डोळ्यात अश्रू आणणारी हृदयस्पर्शी कथा- तडजोड भाग-२

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

रश्मीची सासरचे जेवणाची पद्धत शिकायची इच्छा होती. तशी तिने बोलवून ही दाखवले. पण शिकवायला तिला कोणी तयारच नव्हत. तिने त्याला सांगितले यर तो नेहमी प्रमाणे म्हणाला तुलाच तडजोड करून यातून काही मार्ग काढावा लागेल. ती गुगलच्या आणि युट्युब च्या मदतीने शिकायचा प्रयत्न करायची पण बऱ्याच वेळा चांगल्या पदार्थांना ही निराशाच तिच्या पदरी पडायची.

रश्मी ला ड्रेस घालायची सवय पण सासरी साडी नेसावी लागेल हा नियम. ठीक आहे केली तडजोड जमत नव्हती पण आता साडीमध्ये सर्व काम करण्यात पटाईत झाली. कधी माहेरी जाण्याचा विषय काढला तर ६ महिन्यातून एकदाच जायच आणि जास्तीत जास्त २ दिवस कधीतरी बदलेल नियम म्हणून केली तडजोड.

रश्मीने फॅशन डिझाइन केलेल आणि चांगल्या कंपनीत लग्ना आधी नोकरी करत होती. आता काही दिवसानी नोकरी सुरू करू म्हणून सासरी विषय काढला. तर त्यांचा स्पष्टपणे नकार आला. आमच्या घरात स्त्रिया काम करत नाही. श्रीमंत असतांना काय गरज स्त्रियांनी काम करण्याची अशी विचार सरणा.

संजू म्हणाला थोडे दिवस तडजोड कर काही दिवसांनी करू त्यांना तयार तुझ्या नोकरीसाठी केली तडजोड रश्मीने. रश्मी जितक होईल तितक सासरच्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायची. सासरचे मात्र नेहमी तिच्या पेहरावरून, बोलण्या वरून, खाण्यावरून, जेवणा वरून तिचा अपमान करायची.
आणि रश्मी चांगुलपणाने वाईटपणा संपेल या वृत्तीवर विश्वास ठेवून सगळ सहन करायची.

त्यांच्या मर्जी प्रमाणे राहायची प्रसंगी स्वतःचे मन मारून तडजोड करून लग्न संसार कुटुंब चांगल टिकाव तिने स्वतःच्या अस्तित्वालाही दुय्यम प्राधान्य दिले. या सगळ्या गडबडीत तिला आशेचा एक किरण दिसला.

रश्मीला दिवस गेले या बातमीने आता घरातले सगळे खुश होतील त्यांचे मन बदलेल तिची काळजी घेतील. असा तिचा समज झाला पण तो तिचा गैरसमज ठरला. परिस्थितीत जशी होती तशीच आता पण होती.

नवीन पाहुणा येणार म्हणून सगळे खुश होते खर, पण तिची काळजी संजीव सोडला तर कोणी घेत नव्हत. बाळ या जगात आल्यावर सगळे नक्कीच बदलतील. या आशेवर होती पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हते. रश्मीला मुलगी झाली आणि सासरचे वंशाचा दिवा म्हणून उदो उदो करण्यातील होते.

भाग-३ साठी कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *