शवयात्रेत सर्वात अगोदर पुढे मडके का नेले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मात जन्मापासून तर मृत्यूपर्यंत असे एकूण सोळा संस्कार केले जातात. या सोळा संस्कारांपैकीच शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार या सर्व संस्कारांबद्दल अनेक मान्यता आणि परंपरा आहेत. यांचे पालन आजही केले जाते. हिंदू धर्मात प्रेताला दहन केले जाते तर इतर काही धर्मांमध्ये प्रेताला दफन केले जाते. हिंदू धर्मात ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी अंतिम संस्काराच्या वेळी अनेक परंपरांचे आणि प्रथांचे पालन केले जाते.

अनेक प्रकारचे विधी अंतिम संस्कारात केले जातात. जसे मृत व्यक्तीचे डोके घराकडे आणि पाय घराबाहेर जातील अशा प्रकारे शरीर ठेवले जाते. डोक्याजवळ अगरबत्ती लावल्या जातात शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो. मृत शरीराला शुद्ध तूप लावले जाते. तसेच जोपर्यंत त्या मृत शरीराचा अंतिम संस्काराचा विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या मृत शरीराला एकटे सोडले जात नाही. कोण आहे ना कोणी त्या मृत शरीरा जवळ बसून राहतात.

या सर्व रूढी परंपरा मागे काही ना काही शास्त्र आहे. मग ते धार्मिक कारण असेल वैज्ञानिक कारण असे किंवा मनोवैद्यानिक कारण असेल. परंतु या सर्व विधी मांगे काहींना कारण हे काही ना काही कारण हे जरूर असते. या सर्व परंपरांमध्ये एक अशी परंपरा आहे ती शवयात्रा निघाली निघाली असताना त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य सर्वात पुढे एका दोरीला बांधून मडके घेऊन चालत असतो.

हे मडके सोबत का घेऊन जातात आणि असे काय असते त्या मडक्यात जे सोबत घेऊन जावे लागते. चला तर जाणून घेऊया. व्यक्तीचा मृत्यू झाला की लगेचच त्या व्यक्तीच्या घराबाहेर शेणाची गौरी पेटवली जाते. जी शवयात्रा निघण्यापूर्वी पर्यंत हळूहळू संपूर्ण पेटून जाते. अंतिम यात्रा निघण्यापूर्वी एका छोट्याशा मडक्यात ही पेटवलेली गौरी ठेवली जाते आणि दोरीने बांधून ते मडके हातात घेतले जाते.

मृत व्यक्तीच्या कुटुंबातील कोणीही एक सदस्य हे मडके दोरीने धरून पुढे घेऊन चालतात. ज्यावेळी अंतिम संस्काराच्या ठिकाणी जातात तेव्हा काही अंतिम विधी केले जातात. त्यानंतर त्या मडक्यातील पेटलेली ती शेणाची गौरी कोरड्या गवतावर टाकली जाते. त्यामुळे ते गवत लगेचच पेट घेते आणि त्यातूनच सगळे घेऊन मुख अग्नी दिला जातो. म्हणजेच चिता पेटवली जाते.

यामागे असा अर्थ आहे की घरून अग्नी आणून त्या अग्नीने त्या मृत व्यक्तीला अग्निदान दिल जातो. म्हणजेच व्यक्तीला सर्वात शेवटचा अग्नी हा स्वतःच्या घरातला दिला जातो. तर मग आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की अंतिम संस्कारात घरून आणलेला अगणित का वापरला जातो. तर पूर्वीच्या काळी विवाहाच्या वेळी वर वधूच्या अग्नीचे सात फेरे घेत असत.

त्यातीलच अग्नी घरात कायम ठेवत असत आणि घरात होम हवन पूजा धार्मिक विधी काहीही असेल तर त्यातीलच अग्नी घेऊन ते धार्मिक कार्य केले जात असे आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्यातीलच अग्नी घडून घेऊन जात असत आणि त्याद्वारे अग्नीडाग दिला जात असे. परंतु हळूहळू ती परंपरा लुप्त होत गेली आणि बंद पडली.

म्हणून त्या प्रथेचे अनुकरण म्हणून अंतिम संस्काराच्या वेळी वृत्तकाच्या घरूनच अग्नी सोबत नेला जातो व त्याद्वारे अग्नीडाग दिला जातो. म्हणजेच मृत्यूच्या वेळी १६ संस्कारांपैकी शेवटच्या संस्कारात मृत व्यक्ती स्वतःच या शेवटच्या यज्ञात स्वाहा होऊन जातो. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की व्यक्तीचा मृत्यू झाला की त्या शवयात्रेबरोबर मडके सोबत का नेले जाते. त्यात काय असते आणि त्याचा काय उपयोग केला जातो ते..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *