये मला काही महत्वाचं बोलायच. काग काय झाल सगळ ठीक तर आहेना. राधा म्हणाली हो रे जास्त प्रश्न विचारत बसू नको तुलाच उशीर होईल ऑफिसला जायला संध्याकाळी बोलू आपण.

मोहनला काहीच कळत नव्हत की काय चाललय राधा त्याच्याशी अशी का वागतेय ते. लग्नानंतर ऑफिसमधे जाताना कधी चहा बनवून दिला नव्हता ना कधी डबा बनबुन दिला नव्हता. त्याला वाटले की आता आई-बाबा नाहीये तर ही आपला निर्णय सांगणार असेल.

तो त्याचा विचारात ऑफिसला निघून गेला पण त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. सारखा विचारात होता की, आता हे सगळे वेगळ होणार, आपल्याला वेगळ व्हायला लागणार, पुढे कसे होणार, आहे आईबाबांना काय वाटेल.

समाजातील लोक काय म्हणती, आई बाबा काय विचार करतील, त्यांना हा धक्का सहन होईल का? माझ्याबद्दल लोकांच्या मनात प्रतिमा निर्माण होईल का? यासारख्या असंख्य प्रश्नांनी मोहनच्या मनात काहूर माजल होत.

खरंतर मोहना राधा आवडायला लागली होती. फक्त स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी तिच्या इच्छा आकांक्षा का मारायचा असा विचार करून राधाचा काही निर्णय असेल तो स्वीकारायचा आणि तिला यातून मुक्त करायचे असा विचार करत तो ऑफिसमधून घरी निघाला.

राधा अगोदरच घरी आली होती, मोहन घरी पोहोचल्यावर तिने त्याला पाणी, चहा आणून दिला आणि त्याच्यासमोर बसली. मोहनने निमुटपणे समोर आलेला चहा इच्छा नसतानाही संपवला. त्यानंतर काही वेळ पिन ड्रॉप सायलन्स म्हणतात ना तशी शांतता पसरली होती. दोघांच्या तोंडून शब्द निघत नव्हते. मात्र एकमेकांकडे चोरून कटाक्ष ठेऊन कोण बोलायला सुरुवात करेल याची वाट बघत होते.

शेवटी मोहनने कोडी फोडली, तू काहीतरी सांगणार होतीस ना महत्त्वाच. मला तुला सांगायच होत की, तू माझ्यासाठी. मोहन म्हटला काय झाल अशी गोंधळली का? काही असेल तर सांग पष्ट मला नाही वाईट वाटणार तशी माझ्या मनाची तयारी आहे. जे काही असेल ते स्वीकारायची.

नाही रे गोंधळी कुठे मग बोल ना. मोहन मला माफ कर मी खूप त्रास दिला आता पर्यंत पण आता नाही देणार जे सुख तुला माझ्याकडून अपेक्षित होत. त्यापासून तुला वंचित ठेवल मी, ठीक आहे त्यासाठी का माफी मागते. मी पण काही प्रमाणात तर जबाबदार आहेस ना.

राधा म्हणाली नाही रे तुला समजून घ्यायला पाहिजे होत पण आता नाही तुला जर वाटल असेल की हा त्रास कमी व्हावा तर तुला एक काम करावे लागेल. त्याच्या मनाची घालमेल सुरू होती काय काम, राधा म्हणाली मोहन तुझी मला आयुष्य भरासाठी सहन करायची तयारी आहे का तुझी. मी नाही रे सोडून जाऊ शकत तुला.

मोहन म्हणाला काय म्हणाललीस तुला मी सहन काय बोलाव नाही सुचते तू खर सांगतेस. मी तर कधीपासून वाट पाहतोय या क्षणाची पण तू आज हे सगळ कस झाल. मला वाटले की, तू आज मला तुझा निर्णय अंतिम निर्णय सांगणार असशील. हो अरे राधा म्हणाली गेल्या काही दिवसांपासून मी तुला सांगायचे ठरवले पण हिम्मत होत नव्हती.

जवळपास तीन महिने तुझ्या सोबत घालवल्यानंतर जर मला कोणीतरी राजकुमार मिळेल, श्रीमंत मुलगा मिळेल म्हणून मी तुला सोडून गेले तर माझ्या इतकी मूर्ख व्यक्ती नसेल. ज्या व्यक्तीला मी लग्नानंतर तिसऱ्या दिवशी माझ्यापासून दूर जायला सांगितल, मला स्पर्श करायची परवानगी नाकारली तर तुमची इच्छा काय तर ते ही अट मान्य केलीस तू.

या एकंदर दिवसात न कधी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला ना कधी माझ्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केलास. मनात आणल असत तर तू सर्व करू शकला असता पण नाही तू अस काही केल नाहीस. मी कधी स्वतःहून तुझ्या सोबत काहीच नाही बोलले तरी तू न चुकता माझ्याशी बोलायचा. मला तुझ्या दिवसभरात घडलेल्या सर्व घटना सांगायचा.

लग्ना नंतर मी माझ्या पगारातला एक रुपया घरात वापरला नाही. ना कधी तुला कसले गिफ्ट आणून दिले पण तु मला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट न सांगता आणून दिलीस.

प्रत्येक सनावराला माझ्यासाठी खास भेटवस्तू आणली. त्यामध्ये महागड्या साड्या, ड्रेस, सोन्याचे दागिने इत्यादी. मला कधीही माहेरची आठवण सुद्धा येऊ दिले नाही. मला काय काय आवडत ते माझ्यावर दादा कडून माहिती करून घेतल आणि दररोज माझ्या आवडीचा नवीन नवीन पदार्थ आणून देत असायचा.

पुरुषांच्या अंगी सय्यम जास्त असतो अस म्हणतात त्याचा अनुभव मी स्वतः घेतला. सुरुवातीला मला तुझ्या सोबत एकत्र राहायची भीती वाटायची पण जसजसे दिवस जात होते तसे मी तुला अगदी जवळून ओळखायला लागले. तुझ्यासोबत स्वतःला खूप सुरक्षित समजू लागले. मोहन मी आता खरच तुझ्या प्रेमात पडायला लागली रे मी खूप मोठी चूक करता करता वाचले.

तु एक विश्वासू मित्र, जबाबदार पती, उत्तम मार्गदर्शक म्हणून सहार्थ आहेस आणि मला तुझी आयुष्य भरासाठी साथ हवी आहेस देशील का रे? माझ्या आतापर्यंत सर्व चुकांवर पांघरूण घालून मला सोबत करशील कारे प्लीज नाही नको म्हणू. आयुष्यात पहिल्यांदाच कोणाच्या तरी प्रेमात पडले मला अस या अनोख्या जगात डूबुन राहू दे. बोलणारे करशील ना असेच प्रेम नेहमी.

मोहन म्हणाला बाप रे हे सगळ अनापेक्षित आहे माझ्यासाठी खरच मला कधीच वाटल नव्हत की कधी तू माझ्या प्रेमात पडशील. म्हणून तर तुला पहिल्यांदा पाहिल तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलो जरुरी नाही की तुही त्याचवेळी माझ्यावर प्रेम करावस. पण आता मी तुझ्यासाठी हृदयात जागा निर्माण करू शकलो हेच माझ्यासाठी खूप काही.

खर तर तू जेव्हा तुला आवडत नाही म्हणून सांगितल तरी माझ्या सोबत एकत्र राहिलीस आणि हो तू मगाशी म्हणलीस तर मी खुप काही करू शकलो असतो. पण नवरा या अधिकाऱ्याने.आपल्या वन रूम किचन मध्ये राहताना रात्री झोपताना आपल्या दोघांमध्ये केवळ एक हाताच अंतर असायच.

पण म्हणतात ना जेव्हा मालक चोराच्या घरात तिजोरीच्या चाव्या देतात. तेव्हा तो चोरही त्या ठिकाणी चोरी करायला धजत नाही. तसेच त्यावेळी माझही व्हायच, पण तु भलेही मला पसंत करत नव्हतीस पण तेवढयाच विश्वासाने माझ्या सोबत राहत होती. त्यामुळे तुझ्या बद्दल माझ्या मनात कोणताही वाईट विचार आला नाही. तुझ्या मनाविरुद्ध काहीच करणार नव्हतो आणि करणार नाही.

मला खात्री होती मी तुला जबरदस्तीने नाही तर प्रेमाने जिंकू शकतो. जबरदस्ती करून मी तुझे फक्त शरीर मिळवले असत ग पण तू मला फक्त शरीराने नको होती तर पूर्ण तना मनाने पाहिजे होतीस म्हणून मी तुला

जिंकण्यासाठी तुझ्यावर प्रेम करत राहीलो आणि मला वाटत आहे की मी आता त्यात यशस्वी झालोय आणि हो मला नक्कीच आवडेल तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करायला, यापुढे आपण खूप आनंदाने संसार करून खूप आनंदाने.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *