अक्षय तृतीयेला कावळ्याला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व पितृदोष नष्ट होतील. पैसा व सुख दोन्ही मिळेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षयतृतीया. अस म्हणतात की, अक्षय तृतीया आपण जो काही उपाय करून जे काही कार्य करून त्यातून मिळणारे उत्पन्न हे अक्षयी फलदायी असत. म्हणजे आपल्याला त्यातून मिळणारं फळ हे कधीच नष्ट होत नाही.

या वर्षीच्या अक्षय तृतीयेला आपण आपल्या जीवनातील दुःख, दारिद्रय, गरिबी दूर करण्यासाठी तुमच्या कुटुंबामध्ये वारंवार भांडणे होत असतील कुटुंबातील सदस्य एकमेकांशी वैर भावनेने वागत असतील.

तुमच्या घरामध्ये अस वातावरण आहे की, शांती नावालाही उरले नाही. तर शांती समाधान मिळवून देण्यासाठी आणि गरिबी नष्ट करण्यासाठी एक छोटासा उपाय आपण या दिवशी नक्की करा.

अक्षय तृतीया आहे म्हणजे एक मोठा पुण्यदायी दिवस आहे. अस म्हणतात की या दिवशी महालक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारची अनुष्ठान करतात. आपण सुद्धा करू शकता किंवा आपल्याला जर ते करायचे नसतील तर अगदी छोटे-छोटे उपाय केल्याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते.

जितकी मोठ मोठाली अनुष्ठान करण्याने. अक्षय पुण्य प्राप्तीचा दिवस आहे आणि म्हणून हा उपाय करण्यास चुकू नका. बऱ्याचशा घरांमध्ये पित्र अप्रसन्न असतात. आपले पित्र अप्रसन्न असतील तर त्यामुळे आपल्या घरात पितृ दोष निर्माण होतो.

हा दोष कालांतराने आपल्या जीवनाला दुःखमय बनवतो आपल्या जीवनात अशांती निर्माण करतो. या ना त्या कारणाने पितरांच्या शांतीसाठी अमावस्येच्या दिवशी आपण विशेष प्रकारचे उपाय करत असतो. पितृ दर्पण करत असतो.

तरी सुद्धा तजर पित्र अप्रसन्न असतील आणि या पितृ दोषामुळे तुमच्या घरा मध्ये सुखाचा अभाव असेल. तर या अक्षय तृतीयेला हा एक छोटासा उपाय नक्की करा. कदाचित सर्व प्रकारच्या दोषातून तुमची सुटका होईल.

मात्र घरामध्ये तुम्ही जो प्रयत्न करतायेत घरातल वातावरण सुखद असाव, घरातील लोकांनी प्रेमाने वागाव. आपण जे काही काम करतोय ते यशस्वी व्हाव. बऱ्याचदा कामामध्ये अडथळे येतात विनाकारण काम मोडल जात आणि मग त्या कामातून प्रगती साध्य न होता आपला तोटा होतो. कर्जाचा डोंगर उभा राहतो.

या सर्व गोष्टी पितृदोषाशी संबंधित आहेत. या दिवशी आपण नक्की कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेऊया. आपण सकाळी लवकर उठाव, ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. जर तुम्ही उशिरा उठला असाल तर ताबडतोब आपली नित्यक्रम.

स्नान करताना अंगोळीच्या पाण्यात थोडस गंगाजल टाकाव कारण खर तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी धार्मिक मान्यता आहे की, आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान कराव. जेणेकरून आपल्याला सर्व पापातून मुक्ती मिळतेच मात्र पुण्याची सुद्धा प्राप्ती होते.

मात्र जर आपण असे करणे शक्य नसेल. तर आपण घरच्या घरी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाजल नक्की टाकाव. जर गंगाजल नसेल तर आपण काळे तीळ सुद्धा या पाण्यामध्ये टाकू शकता. आणि त्या पाण्याने आपण स्वच्छ स्नान करा.

स्वतःच्या शरीराची शुद्धी केल्यानंतर, दुसरी गोष्ट आपण स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर नित्य त्याप्रमाणे आपल्या घरातील देवपूजा करायची आहे. देवपूजा अगदी मनोभावे करायची माता लक्ष्मीची यामध्ये विशेषत्वाने आपण पूजा करा आणि त्यानंतर हा मुख्य उपाय करण्यास आपण सुरुवात करणार आहोत.

या दिवशी आपण आपल्या घरामध्ये थोडीशी खिर बनवायची. तसेच चपाती किंवा भाकरी बनवायची आणि त्यांनंतर ही खिर आणि चपाती किंवा भाकरी खिरीमध्ये कुस्करायची आहे. हे व्यवस्थित मिश्रण बनवायचे आहे आणि ते आपल्या घराच्या छतावर किंवा आपल्या घराच्या बाहेर असुदे हे कावळ्यांना खायला टाकायच आहे.

आपले पित्र या कावळ्यांच्या रूपाने या खिरीचा या प्रसादाचा भोग नक्कीच घेतील आणि त्यांचा आत्मा जर प्रसन्न झाला तर लक्षात घ्या. आपल्या घरातून पितृदोष गेलाच समजा.

जर तुम्हाला कावळ्यांना हे खाऊ घालण शक्य नसेल. बऱ्याच ठिकाणी जागा नसते किंवा शहरात राहतात त्याना हे करण शक्य नाही. अशा लोकांनी जवळपास असणाऱ्या गाईला सुद्धा हे खिर आणि चपाती खाऊ घालू शकता.

गोमाते मध्ये सुद्धा ३३ कोटी देवी देवतांचा वास आहे आणि म्हणून व मातेला खीर खाऊ घालातांना तिच्या पाठेवरून हात फिरवून मनोभावे हात जोडून आपल्या पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना अवश्य करा. यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करावी. पितृदोष यामुळे सुद्धा उतरतो.

पितृकृपा जरी शक्य झाली तरी आपल्या जीवनातील सर्व समस्यातून आपल्याला नक्की मुक्तता मिळू शकते. हे झाल्यानंतर आपण आपल्या घरी याव आणि दक्षिणेकडे तोंड करून होय दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण एक धुप जाळावा. धुपेवरती थोढीशी खिर आपण ठेवायची आहे.

हा जो धुप आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. अस केल्याने सुद्धा आपले पित्र प्रसन्न होतात. घरातून पितृ दोष नष्ट होतो. त्यानंतर सायंकाळी सूर्यास्त समयी आपण पिंपळाच्या वृक्षाखाली जायच आहे. त्या ठिकाणी थोडीशी खिर आपण ठेवायची आहे. थोड्याशा खिरीचा भोग आपण ठेवायचा आहे. आपल्या पितरांच्या नावाने.

असं म्हणतात की, पिंपळाच्या वृक्षाखाली हा भोग ठेवला आहे तो भोग आपले पित्र स्वीकार करतात आणि प्रसन्न होतात. तुम्हाला जर हे उपाय करन शक्य नसेल तर अजून एक उपाय आहे. आपण कोणत्याही परिवारास कोणत्याही गरीबास आपल्या घरी बोलावून त्याला थेट चपाती किंवा भाकरी खाऊ घालू शकता. अन्न दान करू शकता आपल्या पितरांच्या नावाने.

ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या पितरांच्या नावाने करायच्या आहे. अस केल्याने सुद्धा आपल्या पित्र प्रसन्न होतात आणि पितृ दोषातून आपली मुक्तता होते. प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या पित्रांचे दर्पण नक्की करा. आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *