दर महिन्याच्या २५ तारखेला या आज्जी मिठाईच्या दुकानातून मिठाई नेत असत. पण असे करण्यामागचे कारण पाहून थक्क व्हाल..

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

एका मिठाईच्या दुकानात गल्ल्यावर बसायचा तो आणि त्याच्या शेजारी बसत असे त्याचा सहकारी. ८ ते १० सेल्समन असत उभे काउंटरच्या पलीकडे दुकानाचा मालक कधी दुकानात येई तर कधी त्यांची मिठाई जिथे बनत असे त्या फॅक्टरीत जाई.

थोडक्यात मालक दुकानात नसताना त्याची जबाबदारी असे झाल गेल बघण्याची आणि अर्थातच ही जबाबदारी इमाने इतबारे पार पाडत असेल. जितके मिठाईचे नमुने होते दुकानात त्याहुनही ही जास्त नमुन्याची लोक बघायला मिळत असत त्याला. कोणी निवांत तर कोणी घाईत कोणी शांत तर कोणी कोपिष्ट.

कोणी अगदी वरची चिल्लर देणारा, तर कोणी वरचे १००-२०० डिस्काउंट मागणारा आणि त्या प्रत्येकाबरोबर त्याला मात्र अतिशय संयमितपणे वागावे लागत असे. तर आज ही अशाच विविध तऱ्हेच्या लोकांची ये-जा चालू असताना त्याला दिसल्या दुकानात शिरताना त्या साठीच्या त्या बाईंना बघताच तो किंचितसा मोठ्याने बोलला.

१०० ची खरेदी करणार आणि दोन हजाराची नोट देणार. सुट्टे द्या म्हटल तर आरडा-ओरडा करणार. एवढे बोलून त्यांनी शेजारी बसलेल्या त्याच्या सहकार्य कडे बघत मान हलवली प्रत्युत्तरा-दाखल सहकार्याने ही नाही तर काय या अर्थाची चिंतेची मान हळवली. तोपर्यंत ८० रुपये घेऊन त्या आजी गल्ल्यावर पैसे द्यायला आल्या.

अपेक्षेप्रमाणेच त्यांनी दोन हजाराची नोट काढली आणि त्याला दिली. त्याने हि दरवेळी प्रमाणे त्या बाईंकडे सुट्टे मागितले. आणि दरवेळे प्रमाणे त्यांची बडबड ऐकून अखेर १९२० त्या आज्जीना परत केले. चेहऱ्यावर किंचितही धन्यवादाची रेख न उमटवता त्या आजी निर्विकारपणे बाहेर पडण्याकरिता वळल्या.

त्या आजींच्या मागेच थोड्या अंतरावर उभा असलेला इसम उठला आणि गल्याकडे सरकला. आणि त्याने त्याच्या बिलाचे पैसे देऊ केलेत. पाठी मान वळवून त्या दरवाज्यातून बाहेर पडणाऱ्या त्या आजींकडे पाहिले आणि गल्ल्यावर बसलेल्या त्याला बोलला त्या आजींबद्दल तुमच मगाच बोलणं ऐकल.

पण तुम्हाला माहिती आहे का त्यांच हे असं करण्या-मागच नेमक कारण नक्कीच माहीत नसाव. त्या आज्जी डायबिटिक आहेत आणि तरीही त्या इथून मिठाई घेऊन जातात. ह्याच दुकानातून बर का आणि गेली दोन वर्ष खंड न पडता. हे अस करत आहेत.

त्या जेव्हापासून ते तिघेजण एक्सीडेंट होऊन हे जग सोडून गेले होते, ते त्यांचे विद्यार्थी होते. ते दहावीच्या परीक्षेत ९० च्या पेक्षा जास्त टक्के मिळवून उत्तीर्ण झाले होते. त्यांनी फोन वरूनच हे त्यांच्या बाईंना कळवले आणि त्यांच्या पाया पडायला घरी येतोय अस बोलले.

त्या दिवशी बाईंनी अत्यानंदाने येथूनच मिठाई घेतली. ५०१ ची तीन पाकीट तयार केली. आणि आपल्या घरी येत वाट बघत बसल्या त्या तिघांची येण्याची. पण ते तिघे आलेच नाहीत. तर आली त्यांची बातमी त्यांच्या रिक्षाला एका ताबा सुटलेल्या ट्रकन उडवल होत आणि जागीच ते तिघेही.

पंचवीस तारीख होती ती तेव्हापासून दर महिन्याच्या २५ तारखेला त्या बाई येथे या दुकानात येतात. मिठाई घेताना, ५०१ ची तीन पाकीट तयार करतात आणि वाट बघत बसतात. त्या तिघांची हे सगळ मला कस माहित असेल तुम्हाला अर्थातच प्रश्न पडला असेल.

तर ते अशा करता की मी, मी त्या तिघांपैकी एका मुलाचा बाबा आहे. मी आणि त्यापैकी दोन मुलांचे बाबा असे आम्ही ति घेदर महिन्याच्या २५ ला बाईन कडे जातो त्यांनी आणलेली मिठाई खातो त्यांच्याकडून ती पैशांची पाकीट घेतो आणि गरजू विद्यार्थ्यांना त्या पैशातून वह्या-पुस्तक घेतो. त्या बाईंना ह्यातल काहीच माहिती नाही.

त्यांच्या मनावर त्या घटनेचा इतका परिणाम झालाय की त्या बाई आम्हा तिघांना ते तीन मुल समजतात. गेली दोन वर्ष दर महिन्याच्या २५ तारखेला हे अगदी असेच घडते. तेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट आहे यापुढे म्हणजे पुढच्या २५ ला त्या बाईंकडे बघुन नाराज होऊ नका.

त्यांनी बंदे दिले तर त्यांची सुट्टे देण्यासाठी जमल्यास का-कू करू नका. चला आता निघायला हव मला बाकी दोघांना भेटून त्या बाईंच्या घरी जायचय. इतक बोलून तो माणूस तिथून निघाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसले गल्ल्यावर बसलेला तो आणि बाजूला बसलेला त्याचा सहकारी.

अगदी निशब्द पणे एकमेकांकडे पाहात मग त्यांनी उघड्या गल्ल्यातील पैशांकडे पाहिले. त्या दोघांनाही जणू आज खरी जाण आली होती बंदे आणि सुट्टे यातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *