वटपौर्णिमा वडाच्या पूजेत म्हणा हे २ शब्द आयुष्यभर सुख मिळेल..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला असते वटपौर्णिमा आणि तीच वटपौर्णिमा आलेली आहे या वटपौर्णिमेला महिला मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वटवृक्षाला सुती धागा सुद्धा गुंडाळतात वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि त्याचबरोबर प्रार्थना करतात की माझ्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो सुख समृद्धी लाभो तसेच सगळ्यांची प्रगती होत राहो. होत नसेल तर ती व्हावी अशी प्रार्थना सुद्धा अनेक महिलांकडून वटवृक्षाला केली जाते.

महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना आणि सुती धागा गुंडाळताना काही मंत्रांचा जप आवश्यक करावा. त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते अस म्हटल जात.पण कोणता आहे तो मंत्र चला जाणून घेऊया.

वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना तुम्हाला पुढील प्रमाणे मंत्र म्हणायचा आहे. मंत्राचा आहे, “सावित्री ब्रम्ह सावित्री सर्वदा प्रियभाषणी | तेन सत्येन मां पाही दुःख संसार सागरात | अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते | अवियोगो तथास्मकां भूयात जन्मनी जन्मनी ||अशाप्रकारे प्रदक्षिणा घालताना स्त्रियांनी या मंत्राचा जप करावा आणि वडाची पूजा केल्यानंतर नामस्मरण देखील आवश्यक कराव. नामस्मरणासाठी पुढील प्रमाणे मंत्र म्हणावा, ” वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना:| वटाग्रे तू शिवो देव:सावित्री वटसंश्रिता || अशाप्रकारे आपण नामस्मरण करावे आणि सगळ्यात शेवटी आपण सावित्री मातेची आरती सुद्धा आवश्यक म्हणा.

हे पाठ केल्यानंतर आपल्या पतीच्या तसेच कुटुंबातील लोकांच्या आरोग्य तसेच घरातील काही संकटातील तर ती सर्व दूर व्हावी यासाठी आपण वटवृक्षाकडे प्रार्थना करावी. तसंच वटपौर्णिमेच्या दिवशी पती आणि पत्नी दोघांनी सुद्धा मांसाहार करू नये. खोटं बोलू नये कुठलाही अनैतिक काम करू नये तसेच या दिवशी महिला वर्ग तर उपवास ठेवतोच.

पण त्याचा मनोबल वाढवण्यासाठी पतीदेव सुद्धा उपवास ठेवू शकतात त्यामुळे पती-पत्नीचा नातं घट्ट होणार आहे आणि त्यांच्या नात्यांमधली गोडी सुद्धा वाढणार आहे. मग मंडळी तुमच्यापैकी कोण कोण वटपौर्णिमेला पत्नीचे मनोबल वाढावं यासाठी उपवास ठेवत बर ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

सत्यवान आणि सावित्रीची कथा सगळ्यांनाच माहित आहे. सावित्रीने आपल्या अल्पयुषी असणाऱ्या नवऱ्याला स्वतःची पतीनिष्ठा बुद्धिमत्ता आणि नम्रता यांचा वापर करून यमधर्माकडून जीवनदान मिळून आणि ही कथा वटवृक्षाखाली घडली आणि म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. पण या सगळ्यात मधल्या मध्ये वडाच्या झाडाला दोरा का बांधला जातो. हा प्रश्न खरंतर महिला आणि पुरुष सगळ्यांच्याच मनात येत असणार हो ना याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा काम आम्ही करणार आहोत.

दोरा का गुंडाळतात यासंदर्भात असं सांगण्यात येत की, वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदांवर असणाऱ्या सूक्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. तर ज्यावेळी विवाहित महिला वडाच्या झाडाला मुख्यत्वे सुती दौरा गुंडाळतात आणि त्याची पूजा करतात.

त्यावेळी जीवाच्या मनातील भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात आणि सुती दोरा गुंडाळल्याने त्यामधील पृथ्वी आणि आपण या तत्त्वांच्या संयोगाने या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात. मंडळी शेवटी भाव तिथे देव अस म्हटल गेल आहे.

दोरा का गुंडाला जातो या प्रश्नाचे एक उत्तर असंही सांगण्यात येत की जेष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्यांना कोंब फुटायला सुरुवात होते. पावसाळ्यात हे कोण चांगले मोठे होतात पावसाळ्यात हवेतील बदलांमुळे होणाऱ्या आजारांवर वडाच्या पारंब्या हे उत्तम औषध आहे. वडाच्या पारंब्या हाताशी असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच लोमंकडून झोका खेळतात. हल्लीच्या काळातला माहीत नाही पण पूर्वीच्या काळी हा सगळ्यांचा आवडता खेळ होता.

त्यावेळी हे कोण नष्ट होण्याची शक्यता असायची म्हणून पूजा करताना झाडाला दोरा बांधण्याची प्रथा असावी. कारण त्यामुळे झाडाची पूजा झाली आहे हे कळते आणि निदान काही दिवस तरी कोणी त्याला लोमकळत नसावे.

आणि त्यामुळे पारंब्याच्या कोंबाचे रक्षण होऊन त्याचा उपयोग औषधांमध्ये केला जावा काही उद्देश असू शकतो. मंडळी खरंतर अर्थ निष्कर्ष अनेक काढता येतील पण धार्मिकतेमधून माणसांना निसर्गाशी जोडण्याचा हा आपल्या पूर्वजांचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणायचा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *