जेव्हा नवऱ्याने पत्नीच्या प्रियकराची जाहिरात पेपर मध्ये दिली आणि त्यानंतर जे घडले ते पाहून.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

पंचवीस वर्षांचा संसार झाला तिचा एकुलता एक मुलगा नुकताच नोकरीला लागलाय. नवराही कंपनीत वरच्या पोस्ट वर मोठी गाडी, घराचे हप्ते संपले सेकण्ड होमचा विचार चालू आहे. एकंदर काय काहीही कमी नाही ती खुश आहेत. निदान अस वाटतय तरी.

खर सांगू तिचा नवरा फुलासारखा जपतो तिला तू म्हणशील तस. अगदी प्रत्येक शब्द झेलतो तिचा रोज संध्याकाळी दोघ फिरायला जातात. अजूनही गप्पा रंगतात, रोज न चुकता गजरा घेऊन येतो तिच्यासाठी त्याच मन म्हणजे नितळ पाणी आज पर्यंत त्यान तिच्यापासून काही लपवल नाही.

१ एप्रिल त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्याने सुट्टी घेतली आहे. कुठे जायला नको बाहेरूनच मागू काहीतरी निवांत गप्पा आयुष्यावर बोलू काही. दिवस किती पटापट जातात नाही ठीक आहे. त्यांच आयुष्य खुली किताब तीच काय ती काही लपवत तर नाही ना.

तो अंघोळीला गेलाय सहज म्हणून ती पेपर उघडते. एरवी ती आतल पान कधी उघडतही नाही. आज सहजच आतल्या पानावर फोटो पाहिला २४ वे पुण्यस्मरण तो संपला आहे. तिच्यासाठी कधीच सगळा राग ती पेपर वर काढते.

चोळामोळा करून फेकते. त्यान फसवले आहे तिला किती वाट बघितली तिने त्याची तो आलाच नाही. शेवटी येईल ते पहिले स्थळ तिने हो म्हंटल मला सांगा काय वाईट झाल तिच. अस्वस्थ सगळा मूड गेलाय तिचा टोचणी लागली आहे.

पहिल्या भेटीतच त्याने विचारल होत तिला तुझ्या मनाविरुद्ध काही होत नाही ना. तुझ्या मनात दुसरे कोण असेल तर सांग एक मित्र म्हणून सगळी मदत मी करेन तुला. काय सांगू त्याला यु आर नॉट माय फर्स्ट चॉईस रेटून खोटे बोलली ती तेव्हा तस काहीच नाहीये. एप्रिल फुल केलय त्याने तिला आयुष्यभर.

तो अंघोळ करून आला तिचा चेहरा त्याने घडाघडा वाचला मनकवडा होताच. शेजारचा चोळामोळा पेपर त्याने पाहिला तिचा हात हातात घेतो हलकेच थोपटतो. तू गिल्टी फील करून घेऊ नकोस एप्रिल फूल आम्हीच केले तुला.

तो माझा जवळचा मित्र तुझ्यात जीव अडकला होता त्याचा. तुला मागणी खायला तुझ्याच घरी येत होतो आम्ही. मी मनोज आणि त्याची आई गाडीचा अ-प-घात झाला. सहा महिने हॉस्पिटलमध्ये आडवा होता. आम्ही थोडक्यात बचावलो, त्याला कळून चुकलेल तो फार दिवसांचा सोबती नाही.

सहा महिन्यातच तो गेला माझ्याकडून वचन घेतल होत. त्यानंतर माझा स्थळ तुमच्याकडे व्यवस्थित कळवण्यात आलं. आपल लग्न झालं. स्वतःला व्हीलन केल त्याने मुद्दामून खूप अपराधी वाटते मला.

एप्रिल फूल तर मी केले आहे तुला सगळ सांगायच होत तुला धीरच होईना. ती जाहिरात मिच दिली आहे. तिचा बांध फुटतो धाय मोकलून आभाळ पडले ती शांत झाली आता. त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटते.

तुझी काही चूक नाही आयुष्य आपल्याला दारामागे लपून एक दिवस अचानक एप्रिल फुल करतो. खेळात हे चालायचच काटेरी रस्ता संपला आहे. तो चांगला होता आता तूच माझा जीव की प्राण आहे. ती गर्द बिलोरी पाणीदार डोळ्याने हसते आणि एप्रिल फूल कायमचा संपून जातो.

मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *