नववीत शिकणाऱ्या मुलीला रोज एक मुलगा घरी सोडायला येत असे, पुढे तिच्या वडिलांसमोर जे घडले ते पाहून डोळ्यात पाणी येईल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आजही ती उशिराच घरी परतत होती निशांत तिला गल्लीच्या कोपऱ्या पर्यंत सोडून गेला होता. ती खाली मान घालून घरात प्रवेश करती झाली आणि खाडकन तिच्या डाव्या गालावर चार बोटे उमटली ती बाजूला जाऊन पडली.

चिडलेल्या वडलांच्या चेहऱ्याकडे पाहायची तिची हिंमतच नव्हती. हुंदका आवरतच ती आतल्या खोलीत शिरली आणि रडून-रडून कधी झोपी गेली ते तिलाही कळल नाही. पंतांच्या डोळ्यात अंगार फुलला होता. त्यांची नवनीत गेलेली लेक आजकाल अशी वागत आहे हे कडक स्वभावाच्या बापाला पटतच नव्हते.

त्यातच कॉलेजात जाणाऱ्या बंटीने तिला पुन्हा टपोरी मुला सोबत घरी येतांना दिसली होती आणि तसे त्याने त्यांच्या कानावर घातले होते आणि आज एक मुलगा तिला कोपऱ्यापर्यंत सोडून गेलेला त्यांनी स्वतः पाहिला होता. ती काहीतरी लपवत होती हेच जाणवत होत त्यांना.

घरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता तिची आई तिची तर ताकदच नव्हती नवऱ्यासमोर बोलायची. रात्री उशिराच रमा सुधा जवळ गेली. पोर रडून-रडून झोपी गेली होती. रमाने तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि पोर डचकून उठली.

गुडघे पोटाशी घेऊन थरथर कापू लागली, घाबरून रडू लागली. समोर आई आहे याचेही भान तिला नव्हते. रमा चनकली काहीतरी विपरीत घडले आहे याची जाणीव तिला झाली. तिने सुधाला रडू दिले बराच वेळ रडून झाल्यावर ती शांत झाली मग आई म्हणाली बाळ काय झाले तुला.

काही त्रास होतोय का? तू सांगितल नाहीस तर कळेल तरी कसे तो मुलगा कोण होता सोबत त्याने तुला काही केले का? रमाणे लेकीला प्रेमाने जवळ घेतले आणि विचारले. तशी सुधा पुन्हा रडू लागली. आई मला शिकायचे आहे ग बाबांना कळाले तर माझी शाळा बंद करतील आत्या सारखिच यात माझी काहीच चूक नाही ग.

आपण बाबांना समजावून सांगून सुधा तू त्रास करून घेऊ नको. तुझी शाळा बंद होणार नाही पण सांग सुधा काय झालय आई आमच्या क्लास मध्ये गणिताचे ज्यादा तास चालू आहे तुला माहितीच आहे की. पण या आठवड्यापासून सर फक्त आम्हा ६ जणींचे ज्यादा तास घेत होते.

भाग-२ साठी कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *