बापासाठी मुलीने केला असाही त्याग. रडवुन टाकणारी हृदयीस्पर्शी कथा. भाग १

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आज जग इतके स्वार्थी झाले की प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करतो. आपल्याच रक्ताचे नाते असलेले सुद्धा. परंतु बाप आणि मुलीचे नाते त्याला अपवाद ठरतो. एक मुलगी आपल्या जन्मदात्या साठी किती मोठा त्याग करु शकते हे सांगणारी कथा तुम्हाला नक्कीच रडवून जाईल.

परंतु तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आवडल्यास लाईक करा आणि शेअर पण तुमची मते मला कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर मग सुरवात करूया.

राकेश मुंबईत एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता. सुखवस्तू कुटुंबातील एकुलता एक आणि दिसायला सुद्धा देखना, त्याच एका मुलीवर प्रेम होते. पण एक तर्फी तिचे नाव प्रज्ञा त्याच्याच कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून दोन महिने आधीच रुजू झाली होती.

ती दिसायला देखणी होती आणि महत्त्वाच म्हणजे शांत स्वभाव तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता. परंतु आजवर तिला प्रपोज करू शकला नव्हता. कारण ती थोडी अबोल होती. कामाव्यतिरिक्त कोणाशी जास्त बोलत नसे. तरीसुद्धा राकेशने हळुहळू तिच्याशी ओळख वाढवलेली होती.

कारण ते दोघे एकाच बसने प्रवास करीत असल्यामुळे कामापुरते हसणे बोलणे होते. गर्दीच्या वेळी तिला जागा करून द्यायचा तिची काळजी घ्यायचा. परंतु तो तिला प्रपोज करण्याची हिंमत मात्र आजवर झाली नव्हती.

गावाकडे त्याचे आईवडील त्याच्या लग्नासाठी घाई करीत होते. त्यांनी मुली बघणे पण सुरु केले होते. म्हणजे यंदा कर्तव्य होते. बाबांचा फोन आला की, तो लग्नाचा विषय टाळत असे. पण असे किती दिवस चालणार तो एक प्रकारे कोंडीस सापडला होता.

कारण तो प्रज्ञावर मनापासून प्रेम करत होता. तिला बघितल्यापासून मेड फॉर इच ऑदर ची फिलिंग त्याला जाणवत होती. कालच बाबांचा त्याला फोन आला होता. ते म्हणत होते की, येत्या रविवारी गावाला ये मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आहे.

तो बाबांशी काही जास्त बोलला नाही. त्यांने आपला नाराजी होकार त्यांना कळविला. त्याला यावेळी गावी जाणे भागच होते. त्याला काही सुचेना की आता काय करावे. या विचारातच तो ऑफिस साठी बाहेर निघाला. बस स्टॉपवर येताच त्याला प्रज्ञा दिसली. नजरानजर होताच दोघांनी एकमेकांना स्माईल दिली.

काही वेळात बस आली ते बस मध्ये चढले. परंतु बस मध्ये आज खुप गर्दी होती. दोघेही एकमेकांपासून लांब होते. राकेश आज तिला निरखून पाहत होता. तिचे लक्ष जाताच नजर फिरवून घेत होता. एक दोनदा असे झाले तिच्याही ते लक्षात आले. स्टॉप येताच दोघेही सोबतच निघाले.

राकेशच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. हे तिने त्याचा खिन्न चेहरा बघून जाणले. पण ती काही बोली नाही. आज राकेश शरीरानेच कामावर होता, कामात मात्र त्याचे मन नव्हते. तो ५ वाजण्याची वाट बघत होता आणि ठीक ५ वाजता बेल वाजली. राकेशला बर वाटल.

तो मोठ्या स्फूर्तीने बाहेर पडला आणि प्रज्ञाची वाट पाहत बाहेर थांबला. ती येताच त्याने तिला हात दाखविला तिने मान हलवून स्माईल केल. ती जशी जशी जवळ येत होती तसे त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. ती बोली चला निघुया.

हो निघुया गडबडीत राकेश म्हणाला. थोडे पुढे जाताच तो तिला म्हणाला प्रज्ञा बस यायला अजून वेळ आहे. त्या वेळात आपण कॉफी घेऊया का? तिने होकारार्थी मान हलवून हो चालेल घेऊया. प्रज्ञा म्हणाली.

भाग-२ साठी कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *