हृदयस्पर्शी कथा- लग्नाच्या काही तास अगोदर नवरदेवाला व घरच्यांना कळले की नवरीला कोडाचे डाग आहेत पुढे जे घडले ते..

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

लग्न अगदी महिन्यावर आलं होतं पत्रिका छापून आलेल्या खरेदी अर्धी अधिक झालेली. मुलीचे आई बाबा मुला घरी अचानकच आले. मुलाकडची मंडळी अर्थातच बावचळली पण स्वागत मात्र चांगलंच केल त्यांनी होणाऱ्या व्याहांच. मुलीचे आई बाबा चांगलेच अस्वस्थ दिसत होते.

ते पाहून मुलाच्या आईबाबांनी जरा वेळ जाऊ देत अखेर विचारल त्यांना त्यांच्या अशा अचानक येण्याच प्रयोजन. हे विचारल मात्र मुलीची आई गडागड रडू लागली. मुलीचे बाबा खाली मान घालून बसले आणि तेवढ्यात स्वतः मुलगी येऊन पोहोचली. तिला बघून तर मुलाचेच काय पण तिचे स्वतःचे आई-बाबाही चक्रावले.

कारण हे त्यांच्या योजनेत नव्हत आपल्या आई-बाबांकडे आश्वासक नजरेने पहात मुलगी बोलू लागली. आई-बाबा माझ्यामुळे तुमची कुचंबणा झालेली मला नको होती म्हणूनच मी धावपळ करत येथे आले. त्यानंतर आपल्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांकडे बघत ती बोलली मला खरच माहीती नव्हत.

या बद्दल कारण आपल्याला आपली स्वतःची पाठ दिसू शकत नाही ना. त्यामुळे नाही दिसला मला पाठीवर च बरोबर मध्यभागी असलेला तो तो एक एक पांढरा डाग. साधारण एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराचा तो पांढरा डाग.

परवा माझ्या आईला दिसला तो माझ्या केसांना शिखकई लावून देताना आम्ही वेळ न दवडता लगेच डॉक्टरांकडे गेलो आणि आम्हाला कळले की कोडाचा डाग आहे तो. जो दिवसाकाठी थोडा थोडा वाढत जाऊ शकतो आणि कदाचित पूर्ण अंगही भरू शकत माझ त्या कोडाने हे आम्ही तीन डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेतले.

आईना खात्री करून घ्यायची असेल तर मी आतल्या खोलीत यायला तयार आहेत. इतक बोलून झाल्यावर मुलीने मुलाकडे पाहिल आणि त्याला सॉरी म्हणत तिही मान खाली घालुन उभी राहिली. मुलाने त्याच्या आईबाबांनी एकमेकांकडे बघितल आणि मुलगा बोलू लागला.

आपली एंगेजमेंट झाली एकमेकांना आपण अंगठी घातली तेव्हापासूनच आपण एका बंधनात अडकललोय खर तर लग्न म्हणजे औपरीचकता आहे खर तर. केलेल्या करारावर मारलेला एक शिक्का फक्त त्यामुळे आता उशीर झालाय आता तुझ्या पाठीवरच नाही तर दर्शनी भागावर जरी कुठे डाग असता तरी तुला नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

तो डाग वाढत जाऊन तुझ अंग पांढरा होईल पुढे कधीतरी या भीतीने मी आत्ता पासूनच माझ मन कलुषित करून घेण मला पटत नाही. तेव्हा मला खरच ही गोष्ट कळल्यामुळे कण भरही फरक पडलेला नाही. एखाद्याला मनापासून एकदा स्वीकारल्यावर त्याच्या शरीरात उद्भवलेल्या कुठल्याशा दोषामुळे त्याला नाकारण मला अत्यंत चुकीच वाटत.

तेही पूर्णतः कल्पना असताना की मुळात तो दोष हा कुठलाही संसर्गजन्य रोग नाही की १००% अनुवंशीक नाही तो बाकी चांगल्या-वाईट नशिबाचा भाग तर सगळ्यांच्या बाबतीत असतो. त्यामुळे तू आणि आई-बाबा तुम्ही प्लीज लक्षात घ्या मी तरी येथवर येऊन महागारी अजिबात घेणार नाही.

माझे आई-बाबा निसंशय माझ्या पाठीशीच असतील याची मला खात्री आहे. हमसून हमसून रडत होते मुलीचे आईबाबा आता मुलगी एकटीच उभी होती अजूनही खाली बघत पायाच्या अंगठ्याकडे. मुलगा तिच्या आई बाबा कडे जाऊन बसला आणि मुलीला आपल्या जवळ बसायला बोलावल.

त्याच्या आईबाबांनी मुलीच्या खांद्यावर थोपटून मुलाची आई म्हणाली माझ्या आईला पूर्णपणे कोड होत आणि ह्या कारणास्तव जेव्हा माझ लग्न ठरेणा तेव्हा आई बाबांनी आणि घरच्या इतर मोठ्यांनीही निर्णय घेतला की आईने आता पुढे यायच नाही लपून राहायच.

पण मी मात्र ठाम नकार दिला त्या गोष्टीला एकतर ती फसवणूक ठरली असती. कोणाबरोबर केलेली आणि दुसरं म्हणजे ज्या आईने मला इतक्या मायेने वाढवल तिला स्वतःच्या स्वार्थासाठी असा दुजाभाव देण मला पटतच नव्हत. त्यामुळे मी कोणाचाही ऐकल नाही.

ठरवल होत की कोणीतरी नक्की असेल नशिबात माझ्या अशा भाकड समजुती ना थारा देणार नसेल आणि ह्यांच स्थळ आल मला काडीचाही फरक पडला नव्हता. त्यांना माझ्या आईच्या अंगावर कोड असण्याचा अगदी सुखाने चाललाय तीस वर्षांपासून संस्कार आमचा पण या गोष्टीमुळे आदर मात्र प्रचंड वाढत आलाय मला ह्यांचा अगदी कायमच.

आता अभिमान वाटत राहिला कायम वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत योग्य निर्णय घेणाऱ्या त्यांचा वारसा खऱ्या अर्थी चालवणाऱ्या आमच्या लेकाचा. मुलीने जागेवरून उठत भरल्या डोळ्यांनी होणाऱ्या सासुबाईना आणि सासरेबुवांना वाकून नमस्कार केला.

मुलीच्या आई-बाबांनी बसल्या जागेवरूनच हात जोडले. व्याहाना अतिशय समंजसपणे मिटल होत. हे पांढऱ्या रंगाच्या दागाच प्रकरण अगदी नवरात्रीतील तृतीय दिवशीच.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *