माहेरी कडक शिस्तीत राहिलेली मुलगी लग्न झाल्यावर सासरी सासू आणि नणंद असे काही वागते की…

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

लग्न होऊन ती शहरात आली, तसे तिला तर शहर नवीन नव्हते. काही ना काही निमित्ताने शहरात येत होती, पण आता कायमची आली होती. नवऱ्याचे तिच्याकडे लक्ष होते घरात नातेवाईकांची धूम असतांना तो तिच्याशी काहीच बोलू शकला नाही.

एक एक करत सगळे आपापल्या घरी परतले. ती घरात रुळायचा प्रयत्न करत होती. तिच्या वयाची ननंद सतत तिच्या अवतीभवती होती. दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. नवरा तर भोवऱ्या सारखा वागत होता. त्याच्या त्या धीटपणा मुळे तिला कधी कधी अगदी कानकोंडे झाल्यासारखे होत होते.

त्याच्या आईने आपण होऊन दोघांनाच बाहेर फिरायला पाठवले घरी परतायला उशीर झाला. ती खुप नर्वस झाली घरी येताच तिने सासू-सासर्‍यांना सॉरी म्हटलेउशीर झाल्याबद्दल.चिल वहिनी आठ यर वाजलेत.

उशीर काय दोघे घरून सांगून गेला होतात. शादीशुदा हो थोडी हमारा भैया आपको भगाके ले गया था। नणंद म्हणाली
नंतर तिने सासूला आणि नंदेला हळूच सांगितले तिच्या माहेरी मुलींनी घरी दिवस मावळायच्या आत घयेण्याची सक्ती होती. अगदी क्वचित त्यांना संध्याकाळी मुलींना बाहेर जायची परवानगी असायची.

तेही कोणी घरचे मोठे सोबत असेल तरच. घरच्यांना मुलींना संध्याकाळी एकटीने बाहेर पाठवायचे भीती वाटायची. तिने सासूला सांगितले काही कटू अनुभव आई-वडिलांना कडक होण्यास भाग पाडतात. मुलांनी प्रत्येकवेळी जबाबदारीने वागले पाहिजे.

सासू बाईंनी तिला समजावले, आपल्याकडे असा नियम नाही. पण कोण किती वाजता येणार हे मात्र सांगुन बाहेर पडायचे असते. ऑफिसमध्ये अचानक एखादे काम निघाले तर आम्ही एक मेसेज करतो फक्त तेवढ पुरेसे आहे.

ती नवऱ्याशी बोलल्यावर नवरा तिला म्हणाला होईल तुला सवय तो पुढे तिला विश्वास देत म्हणाला. दोन दिवसांनी तिच्या सासूने संध्याकाळचा स्वयंपाक करताना बरीच काटछाट केली. एवढाच भात पुरेल, पोळ्या जास्त नको तर तिला कनिकही पुरेशी मळू दिले नाही. त्यांनी स्वतःच बेताचीच भाजी चिरली.

तिला समजेना घरच्यांना पुरायला नको का? तिने धीर करुन विचारले तर सासु जरा आवाज चढवुन बोलली. एक दिवस कमी स्वयंपाक पुरत नाही का? रोज काय घरी पोटभर जेवायचे असते का? तिला खूप टेन्शन आले.

नवीन माणसे नवीन घर खूप बैचेन झाली ती काय बोलावे तिला समजेना उगाच इकडे तिकडे करत राहिली. सासू आणि नणंद मात्र नेहमी सारखे वागत होत्या. सासुने स्वयंपाक घरात झाक पाक केली.सर्व आवरले आणि नगर सुनेला हाक मारली.

काय झाले आहे मदत करू का? तिने विचारले खर ती खुप नर्वस झाली होती. ती लपवायचा आटोकात प्रयत्न करत होती. आवरायला घे आपण तिघी बाहेर जातोय जेवायला. आपण तिघीजनी जाऊ बाहेर हॉटेलात जेवू, आईस्क्रीम खाऊन चक्कर मारून घरी येऊ चल आटप लवकर सासू म्हणाली.

वहिनी तू म्हणालीस ना तुला रात्रीचे बाहेर जायची फारशी सवय नाही. तेव्हाच आम्ही दोघींनी ठरवले तुला दिक्षा द्यायचीच चल मजा करू. तिला डोळा मारत तिची धाकटी नणंद खट्याळपणे म्हणाली. हे बोलणे ऐकून तिच्या मनाची तगमग कुठल्या कुठे पळून गेली.

सासू म्हणाली तुला हवे ते कपडे घाल काही प्रॉब्लेम नाही. पण ते दोघे यायचे आहे अजून त्यांचे जेवण व्हायचे आहे अजून आपण कसे जाणार. तिने शंका बोलून दाखवली. आपल्या फॅमिली ग्रुप वर पाहिले नाहीस का मम्माने पप्पा आणि दादाला मेसेज ठेवलाय ते जेवतील आणि घर आवरून ठेवतील.

तू चल फक्त परत नणंद धावून आली. अगं तुझ्या दादा ची वाट बघते ते तुला नाही कळले. सासु असे म्हणतात ती गोरीमोरी झाली नाही नाही तसे नाही मी आवरते. आपण निघू ती त्यांच्या खोलीच्या दिशेने पळत गेली.

नवे स्टायलिश कपडे घालून तिघी पटकन तयार झाल्या. तिला अजुनही विश्वास बसत नव्हता. गाडीत सासू च्या शेजारी बसून बाहेर पडताना तिला कमालीचे आश्चर्य वाटले होते. जरा लांबच्या हॉटेल मध्ये जायचे त्या दोघींनी ठरवले होते.

रात्री जेवून खाऊन तिघी घरी परतल्या सासू आणि नंदेला असे आत्मविश्वासाने वावरताना बघून तिला चैतन्य आले. नवे जग तिला दिसले होते. आत्मविश्वास आणि परस्परांचे मन जाण्याचा नवा पाठ मिळाला होता.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *