रतन टाटांच्या अंगावर हवाईसुंदरी कडून ज्युसचा ग्लास सांडला. तर पहा टाटा यांनी काय केले. तुम्हालाही आश्चर्य वाटेल..!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपती यांची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्या समोर घरमालक येऊन उभा राहीला. आज कस येणं झाल उद्योगपती यांनी त्या माणसाला विचारल. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की तो त्यांचा घरमालक आहे.

घर मालक विनम्रपणे म्हणाला मी भाडे वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवतात. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेल दिसतय. उद्योगपती वरमले व म्हणाले हे घ्या तुमचे घर भाडे, उशीर झाल्याबद्दल शमा करा. एवढे बोलून उद्योगपती यांनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.

घरमालक उद्योगपतीला म्हणाला तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहतात याचे मला आश्चर्य वाटते. उद्योगपती हसले व म्हणाले मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.

घरमालक काही समजला नाही तो भाडे घेऊन निघून गेला. हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाइन्स ऑफिसेसात गेले. तिथे बरीच गर्दी होती, उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेत उभे राहिले.

तेवढ्यात एअरलाइन्सच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले.ते घाईने पुढे आले आणि म्हणाले सर तुम्ही रांगेत का उभे आहात. आम्ही तुमचे तिकिट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.

उद्योगपती म्हणाले आता मी उद्योगपती म्हणून येथे उभा नाही. तुम्ही एवढी धावपळ करण्याची खरच आवश्यकता नाही. उद्योगपती हे माझ्या नावाच पुढे लावलेल विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे हे अधिक महत्त्वाचा आहे. एअरलाइन्सचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकीत झाला.

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिस कडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावत पळत आपल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना वाईट वाटले की आपण एवढ्या अलिशान गाडी मधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात.

त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उधोगपती यांना खुपच समाधान वाटायचे.

ज्या दिवशी उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले. त्या दिवशी आणखीन एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.

उद्योगपतीने तिच्याकडे पाहिले व विचारले तु माझ्या अंगावर काय सांडवले

हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला. मला क्षमा करा. उद्योगपती हसले व म्हणाले पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा आणि विस्की सांड. हे उद्योगपतींचे बोलणे ऐकून सुंदरी हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपती यांच्या ड्रायव्हरने पाहिले व ऐकले त्याची उत्सुकता साळवली गेली होती. तो म्हणाला साहेब तुम्हाला इतके साधे राहणे वागणे कसे काय जमते. आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगतात.

उधोगपती म्हणाले अरे मी पण लहान असताना फार उत्ताम होतो. मला सांभाळायला एक नर्स होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली, तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले.

ते मला म्हणाले होते की तू कोण आहेस हे बिलकुल महत्त्वाचे नाही. पण तू कसा आहेस हे फार महत्त्वाचे आहेत. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत रहा. तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मलाही पटले आहे की खरोखरच आपण कोण आहोत. हे महत्वाचे नसते आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरते.

जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधे होते. या उत्तुंग उद्योग पतीचे नाव रतन टाटा होते. जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला वागायला अत्यंत साधी कुठलीही गुंतागुंत नसलेली अशी असतात. खरे तर साधे राहणे हेच कठीण असते या अशा व्यक्तीच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *