जर तुमची कुलदेवी श्री रेणुका माता असेल तर रोज ही सेवा करा.. आयुष्य उजळून जाईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जर तुमची कुलदेवी श्री रेणुका माता असेल तर रोज तुम्ही ही सेवा अवश्य करावी. माहूरवासीनी कुलदेवी माता जर तुमच्या परिवाराची तुमच्या कुळाची कुलदेवी असेल तर तुम्ही दररोज मातीची ही सेवा अवश्य करावी. करायलाच पाहिजे. मित्रांनो जेव्हा आपण कुलदेवीची सेवा हे दररोज नित्य नियमाने करतो खास करून सकाळी करतो त्या घरामध्ये कुळदेवीचा आशीर्वाद राहतो.

देवीची कृपा राहते आणि त्या घरावर कोणतीही विपती कोणतीही अडचण कोणतेही संकट येत नाही आणि येणारे विघ्न टळून जातात आणि त्या घरात समृद्धी नांदते. त्या घरामध्ये पैसा येतो त्या घरातल्या लोकांच्या आरोग्य चांगले राहते.म्हणून सांगितले जाते कि, त्या घरात पैसा येतो त्या घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. ते घर खुशाल राहते. म्हणून सांगितल जात की आपल्या कुळाची जी देवी असेल त्या देवीची सेवा आपण अवश्य करायला पाहिजे.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला माहूरवासीनी माता यांची सेवा सांगणार आहोत. परंतु जर तुमची कुलस्वामिनी रेणुका माता नसेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये तुमची कुलस्वामिनी कोणती आहे त्या देवीचे नाव लिहून आम्हाला सांगा. तुम्हाला दोनच गोष्टी करायचा आहेत आणि ही सेवा एकतर करती महिला म्हणजे त्या घराची मुख्य महिला किंवा मुख्य पुरुषाने केली तर लाभ संपूर्ण घराला कुटुंबाला होतो.

ही सेवा देवघरा समोर बसून आपण करायचे आहे. आपण सगळ्यात आधी जर आपली कुलस्वामिनी रेणुका माता असेल तर रेणुका मातेची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरात देवघरात स्थापन करावा आणि दररोज आपल्या कुलदेवी श्री रेणुका माता यांच्या मंत्राचा जप एक माळ आपल्याला करायचा आहे.हा मंत्रजप काही असा आहे. ‘ श्री रेणुकयै नमः ‘

या मंत्राचा जप एक माळ करायचा आणि त्यानंतर तुम्ही श्री रेणुका स्तोत्र एक वेळेस तुम्हाला वाचायचा आहे. आता प्रश्न पडेल की,श्री रेणुका स्तोत्र कुठे मिळेल तर जेव्हा आपण माहूरगडला कुळदेवीच्या दर्शनाला जातो. तिथे रेणुका मातेचे स्तोत्राची पोथी तुम्हाला मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *