एक हृदयस्पर्शी कथा, पळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात येते तेव्हा.

Uncategorized

हृदयस्पर्शी कथा.

आंतर जातीय विवाह करून घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केलेली मुलगी १० वर्षांनी माहेरच्या दारात उभी होती. हातात एक लिफाफा घेऊन १० वर्षांनी माहेरच्या दारात उभी असताना डोळ्यात पाणी आणि मनात भीती होतीच. मुलगीचा भाऊ त्याची पत्नी आई जरा टेन्शन मध्येच बसले होते.

मुलीच्या बाबांना हार्टच ऑपरेशन सांगितले होते. ऑपरेशनला किमान पाच-सहा खर्च येणार होता. मुलाने (भावाने) शिक्षणही पूर्ण केले नाही. नोकरीतही धर सोड वृत्ती त्यामुळे
पगार सुमारच.

इतक्या दिवस बाबांच्या जीवावर घर चालू होत. घरात तोच विषय चालू होता. पैशांची जुळवा जुळव कशी करायची, सगळे हतबल झाले होते. तेवढ्यात दारात मुलगी उभी दिसली. हातात लिफाफा तो पुढे करून दादा माझा वाटा तिचे शब्दच ऐकताच त्याचा राग अनावर झाला.

त्याने खाडकन तिच्या कानाखाली वाजवली. अग आमची बेइज्जती करून पळून गेली. आणि आता बाबा इथे हॉस्पिटलमध्ये आहे. आम्ही कोणत्या परिस्तिथी तुन जात आहे कळतय का तुला.

बाबांना कल्पना होतीच या लोकांनी तुला पैशासाठी फसवलय. एक दिवस हे होणारच होत. मुलगी तशीच रडत दारात उभी होती. आई पुढे येऊन म्हणाली तू घरात लहान हुशार म्हणून तुझ्या शिक्षणासाठी बाबांनी किती कष्ट करून पैसे भरले.

तू आता त्यांच्या अशा परिस्थितीत वाटा मागते, चांगलेच पांग फेडले बाई आमचे हात जोडून तळतळीने आई बोलत होती. वहिनी- लहान म्हणून आम्ही तुला आमच्या मुलीसारख जपल होत. झाल गेल विसरलो असतो पण अशा परिस्थितीत वाटा मागावा थोडा तरी विचार करायचा होता ना.

मुलगी मात्र नि:शब्द पणे रडतच होती. सगळ्यांच बोलून झाल्यावर ती दीर्घ श्वास घेऊन बोलायला लागली. आई वहिनी दादा मला माफ करा मी तुमच्या विरोधात जाऊन लग्न केल. पण मला माहिती आहे तुमचा विरोध राहुलला नव्हता.

त्याच शिक्षण, नोकरी पाहून तुम्ही पसंती दाखवली होती. विरोध होता त्याच्या जातीला. जात कळल्यावर तुम्ही नकार दिला. पण दादा तिथून मागे येणे मला नसत जमल रे. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप केले आहे रे.

पण त्यावेळी तुमच्या मनात जे होत ना राहुल पैशासाठी माझ्याबरोबर लग्न करतोय. ते मी तुम्हाला किती समजवल असत तरी तुम्ही नव्हता समजून घेत आम्हाला. या १० वर्षात माझ्या कमाईचा १ रूपया ही राहुलने कधी घेतला नाही.

राहुलच काय त्याच्या आईवडिलांनी कधी विचारल नाही. हातातला लिफाफा पुढे करत म्हणाली, दादा यात रक्कम न टाकलेला चेक आहे. बाबांच्या ऑपरेशनला जितके पैसे लागतील. तेवढे टाक पण बाबांना बर कर.

मुलीच्या डोळ्यातून पाणी वाहत होत. बाबांचे ऑपरेशन आहे सकाळी मला समजल. तुम्ही मला दिलेले संस्कार, शिक्षण, प्रेम याची परतफेड नाही करू शकत. पण माझ्या माणसांच्या संकटाच्या वेळी खारीचा वाटा मागायला आली आहे.

दादा बहिणीला नाही म्हणू नको, आणि हे मी माझ्या घरच्यांना विचारून देते. त्यांनीच सांगितले सुखापेक्षा दुःखाचा वाटा आयुष्यभर पुरेल. उद्या माझ्यावर वेळ आली तर मला माझ्या मागे सारच्या माणसासोबत माहेरची माणसे देखील हवी आहे.

मुलीचे शब्द ऐकून आता सर्वांनाचा गहिवरून आल. दादाने तिला जवळ घेतल एवढी मोठी झाली ग माझी बहिण. आज मलाच ४ गोष्टी शिकवल्यास. माफ कर मी तुझ्या घरच्यांना चुकीच समजलो.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *