जीवनात कितीही मोठे संकट आले तरी घाबरु नका देवासमोर एव्हढा मंत्र बोला मग बघा चमत्कार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक सुख दुःखाना सामोरे जावे लागत असते. आपल्याला अनेक सुखाचे क्षण देखील येत असतात तसेच दुःखाचे क्षण देखील येत असतात.

मानवी जीवन म्हंटले की सुख व दुःख आलेच परंतु आपल्याला या सुख-दुःखाच्या क्षणाला चांगल्या प्रकारे सामोरे जावे लागत असते.

सुखाच्या क्षणी आपण कधीही स्वतःचा स्वार्थ बघितला नाही पाहिजे किंवा खूपच अहंकार असू देऊ नये. तसेच दुःखाच्या क्षणी न डगमगता येणाऱ्या क्षणाला सामोरे जाण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करायला हवी. तसेच स्वतः स्वतःच्या दुःखांना कशाप्रकारे सामोरे जाता येईल हे स्वतःलाच बजावून सांगायला हवे.

आपण जे पण काही कार्य करत असतो, त्यावर परमेश्वराचा हात असतो. आपल्याला दुःखाचे क्षण तेव्हाच निर्माण होत असतात जेव्हा आपण काहीतरी चुकी केलेली असते. दररोजच्या दररोज आपण केलेल्या चुकांबद्दल परमेश्वराकडे माफी मागायला हवी.

दररोज न चुकता देवाची पूजा करायला हवी. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्वच्छ आंघोळ करून घ्यावी व त्यानंतर देवासमोर दिवा लावावा.

जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर देवासमोर दिवा लावतो व अगरबत्ती लावतो अशा लोकांच्या घरात नेहमी प्रसन्न वातावरण निर्माण होत असते. या प्रसन्न वातावरणात जे पण काही निर्णय घेतले जातात.

त्या सर्व निर्णय सकारात्मक होत असतात. सर्व कार्यामध्ये यशप्राप्ती फलप्राप्ती होत असते. घरात नेहमी सकारात्मक विचार निर्माण होत असतात.

याउलट जे लोक उशिरा उठतात देवा ची पूजा करत नाहीत अशा लोकांच्या घरी नेहमी दारिद्र्य राहत असते अशा लोकांना कधीही कोणतीही गोष्ट अपूर्ण पडत असते.

दररोज संध्याकाळच्या वेळी देखील देवाच्या समोर दिवा लावायला हवा. जेव्हापण आपल्या वर एखादे संकट आलेले असते तेव्हा देवासमोर प्रार्थना करावी व एक छोटीसे वाक्य मनामध्ये म्हणत राहावे.

असे केल्याने समोरचे संकट झेलण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. देवासमोर हात जोडून मनामध्ये म्हणत रहावे “हे भगवंता जे संकट माझ्यासमोर आले आहे ते संकट झेलण्याची ताकद मला दे” या वाक्यामुळे नक्कीच तुमच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होईल व समोर कितीही मोठे संकट असले तरी त्यावर तुम्ही नक्कीच मात कराल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर क-रा-य-ला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आ-म-च्या फे-स-बु-क पेज ला ला-ई-क करायला विसरु नका.

टीप : व-र दि-ले-ली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आ-धा-रा-वर दि-ले-ली आहे. या-मा-गे कोणतीही अं-ध श्रद्धा प-स-रवण्याचा किंवा त्या-स वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या-मु-ळे कोणीही तसा गै-र-स-म-ज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *