माहेरून या ३ गोष्टी चुकूनही आणू नये. नाहीतर तर होऊ शकतात आयुष्यात नको त्या गोष्टी.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

लग्नानंतर माहेराहून कधीही अशा वस्तू आणू नये त्याचा विपरीत परिणाम पुढे आपल्या जीवनावर आणि संसारावर होऊ शकतो. मुली सासरी निघाली असताना काही गोष्टी तिला चूकूनही दिल्या जात नाही याबद्दल शास्त्र आणि तज्ञ काय सांगतात चला जाणून घेऊया.

शास्त्रानुसार मुलीला कधीच माहेरकडून लोणचं देऊ नये असे म्हणतात. कारण यामुळे नात्यात अडचणी येऊ शकतात. सासरी जात असलेल्या मुलीला कधीही लोणचं दिल्याने तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आणि नातेसंबंधही बिघडू शकतात.

लोणच्याची चव ही आंबट असल्याने ती भेट म्हणून देणं योग्य नाही असं म्हणतात. मुलीला हाताने बनवलेले लोणचं द्यायचं असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचं बनवून द्यावं असं सांगितल जात. कारण ज्या घरी माहेरून सासरी जाण्यासाठी मुलीला लोणचे दिले जात त्या घरी मुलगी कधी सुखी राहू शकत नाही.

तिला मानसिक शारीरिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शिवाय सासरच्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोमणे मारू शकतात. त्यामुळे विवाहित मुलीला कधीच लोणचं देऊ नये असे सांगितले जात.

आता शास्त्रानुसार लोणचेच नाही तर झाडू, सुई, चाळणी किंवा मिरची यासारख्या वस्तू देखील मुलीला माहेरुन देऊ नये. असं केल्यास त्याचे वाईट परिणाम होतात अशी ही मान्यता आहे. आता ही दुसरी वस्तू आहे झाडू म्हणजे माता लक्ष्मी वास करते.

मात्र मुलीला सासरी पाठवताना किंवा माहेरुन मुलगी सासरी जात असताना झाडू कधीही नेऊ नये असे सांगितले जात. कारण असे मान्यता आहे की जर मुलीला आपण झाडू घेऊन सासरे पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो.

त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही. तिचं जीवन दुखान भरलेलं असतं त्याचबरोबर सुई किंवा कोणतीही टोकदार वस्तू मुलीने माहेरून घेऊन जाऊ नये. मुलगी आई-वडिलांचा निरोप घेते आई वडील सुद्धा मुलीचा निरोप देतात. त्यावेळी अशा वस्तू दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता निर्माण होते.

त्यामुळे अशा वस्तू देणे टाळावे. कारण बऱ्याचदा आई-वडील मुलीच्या प्रत्येक सुखाच्या सोयीची काळजी घेत असतात. म्हणून घरात लागणाऱ्या बारीक सारीक वस्तू पासून मोठ्या वस्तूंपर्यंत सगळं काही देत असतात.

अशातच मुलगी ही आपल्या सासरी काही गोष्टी नाही म्हणून बाहेरून घेऊन जाते. अशा वेळी चुकूनही या तीन महत्त्वाच्या गोष्टी माहेरून सासरी घेऊन जाऊ नये. असे सांगितले जात की साफसफाईच्या संदर्भातील कोणतीही वस्तू आपण माहेरून सासरी घेऊन जाऊ नये असं म्हणतात.

यामुळे आपल्या आयुष्यात दुःख कोसळू शकतं अशी ही मान्यता आहे. या तीन वस्तू व्यतिरिक्त आणखी एक वस्तू अशी आहे ती म्हणजे चालणी ही सुद्धा चुकूनही माहेरून आपल्या सासरी घेऊन जाऊ नये. फक्त पाठवण्याच्या वेळी नाही तर विवाहित मुलीला चाळणी कधीही भेट म्हणून आई-वडिलांनी देऊ नये असेही सांगितले जात.

त्याच बरोबर हिंदू धर्मातील ज्योतिष शास्त्रानुसार नुकतीच लग्न झालेली मुलगी असेल खास करून त्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नसतील त्यांनी कधीही मुलीला बुधवार या दिवशी सासरी पाठवू नये अशी ही मान्यता आहे. मुलींचे लग्न झाल्यानंतर तिची पाठवणी असते त्याचबरोबर जेव्हा ती माहेरी येते आणि परत सासरी जाते तेव्हाही तिची पाठवणी केली जाते.

पण ही पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये. कारण त्याचे काही शास्त्रात महत्त्वाचे कारण सांगितले आहेत. यामध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी मानला अशुभ जातो. कारण बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात. म्हणून नवीन वधूचं किंवा नुकतेच नवीन लग्न झालेल्या मुलींचे बुधवारी प्रवास करणार हे अशुभ मानलं जात.

त्याचबरोबर आई-वडिलांच्या घरी मुलींचे लाड पुरवले जातात. त्यांना प्रेम दिले जात आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि याच गोष्टी सासरच्या घरी मिळाव्यात ही प्रत्येक मुलीची आशा असते.
मात्र या गोष्टी तुम्हालाही सासरच्या घरी मिळू शकतात. त्यासाठी फक्त लाभलोभ या तीन गोष्टी सोडून सासरी प्रवेश केला तर त्याची खूप चांगले परिणाम लग्न झालेल्या मुलीला मिळू शकतात.

आणि अगदी आई-वडिलांच्या घरचे प्रेम तिला सासरी सुद्धा मिळू शकत. तिचे लाड पुरवले जाऊ शकतात. असे सांगितले जाते लग्नानंतर माहेरुन सासरी जाताना कोणत्या गोष्टी मुलीने घेऊन जाव्यात कोणत्या घेऊन जाऊ नये. याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा.

तुमचे सुद्धा नवीन लग्न झाले असेल तर तुम्ही माहेरून कोणत्या गोष्टी आणल्या हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *