हृदयस्पर्शी कथा- लग्न होऊनही ती नवऱ्याला अंगाला हात लागत लावू देत नव्हती कारण जाणून डोळ्यात पाणी येईल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

सकाळची साधारणतः ९ वाजताची वेळ राधा आरशा समोर उभे राहून केस विंचरत असते. तेवढ्यात मागून मोहन सुंदर सुवासिक मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घेऊन येतो आणि तिथेच थांबकतो. राधाला नटून थटून तयार होतांना तिच्या होणाऱ्या शरीराच्या हालचाली, तिचे ते मोहक सौंदर्य तिच्या नकळत अनुभवण्याचा मोह मोहनला आवरत नाही.

जेव्हा राधा तयार होऊन आवरत असतांना मोहन तिच्या समोर उभा राहतो आणि आपल्या हातातील तिच्यासाठी आणलेला गजरा तिच्या केसात माळण्यासाठी थोडा पुढे सरकतो. तेवढ्यात राधा त्याचा हात झटकून देते, त्याबरोबर मोहन च्या हातातील गजरा जमिनीवर पडतो क्षणभर त्याला वाईट वाटत.

पण कदाचित चुकून हात लागुन गजरा पडला असेल असे समजून तो गजरा पुन्हा उचलून तिच्या केसात माळायला जातो तोच. तोच राधा ओरडते तुला एकदा सांगितलेले कळत नाही कारे. मला स्पर्श पण नाही करायचा सांगून ठेवते तुला.

मोहन आश्चर्यचकित होऊन विचारतो काय? हो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. आपल्या दोघांमध्ये अंतर राहू दे. अग पण का? कारण तू मला नाही आवडत. नाही आवडत तर मग लग्न का केलस. अरे मला वाटल होत मुल खूप स्मार्ट असतात. मी तुला टाळायची, तुझा फोन नाही उचलायची, तुझ्याशी बोलायची नाही तेव्हा तुला कळायला पाहिजे होते.

मी तुला पसंत नाही करत तू मला नेहमीच गृहीत धरून चालत आलास ही तुझी चूक आहेस. माझी ह,माझी कसली चूक होती. तू तर सगळ्या नातेवाईकांना समोर या लग्नाला संमती दिलेली. विवाह ठरल्यापासून ते पार पडेपर्यंत जवळपास आठ महिन्यांचा कालावधी होता. एवढा वेळ पुरेसा होता तुझ्याकडून विचार करायला.

द्यायचा होतास लग्नाला नकार, का नाही दिलास? मी कशी देणार होती नकार मी मुलगीये तु का नाही नाकारलेस हे नात.
मोहन म्हणाला अरे मी का नाकारणार होतो आणि मी म्हणतो मी का नकार द्यायला पाहिजे होता. मला आपल लग्न मोडाव अस कधीच वाटल नव्हत.

उलट मी तर खूप खुश होतो तुमच्यासारख्या सुशिक्षित कुटुंबाबरोबर आमच नात संबंध जुळतय म्हणून. पण लग्न ठरल्यापासून तुझ वागण बघताच मला थोडा संशय आलेलाच की, तुला हे लग्न मान्य नाहीये. तस मी तुला साखर पुड्याच्या पाच दिवस अगोदरच विचारल होता.

तुला हे पण सांगितल होत की, जर तुझ्या मनाविरुद्ध हे लग्न होत असेल तर सांग मी सगळा रोष माझ्यावर घेऊन मी मोडतो. त्यावेळी तोंड मिटून गप्प का बसलीस का नाही सांगितल की मला नाही करायच लग्न आणि आज लग्न होऊन दोन दिवस झाल्यावर सांगतेस की मला साधा स्पर्श नाही करायचा. काहीच कस नाही वाटत तुला.

राधा म्हणाली तेव्हा खूप उशीर झालेला आणि आता तुझ्या मते आता योग्य वेळ आहे का? तसही मी तुझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो नव्हतो किंवा तुझ तुझ्या दुसऱ्या कोणाशी तुझ्या मनाविरुद्ध लग्न ठरलेल असताना मी येऊन तुला पळवून तर आणल नव्हत ना.

मला एक सांग तू काय आंधळी होतीस काय. मी तुला थांबवाव. तुला अस का वाटल की मी लग्न मोडाव. पूर्वीच्या काळी मुला मुलींची संमती नसताना लग्न व्हायची ना, चांगले डिगबर पोर होऊन संसार फुलायचे ना. आणि असं काय वाईट आहे माझ्यात की मी तुला आवडत नाहीये.

राधा म्हणाली तुला माझा नवरा म्हणून स्वीकारण्यासाठी मला तुझ्याबद्दल त्या भावना, फिलिंग कधीच नव्हत्या आणि आजही त्या भावना निर्माण होत नाहीयेत मी तरी काय करू. काय मग पुढे काय? मला थोडा वेळ दे, थोडे दिवस आपण एकत्र राहून बघु नाहीतर मग वेगळे होऊ. काय बोलतेस तू हे सगळ बोलताना माझ्या आई बाबांचा तरी विचार कर.

राधा म्हणाली हो मला तुझ्या कुटुंबाबद्दल काहीच हरकत नाही. तुझे आई-बाबा ताईकडून परत आल्यावर आपण सोबत राहू पटल तर ठीक नाहीतर मग निर्णय घेऊ.मोहन1 म्हटला वा किती सोपना. तुला वाटल म्हणून लग्न केल, तुला वाटत म्हणून काही दिवस एकत्र राहायच आणि आता तुला नाही पटत तर वेगळ व्हायच. अगदी सहजपणे बोलून गेलीस फार छान हे सगळ्यात मी कुठे आहे.

हे सगळ बोलताना तू थोडा तरी माझा माझ्या घरच्यांचा विचार केलायस का? माझ सोड पण तुझ्या आई पप्पांच्या चेहराही डोळ्यासमोर नाही आला तुझ्या. निधन विवाह प्रसंगी आपल्या आशिर्वाद देण्यासाठी जमलेल्या हजारो लोकांचा तरी विचार करायचा.

राधा म्हणाली तू मला पुढे काय करायच विचारलं म्हणून मी वेगळ होऊ अस बोलले. मला ही आपल्या दोघांच्या कुटुंबीयांची काळजी आहे. मग तू अस कस बोलू शकतेस तुला माहिती आहे माझे बाबा आमच्या तालुक्यात प्रसिद्ध व्यवसायिक आहेत.

गावी कळलं की आपण वेगळे राहतो. तर त्यांना गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आज जे ग्रामस्थ आदर-सन्मान देतात. तेच उद्या नाही नाही त्या तरेने बोलतील.

राधा बोली अरे मी कुठे म्हणतेय की लगेच वेगळे होऊ आपण. पण आपण नावापुरते नवरा-बायको म्हणून आयुष्यभर एकाच घरात राहायच का? लोकांना दाखवण्यासाठी का आपण लग्न केलय. समाज काही म्हणेल म्हणून आपण आपल्या भावनांना दाबून टाकायच.

जर आपल्या मनात तुझ्यासाठी काही माझ्या मनात भावनाच तयार होत नाही तर मी काय करू? जबरदस्तीने मी एखाद्या नात्यात बांधून नाही राहू शकत. मोहन म्हणाला तू आपल नात स्वीकारलाच नाही. तर तुझ्या मनात भावना कशी निर्माण होईल, सगळ्या गोष्टी प्रथम दर्शनी आवडली ना तस नाहीये.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास पुरेसा वेळ घेतल्यास नक्कीच सर्व नाती हवीहवीशी वाटतील. राधा म्हणाली मान्य आहे मला मी प्रयत्न करेन पण मला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही चालणार. मोहन म्हणाला ओके माझ्याकडून कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा चुकीचे वर्तन घडणार नाही याची मी खूप पूर्ण जबाबदारी घेईन.

पण तुझ्याकडून एक वचन हवय मला की या सर्व गोष्टी आपल्या आई बाबांना कळू देऊ नकोस. कारण ते नाही सहन करू शकणारे सगळ प्लीज. राधा म्हणाली हो मी नक्कीच प्रयत्न करेन आपल्यातला अनोखा करार गुपित ठेवण्याचा. तु सुद्धा मी सांगितलं गोष्टी ध्यानात ठेव म्हणजे झाल.

त्यानंतर राधा मोहन च्या आई-बाबांची खूप छान प्रकारे..

भाग-२ साठी कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *