वटपौर्णिमा पूजेची तयारी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती येथे..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो..

२१ जून २०२४ ला यंदा वटपौर्णिमा आलेली आहे आणि या वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करावी या पूजेमध्ये कुठल साहित्य हव कोणत्या गोष्टी असतात कधी कधी छोट्या-मोठ्या गोष्टी आपण विसरून जातो. म्हणूनच पूजेची तयारी करण्याआधी ही माहिती एकदा संपूर्ण वाचा. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभमुहूर्त काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. आता बोलूया वटपौर्णिमेबद्दल ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथे यंदा शुक्रवारी २१ जूनला आहे आणि याच दिवशी वटपौर्णिमेचे व्रत केले जाईल.

पौर्णिमेला सुरुवात होणार आहे सकाळी ०७:३१ मिनिटांनी आणि पोर्णिमा समाप्ती होणार आहे,२२जूनला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३७ मिनिटांनी आता सगळ्यात आधी जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे. वडाच्या झाडाला पुजण्यासाठी शुभ मुहूर्त असणारे सकाळी ०५:२४ मिनिटांपासून ते सकाळी १०:३० मिनिटांपर्यंतचा म्हणजे अगदी सकाळी सकाळी पूजा केली तर ती शुभ मुहूर्त होणार आहे. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामागे काही मुख्य कारण आहेत.

धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. वटवृक्षामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो अस म्हटल जात म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश हे वटवृक्षांमध्ये असतात अस म्हटल जात. त्याचबरोबर वटवृक्षासारखं दीर्घायुष्य हे आपल्या पतीला लावावे अशी कामना सुद्धा सर्व स्त्रिया करत असतात. वटवृक्षाचे धार्मिक महत्त्व आहे तसेच वटवृक्ष हा अत्यंत औषधी गुणधर्मांनी युक्त असा वृक्ष आहे.

आणि म्हणून या वृक्षाचे जनमानसात महत्व पटावं यासाठीच आपल्या पूर्वजांनी वटवृक्षाची पूजा करायला सांगितलेली आहे. पण या निमित्ताने पूजा करत असताना वटवृक्षाचे औषधी महत्त्व सुद्धा लक्षात घ्यायला हव आणि या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याबरोबरच शक्य असेल तर एखादा वटवृक्ष रावणाचा संकल्पही करायला हवा आणि लावता आला तर वटवृक्ष नक्की लावायला हवा.

आता बघूया वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करायची आहे. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे. साहित्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी लागणारे कलश शुद्ध पाणी भरलेला,त्यानंतर आपल्याला लागणार आहे विड्यासाठी विड्याची पानं हळकुंड, सुपारी, खारीक,खोबर, बदाम, दक्षिण. त्याचबरोबर पंचामृत पंचामृत नसेल तर तुम्ही दूध घेतलं तरी चालेल, तुपाचा दिवा,तेलाचा दिवा, हळद कुंकू, अक्षदा,कापूर, उदबत्ती, काडीपेटी, फुल, वस्त्रमाळ, गणपतीसाठी सुपारी हे साहित्य आपल्याला प्रत्येक पूजेत लागतात.

कुठल्याही पूजेमध्ये हे साहित्य कॉमन असतं पण वटसावित्रीच्या पूजेला नक्की कुठल्या वेगळ्या साहित्य असतं तर ते वटसावित्रीच्या पूजेला आपल्याला लागतात आंबे कारण आंब्यांनीच आपण सावित्रीची ओटी भरीत असतो. त्याचबरोबर लागतो खन तसंच सौभाग्याचा लेण त्याच्यामध्ये आरसा बांगड्या आणि कुंकवाचा करंडा, कंगवा आणि काळी पोत तसेच ओटीसाठी गहू लक्षात घ्यायचा आहे सावित्रीची ओटी आपल्याला गव्हाणे भरायची आहे.

कोटीमध्ये खोबरं दक्षिणा खारीक हळकुंड सुपारी आणि बदाम त्याचबरोबर आपण साधारणतः ओटी नारळाने भरतो पण सावित्रीची ओटी मात्र आंब्याने भरायची आहे. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाच आपल्याला हवी आहे सुती धागा वडाला सुतवायला अर्थात वडाला बांधायला सात फेरे वडाला मारायचे आहेत आणि सात वेळा हा दोरा वडाला गुंतळायचा आहे.

याप्रमाणे साहित्याची सगळी तयारी झाल्यानंतर जायच वडाची पूजा करायला आणि वडाची पूजा झाल्यानंतर पाच सुहासिनींची ओटी भरायची.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *