राशींनुसार तुमची ‘इष्ट देवता’ कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुम्हाला तुमची इष्ट देवता माहिती आहे का ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या इष्ट देवतेची पूजा आराधना केल्याने आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा होते. शिवाय इष्ट देवतेच्या उपासनेने यश पद प्रतिष्ठा आणि संपत्तीच सुखही प्राप्त होऊ शकत. ज्योतिष शास्त्रानुसार राशीवरून आपली इष्ट देवता जाणून घेता येऊ शकते का? मग तुमच्या राशीनुसार तुमची इष्ट देवता कोण आहे चला या संबंधित संपूर्ण माहिती समजून घेऊया. आता स्वतःची इष्ट देवता कोणती हे कस ओळखावे.

तुम्हाला जी देवता आवडते जिच पूजन आणि साधना करायला मनापासून फार आवडत त्या देवतेला इष्ट देवता म्हणतात. देवता किंवा देव तीन प्रकारचे असू शकतात त्यात कुलदेवता ग्रामदेवता आणि इष्ट देवता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह नक्षत्र यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडत असतो.

व्यक्ती जेव्हा जन्म होत तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावरून व्यक्तीची जन्मराशी ठरू शकते. यावरूनच व्यक्तीचे गुण स्वभाव आवड निवड यांसारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. तसेच यामध्ये आपल्या राशीनुसार आपली इष्ट देवता कोण आहे हे देखील सांगितल्या जात.

हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवाची पूजा आराधना करू शकतो. पण आपल्या इष्ट देवाची पूजा करणे देखील आपल्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जात. कारण इष्ट देवतेचा संबंध आपले कर्म आणि जीवनाशी संबंधित असतो. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या इष्ट देवतेची पूजा आराधना केल्याने आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा प्राप्त होते. आता राशीनुसार तुमची इष्ट देवता कोण आहे हे जाणून घेऊया.

१) मेष आणि वृश्चिक रास – मेष शनी वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगल असल्यामुळे या दोन्ही राशींची देवता एकच आहे. या राशींच्या व्यक्तींची इष्ट देवता भगवान श्री हनुमान आहेत. त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र देखील आहेत. यामुळे या राशींच्या व्यक्तींनी भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्री हनुमान यांची पूजा आराधना करण्यास सांगितल्या जात.

२) वृषभ आणि तूळ रास- वृषभ आणि तूळ या राशींचा स्वामीग्रह शुक्रा असल्यामुळे या राशींच्या व्यक्तींची इष्ट देवता देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा आहे. यांनी नेहमी या देवतांची उपासना करावी अस सांगितल जात.

३) मिथुन आणि कन्या रास – मिथुन आणि कन्या या राशींचा स्वामीग्रह बुध आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी श्री गणेश आणि भगवान श्रीहरी विष्णू ची पूजा आराधना करण्याचा सल्ला दिला जातो.

४) कर्क रास – कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे त्यामुळे या व्यक्तीने नेहमी महादेवाची आराधना करावी. या राशीच्या व्यक्तीवर महादेव सदैव प्रसन्न राहतात असे म्हणतात.

५) सिंह रास- या राशींच्या व्यक्तींनी नेहमी श्री हनुमान आणि गायत्री देवीची पूजा उपसना करावी असे म्हणतात. ज्यामुळे ते सदैव तुमच्या पाठीशी असतील.

६) धनु आणि मीन रास – धनु आणि मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. त्यामुळे या व्यक्तींनी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची त्याच बरोबर दत्तगुरूंची पूजा आराधना करण्याचा सल्ला दिला जातो.

७) मकर आणि कुंभ रास – मकर आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी असल्याने या व्यक्तींनी नेहमी महादेव आणि भगवान श्री हनुमंताची पूजा करावी असे म्हणतात.

ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या इष्ट देवतेची पूजा केल्याने लवकर फल प्राप्ती होऊ शकते. परंतु इष्ट देवते सोबतच तुम्ही आपल्या आवडत्या देवांची देखील पूजा आराधना करू शकता.आधी सांगितल्याप्रमाणे स्वतःची इष्ट देवता कोणती हे कसं ओळखावं तर तुम्हाला जी देवता आवडते तिचं पूजन आणि साधना करायला मनापासून आवडते त्या देवतेला आपण इष्ट देवता म्हणतो.

देवता किंवा देव तीन प्रकारचे असतात ज्यामध्ये तुमची कुलदेवता असू शकते ग्रामदेवता असू शकते किंवा इष्ट देव असू शकतात आता तुम्ही कोणत्याही देवांची पूजा किंवा साधना करावी पण एक अलिखित नियम आहे की सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी. नंतर गुरूंची पूजा करावी गुरु नसेल तर दत्तगुरूंची पूजा करावी नंतर आपल्या कुलदेवतेची पूजा करावी नंतर ग्रामदेवतेची पूजा करावी आणि शेवटी आपल्या इष्ट देवतेची पूजा करावी.

शिवाय असे म्हणतात की मागील जन्मामध्ये आपण त्या देवतेची पूजा किंवा साधना केली होती पण ती साधना अपूर्ण असताना जर आपल्याला मृत्यू आला तरी या जन्मात ती साधना पूर्ण व्हावी म्हणून आपल्या मनामध्ये तिच्याविषयी आवड निर्माण होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *