आपले देवघर कसे असावे? देवघरा संबंधित काही महत्त्वाचे नियम.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

देवघर कसे असावे, देवघरात संबंधित काही महत्वाचे नियम आम्ही तुम्हाला आजच्या लेखामध्ये सांगणार आहे. देवघरात फरशी बसवायचे असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल असेल अशी फरशी बसवावी.

देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल. स्टीलचे किंवा लोखंडाचे देवघर कधीही नको. देव घराच्या भिंतींना हलका नारंगी केसरिया किंवा भगवा रंग लावावा. नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी.

देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर ठेवावे. ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. देव घरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा. कुंच्या शक्यतो नको. देव घरात बसायला दर्भाचे आसण जरूर घ्यावे.

कोणत्याही पूजेच्या दुकानात दर्भ आसण मिळतेच. देवघरात रोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा नक्की लावा. देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती अनेक लोभांची अगरबत्ती नक्की लावावी.

देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मुर्त्या नसाव्यात. देवांच्या आसन नेहमीच आपल्या आसणा पेक्षा उंच असावे. देवघरात वरून कलश ठेवावा, हा कलश आपल्या कुलस्वामिनीचा नावाने स्थापन करावा.

कळशात नारळ, पाणी, पैसा, सुपारी टाकावी. त्याला हळदी-कुंकवाचा प्रत्येकी ३ किंवा ५ रेषा ओढाव्यात. देवघरात गणपती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण श्री यंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी.

देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो सुद्धा लावू नये. देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवतान सोबत कधीही ठेवू नये. देवघरात रोज कापूर जाळून एक तरी मंत्र किंवा स्तोत्र म्हणावे आणि घंटी वाजवावी.

देवघरात एक हिता पेक्षा जास्त उंच मूर्ती कधीही नसावी. देवघरात झोपायचे, जेवायचे कधीही करू नये. देवघरात देवाला सणावरी आपण जे जेवण करतो त्याच्या नैवेद्य नक्की दाखवावा.

देवघरात पूजा करताना भांडणे, ओरडणे, अपशब्द बोलणे टाळावे. तुम्हीही देवघरात संबंधीचे हे काही छोटेसे सोपे नियम पाळावेत.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *