या महिलेने प्रेमविवाह केल्यानंतर तिच्या नवऱ्याचे दुसरे रूप पाहून तिला धक्काच बसला आणि तिने असे काही..

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

सामानाची पॅकिंग करून प्रिया बेडरूम मध्ये बसली होती. खिडकीतून शून्य नजरेने बाहेर बघत होती. नेहमी खिडकीतून अंगणातील हिरवीगार झाडी पाहिली की प्रसन्न वाटायच तिला. झाडावरील चिमणीच घरटं ती रोज बघायची.

चिमणी दिवसभर बाहेर जायची मध्ये मध्ये येऊन पिल्लांना चारा बरवायची आणि सायंकाळी ती बरोबर घरी परतायची. आताही पिलांचा चिवचिवाट सुरू होता. बहुतेक चिमणी बाहेर गेली होती चारा आणायला ते सगळे बघताना तिला फार छान वाटायच.

पण आज सगळ वातावरणच तिला उदास वाटत होत. का नाही वाटणार आज ती आयुष्यातील मोठा निर्णय घेणार होती. प्रिया आणि राहुलचा प्रेमविवाह होता दोघही एकाच कंपनीत काम करायचे. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केले लग्नपूर्वी तिला त्याच फक्त प्रेमाचच माहिती होत.

पण लग्नानंतर त्याच दुसर रूपही तिला दिसू लागल. तो प्रेम भरभरून करायचा पण कधी कोणत्या गोष्टीमुळे त्याचे डोके फिरेल काही भरोसा नसायचा आणि त्याचा राग पण भयंकर असायचा. अगदी मारण्यावर उतरायचा, राग शांत झाला की माफी मागायचा.

हल्ली ती त्याचा मूड बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. घरच वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. तसही प्रेम विवाह असल्यामुळे माहेरून आधार नव्हताच, त्यामुळे तिला तडजोड करावी लागत होती. लग्नाला सात वर्षे झाली होती दोन मुलांची आई झाली.

मोठा सहा आणि छोटा चार वर्षांचा मुल म्हणजे त्याचा जीव की प्राण, मुलांवर खूप प्रेम करायचा. मुलांना पण बाबांचा खूप लळा कितीही काळजी घेतली तरी एखाद्या वेळी त्याच्या मनाविरुद्ध घडायच आणि असे काही घडले की तो भांडण करायचा.

कालही असेच भांडण झाले, तिचाही तोल सुटला त्यांच कडाक्याच भांडण झाले. त्याने तिच्यावर हात उचलला, तिला फार अपमानित वाटले. का सण करतोय आपण का अस अपमानित जीवन जगतोय. आपण नोकरी करतो स्वतःचे पोट स्वतः भरू शकतो. तरी का राहतो आपण या माणसासोबत तिला खूप अस्वस्थ वाटत होत.

रात्री दोघेही एकमेकांशी बोलले नाही. सकाळी उठल्यावर तो तिची माफी मागू लागला. पण आज तिने पक्का निर्धार केला होता. आता बस आता या विक्षिप्त माणसांबरोबर राहायचे नाही. सकाळी उठून तो ऑफिसला गेला तिने मात्र तब्येत ठीक नाही असा निरोप पाठवून ऑफिसला सुट्टी घेतली.

दुपारी मुल शाळेतून घरी आले बेडरूम मधील सामान बघून नाचू लागले. आई आपण फिरायला चालोय, कुठे चालोय ग. नाही फिरायला नाही आपण हे घर सोडून चालोय. बाबा पण येताना आपल्या सोबत छोट्या ने प्रश्न केला. त्याच्या भाबड्या प्रश्नाने येवढया रागात ही तिला हसू आल.

नाही आपण तिघेच जात आहोत. नाही आई आपण बाबांना पण सोबत घेऊया. तुम्हाला तुमच्या बाबा सोबत राहायच आहे ना रहा खुशाल मी एकटीच जाते. नाही आई तू पण हवी आहे आम्हाला. मग जास्त आरडा-ओरडा करू नका माझ्यासोबत चालायचा असेल तर चुपचाप तयारी करा. नाहीतर तुमच सामान काढून ठेवते.

आई रागवलेली बघून दोघेही शांतपणे हॉल मध्ये बसून राहिले. दिवसभर चिलबिल करणारी पिल्ल शांत झाली होती. सायंकाळी तो घरी आला, दोन्ही मुल त्याच्याकडे धाऊन गेले. त्याने पण प्रेमाने त्यांना जवळ घेतले अरेरे काय झाल माझ्या पिल्लांना. आज तर जास्त प्रेम येत आहे बाबांवर.

मोठा मुलगा रडू लागला, अरे काय झाल बाबा आम्हाला नाही जायच तुम्हाला सोडून. अरे कुठे चाललात तुम्ही बाबा आई आम्हाला घेऊन हे घर सोडून जात आहे. त्याला कालचे भांडण आठवल, मनातल्या मनात म्हणाला आपल चुकलच पण आपण माफी मागितली.

बाबा आम्हाला नाही जायच तुम्हाला सोडून पण आम्हाला आई पण हवी आहे. बाबा का भांडता तुम्ही आईशी दोन्ही मुल रडत होती. मुलांना रडतांना पाहून त्यालाही वाईट वाटत होत. मुलांचा तो आकांत पाहुन तिच मन पिळवटून निघत होत। ती तिचा अपमान विसरू शकत नव्हती आणि दुसरीकडे मुलांना बापाच्या प्रेमापासून दूर करू शकत नव्हती.

ती तशीच शून्यात पाहत बसून राहिली, तो शांतपणे बेडरूम मध्ये आला. दोन्ही कान पकडुन तिच्या समोर उभा राहिला तिने त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. शांतपणे उठली आणि बॅग मधील कपडे कपाटात ठेवू लागली. तो बाहेर गेला आणि मुलाच्या कानात सांगीतले की आई कुठेही जात नाही.

येस अस जोरदार ओरडत तिघेही मस्ती करू लागले आणि ती मात्र शुन्यात पाहात कपडे कपाटात जागच्या जागी ठेवत होती. खिडकीतून बाहेर पाहिल चिमणी घरट्यात परतली होती. घरट्यात पिल्लांचा चिऊ चिवाट सुरू होता.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *