आईवर प्रेम करत असाल तर नक्की वाचाच एक हृदयस्पर्शी कथा.

Uncategorized

नमसकार मित्रांनो.

आई- आज आईचा राग रंग जरा वेगळाच भासला. तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला. कसे फेडशील पांग या माऊलीच्या कष्टाचे तुला जन्म देतांना वेदना भोगल्या. तुला वाढविताना रात्रीचा सुद्धा दिवस केला.

तुझ आजरपण पडण, रडण, दुखण, भरवण, शिकवण काय काय नाही केल स्वतःच जगणच विसले मी. मुलगा म्हणाला आता मस्त पैकी मी नोकरीला लागेल भरपूर पैसे कमवेल मग जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेल.

आई स्मित हास्य करत म्हणाली अरे वेड्या हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहे की आणि हो तू जेव्हा मोठा होशील खूप पैसे कमावशील तेव्हा अधिक सुखाची गरज नसेल मला. मुलगा म्हणाला मी एक छानशा प्रेमळ मुलीशी लग्न करेल.

ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर, आई हसली आणि म्हणाली सुनेकडून सेवा करून घ्यायची मुळीच इच्छा नाही माझी. मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न कराव कारण तुला आयुष्यात आयुष्यभरासाठी साथीदार मिळावा म्हणून.

तुम्ही दोघांनी एकमेकांना साथ द्यावी समजून घ्याव. व सुखाने एकत्र नांदाव. मुलगा थोडा वेळ विचार करून आईला म्हणाला आता तूच सांग ना आई मला मी काय कराव तुझ्यासाठी.

आता आईची कळी खुलली ती मुलाला म्हणाली, जो पर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत तू नेहमी मला भेटायला ये. माझ्याशी प्रेमाने मनमोकळ्या गप्पा मारा आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी जेव्हा दिवसभर उभा राहशील तेव्हा माझ्या वतीने सुद्धा प्रयत्न कर.

मी जेव्हा मरेन तेव्हा तू मला खांदा दे, माझ्या आठवणी दानधर्म कर तू केलेले प्रत्येक चांगले काम मला सुख समाधान देईल. म्हणून आतापासूनच सर्वांशी प्रेमाने वाग. आसपास असलेल्या लहान-थोर प्रत्येकाला सन्मान दे. यथायोग्य मान ठेव.

लक्षात ठेव, तुला जन्म देताना झालेल्या वेदना वाढविताना झालेले कष्ट हे मी स्व इच्छेने स्वीकारले होते. तुझ्यावर उपकार नाही केले मी तो आमचा दोघांचा निर्णय होता. देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले. आणि मला एक सुवर्ण संधी दिली.

एखाद्याच्या कलाकृतीला घडविण्याची त्याबद्दल त्यांची मी सदैव ऋणी असेलच. तू मला निखळ आनंद व साथ दिली, तुझ्या हातून प्रत्येक घडणारे कार्य म्हणजे मोबदला असेल.
करशील का हे. नि:शब्द मुलाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू खूप काही बोलत होते.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *