देवळात बसलेल्या या महिलेच्या सोबत श्रीमंत महिला अशी काही वागली त्यानंतर जे घडले ते पाहून थक्क व्हाल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

दुपारी सगळ घरातील आवरून सोसायटी मधील बायका आणि ३ ४ मैत्रिणी अशा आम्ही दहा-बारा जाणी जवळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निघालो. प्रत्येक जण आपल्या श्रीमंतीच्या जमेल तेवढा तोरा मिरवत होती. त्यात मीही अपवाद नाही बर. भारी साड्या दागिने, गजरे हवे तेवढे नटून घेतले होते.

सहाजिकच आहे बायकांचा असं म्हटल्यावर एवढ तर होणारच ना. हो सगळ्याजणी मंदिरात गेलो देव दर्शन झाले. हळदी कुंकू वाण अगदी सगळ व्यवस्थित झाल. मंदिराच्या सभामंडपात आमच्यासारख्या बऱ्याच जणींचा घोळका बसला होता.

नथीच्या नखाऱ्या पासून ते कानातील झुमक्या पर्यंत मान हलवून प्रत्येक जण दिखावा करत होती. सगळ्या एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण देत होत्या. कोणी विडेही मंदिरात जायला आणले होते. हे सगळे चालू होत, जवळपास एक तास गेला आमचा.

पण आम्ही मंदिरात गेल्या पासून पाहत होतो. मंदिराच्या एका बाजूला भिंतीला टेकून एक बाई बसली होती. आमच्या गोंधळ कुणाचच तिच्याकडे लक्ष गेल नव्हत की, आम्ही मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष केल होत माहीत नाही. मला तिला बघून थोड वेगळ वाटत होत.

मंदिरात आलेल्या प्रत्येक बाईकडे ती हसऱ्या नजरेने बघत होती. पण येणार्‍या प्रत्येकाची नजर तिच्याकडे तुच्छतेने बघत होती. मला लगेच जाणवले येणारी एखादी सोडली तर तिला कोणीच हळद कुंकू लावत नव्हते. तरी तिचा चेहरा प्रसन्न होता. मी थोडावेळ तिच्याकडे बघत बसले.

तिच्या अंगावरची साडी हिरव्या रंगाची जुन्या पद्धतीची म्हणजे कमीत कमी वीस वर्ष तरी भरजरी काट. त्यावरची जरी काळ पट पडलेली. साध्या कापडाचे ब्लाउज कानात नकली मोत्याची फुले, गळ्यात चार पदरी काळे मणी आणि दोन वाट्या म्हणजेच डोरले. बहुतेक तेवढेच सोन्याचे असावेत.

हातात मात्र हातभर बांगड्या साध्या आणि हो कपाळावर टिकली नाही तर मोठ लाल अगदी ठसठशीत कुंकू होत. वय साधारण ४५ ते ५० च्या आसपास असाव. आमच्यापैकी प्रत्येकजण आपल्याच तोऱ्यात होती. तिला हळद कुंकू लावण्यात कोणालाही रस नव्हता. तिचा तो प्रसन्न चेहरा बघून मला मात्र रहावल नाही.

मी सरळ माझ ताठ घेऊन तिच्यासमोर जाऊन बसले. तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अजूनच नितळ दिसत होती. मी तिला हळदी कुंकू लावले, वाण ओटीत घातले. तिने हळदी कुंकू लावले वाण दिले. माझ्या भांगात कुंकू भरू का म्हणून मला विचारले.

तेव्हा मी म्हणाले असे विचारायचे काय त्यात आज सुवासिनींचा दिवस आहे. तिने कुंकू भांगात भरले आणि भरताना म्हणाली जन्मो जन्मी सुवासिनी राहो तुम्ही. त्यांच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

किती मोठा आशिर्वाद त्यांच्या तोंडून मला मिळाला होता. मी तिच्या शेजारी बसले. आता येणारी प्रत्येक जण मला हळदी कुंकू लावायची आणि तिच्या बाजूला असल्यामुळे काहींना इच्छा नसली तरी लावावे लागायचे.

आमचा ग्रुप मात्र वेगळ्याच दुनियेत मिरवत होता. थोडी गर्दी कमी झाली तस मी त्या बाईला विचारल कुठे राहता तुम्ही? तिने जवळच्या बैठे चाळवजा घराकडे हात करून म्हणाली तिकडे आहे घर माझ. मनात आल बहुतेक घरची परिस्थिती बेताचीच असावी. मग मी विचारल तुमची मुल आणि मिस्टर काय करतात.

त्यावर त्या बाईचे उत्तर ऐकून मला माझीच लाज वाटू लागली. त्या म्हणाल्या माझा मुलगा आणि मुलगी दोघेही डॉक्टर आहेत आणि आमचे हे सरकारी दवाखान्यात कंपाउंडर आहेत. मला तिचा आश्चर्य वाटल मुल एवढी शिकली आणि या बाईच्या अंगावर निटशी साडी देखील नाही, खोट बोलत असावी.

मग पुढे म्हणाले मुल डॉक्टर आहेत मग तुम्ही फ्लॅट मध्ये का नाही राहत. त्यावर त्यांचे उत्तर मला निरुत्तर करून गेल. ती म्हणाली ताई मुलांनी स्वतः मेहनत करून शिक्षण घेतल. आमची तेवढी ऐपत नव्हती. पण त्यांची जिद्द होती ती देवाने पूर्ण केली. आता दोन्ही मुल गावी असतात.

मी म्हणाले गावी का? अहो आमचे गावात डोंगरात आहे तिथे दवाखाना हॉस्पिटल याची काहीच सोयी नाहीत. म्हणून मुलांनी ठरवल आपल्या गावातच छोटेसे हॉस्पिटल उभे करू म्हणजे गावातील गरिबांना पण सेवा देता येईल. आम्ही इथे आहोत कारण आमच्या यांची रिटायरमेंट अजून बरीच वर्ष बाकी आहेत.

हॉस्पिटल बनवायला त्यांनी कामातून कर्ज काढून मुलांना दिले आहे. तेही फेडायचे आहे, म्हणून इकडे राहावे लागत आहे. हॉस्पिटल चांगला चालू आहे, त्यातून आलेल्या पैशातून मुल गावातील गरीब गरोदर बायांची बाळंतपण याकरिता बाहेरच्या डॉक्टरांची फी भागवतात. उरलेल्या पैशातून गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात.

मला हे ऐकून विश्वासच बसत नव्हता. आतापर्यंत मी सुद्धा जिला गरीब समजत होते, ती मनाने किती श्रीमंत होती. आपली श्रीमंती तिजोरी पुरती मर्यादित असते पण अशा लोकांची श्रीमंती आपल्या कितीतरी तिजोर्‍या रिकाम्या केल्या तरी कमवता न येण्यासारखे असते.

त्यांच ते बोलण ऐकुन मी निशब्द झाले. मैत्रिणी निघाल्या तशी मीही निघाले, मंदिरा बाहेर आल्यावर सगळे ग्रुप मला म्हणू लागला. काय ग तू एवढ्या बायका सोडून त्या बाई जाऊन का जाऊन बसलीस.

एकजण म्हणाली इइइ कशी होती ती बाई साधा एक दागिना नव्हता. निट साडी देखील नव्हती अंगावर. मी मात्र आता निघताना स्वतःला खूप गरीब समजत होते, पाय जड झाले होते. कोणती श्रीमंती मिरवतोय आपण हेच कळत नव्हत.

खरच आपण एवढे खालच्या पातळीवर कसे जाऊ शकतो. कुणाच्या दागदागिने आणि कपड्यांवरून त्याला तुच्छ समजतो. खरी श्रीमंती कशात आहे हे आपल्याला कधी कळतच नाही. का कळून न कळण्याच आयुष्यभर नाटक करत असतो. प्रत्येकजण स्वतःच्या श्रीमंतीचा डंका पिटत असतो.

आपण किती मोठे आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. मला मात्र आज खरी श्रीमंती समजली तिजोरीच्या श्रीमंती पेक्षा कितीतरी पटीने मनाची श्रीमंती मोठी आहे.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *