स्वामी समर्थांचे व्रत कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो स्वामींचे व्रत कसे करावे इच्छापूर्तीसाठी हे व्रत खूप लाभदायक मानले जाते. हे व्रत गुरुवारचे व्रत म्हणून ओळखले जाते . गुरुवारची नियमित स्वामी व्रत करायचे असेल तर ते या रीतीने करावे. जे कोणीही सहज करू शकतात स्त्री पुरुष दोघांनी हे व्रत करता येऊ शकेल व्रत शीघ्र फलदायी आहे. आता व्रताचा विधी कोणता तर जे लोक अक्कलकोट स्वामींचे भक्त आहेत त्यांनी हे व्रत करावे. अत्यंत शीघ्रफलदायी हे व्रत आहे.

जर गुरुवारी स्वामींचा उपवास करावा. सकाळी दूध आणि फराळ किंवा फळ तुम्ही खाऊ शकतात. दुपारी चहा कॉफी वेफर्स बटाटा चिवडा किंवा राजगिऱ्याचे लाडू खाल्ले तरी चालतील. उपवासाची व्रताची सुरुवात सकाळी स्वामी समर्थांच्या पूजेने करावी. स्वामींचे पंचोपचार पूजा करून त्यांना मनोभावे नमस्कार करावा. तुपाचा दीप अष्टगंध उदबत्ती केवढा धूप चमेलीचे अत्तर अक्षदा आणि प्रसादाला पाच पिवळे छोटे पेढे ठेवावेत.

सकाळी स्वामी समर्थांचे स्तोत्र मनोभावे एकदा वाचावे. आपल्याला आवडणारा स्वामींच्या मंत्र किमान 11 वेळा व जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळा म्हणावा. नंतर आपल्या दिनचर्या सुरुवात करावी नियमित केले तर उत्तम नाहीतर रात्री आपण नेहमी दर्शनासाठी जात असलेल्या मठात जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे.

स्वामी चरणी भगवी फुले व्हावीत. आणि स्वामी चरित्रास अध्याय चौदावा शांतपणे वाचावा. स्वामींच्या चरणी मोक्ष प्राप्ती आणि गृहस्था सौख्यासाठी प्रार्थना करावी. आणि मग घरी परतावे. मठात केंद्रात जाणे शक्य नसेल तर घरीच ही क्रिया म्हणजे दर्शन तुम्ही घेऊ शकतात.

आता उपवास कसा सोडावा उपवास सोडण्यापूर्वी दत्त बावनी या पारायणाच्या पोथीचे पठण करून दत्त व स्वामींना नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे. हे व्रत कोणी करावे व कशासाठी करावे हे व्रत स्त्री-पुरुष दोघांनीही करावे. हे व्रत सौभाग्य आरोग्य संतती प्राप्तीसाठी संततीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत तुम्ही करू शकता. स्वामींची सेवा म्हणूनही तुम्हाला हे व्रत करता येऊ शकते.

या व्रतामुळे आरोग्याचे प्रश्न सुटतील ज्यांना मुलं नाहीत त्यांना लाभ होईल. आता हे व्रत किती गुरुवार करावे. तर कमीत कमी २१ गुरुवार हे व्रत तुम्ही करायचे किंवा आपली जी समस्या आपली जी इच्छा आहे पूर्ण होईपर्यंत किंवा समस्या सुटेपर्यंत हे परत तुम्ही करायचे आहे.

उद्यापण आपली समस्या सुटल्यावर किंवा २१ गुरुवार पूर्ण झाल्यावर स्वामीं जवळ नारळ व अक्षदा मठात जाऊन ठेवायचे व स्वामींचा आभार मानायचे व मनोभावे नमस्कार करून व्रताची सांगता करत असल्याचे ते बोलायचे.

मित्रांनो स्वामी भक्तांचे स्वामींच्या चरणाची सेवा करण्यासाठी नियमित करायचे व्रत म्हणजे गुरुवारचे स्वामी व्रत तर तुम्ही हे व्रत अवश्य करा. तुम्हालाही शीघ्र फलप्राप्ती होईल तुमची इच्छा पूर्ण होईल. मनोभावाने विश्वासाने तुम्हाला हे व्रत करायचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *