लग्न करणे का गरजेचे आहे खूप लोकांना माहीतच नाही का करावे लग्न?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो..!

लग्न म्हटले की, अनेकांच्या मनात उकळ्या फुटतात. लग्न असे करावे लग्न तसे करावे थाटामाटात लग्न व्हावे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु काही व्यक्तींच्या मनात लग्नाविषयी भीती असते. त्यांना वाटते की मी लग्न केले तर माझे स्वातंत्र्य हिरावून जाईल. मी स्वच्छंदीपणे जीवन जगू शकणार नाही हे काही हौशी जरी खर असले तरी लग्न न करणे हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही.

असे म्हणतात की मुले वयात आली की त्यांचे लग्न लावून त्यांच्या पायात बेड्या घालाव्यात म्हणजे ते जमिनीवर राहतात. जास्त हवेत उडत नाहीत. योग्य वेळी जर त्यांना विवाह बंधनात अडकवले नाही तर त्यांच्या जीवनाला योग्य दिशा भेटत नाही. आपल्याला जेवणात काय करायचे कशासाठी करायचे यासाठी योग्य दिशा कोणती हे आपल्याला लग्नामुळे समजते.

ठीक आहे लग्नानंतर आपल्यावर भरपूर जबाबदाऱ्या पडतात आपल्याला काही हक्क मिळतात तर काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. परंतु त्या हक्क आणि कर्तव्यातूनही जो आनंद आणि सुख मिळते ते इतर कशातच नसते. लग्नानंतर पती-पत्नीला एकमेकांना एकमेकांच्या कुटुंबाला सांभाळून घ्यावे. त्यांच्यामुळे एक नवीन जीव या सृष्टीत येतो त्यांचे संगोपन त्याचे पालन पोषण ही एक नवीन या नवीन जबाबदारीतून आपल्याला जो आनंद मिळतो ना तो आवरणारी असतो.

या सृष्टीत आई-वडील होण्याचा जो आनंद आहे ना तो इतर कशातच नाही. ते बालक त्याचे बोबडे बोल त्याचा हट्ट सर्व काही ती गोड किती गोड असते. लग्न न करता मनुष्य अपूर्ण असतो. लग्नानंतरच तो परिपूर्ण होतो. पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात. पत्नी पतीची अर्धांगिनी असते. पती-पत्नी एकमेकांमुळे आनंदित राहू शकतात.

लग्नाला झालेल्या व्यक्तीच्या दुःखापेक्षा लग्न करून जबाबदारीमुळे आलेले दुःख हे नक्कीच कमी असते. त्याशिवाय लग्नानंतर आलेल्या दुःखात सगळे वाटेकरी असतात परंतु अविवाहिताचे दुःख हे त्याचे एकट्याचे दुःख असते. लग्न पूर्वी फक्त चार भिंती असतात लग्नानंतर ते घर बनते. लग्नानंतर व्यक्ती परिपक्व होतात चांगल्या वाईट यातील अंतर त्यांना समजते.

वैवाहिक जीवनाचा अनुभव आपल्या कुटुंबाचे सुख आणि कुटुंबाचे जबाबदारी कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी केलेली धडपड हे सर्व व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यकच आहे. त्याशिवाय व्यक्तीचा विकास होणे शक्यच नाही. लग्नानंतर व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावले जाते असे म्हणतात. परंतु यामुळे त्याच्या जीवनाला आकार येतो. नाहीतर अविवाहित मनुष्य बेलगाम घोड्यासारखे उधळत असतात.

त्यांना लगाम घालण्यात घालायचा असेल तर त्यासाठी विवाह हाच एकमेव मार्ग आहे. जर एखाद्या व्यक्तीचे लग्न झाले नसेल तर तो स्वतः स्वतःची सर्व कामे करीत असेल त्याचे जीवन जगत असेल तर त्या व्यक्तीकडे पाहून कधीही आनंद वाटत नाही. अशा व्यक्तीकडे पाहून एकटेपणा जाणवतो. मन थोडे दूषित होते.

पती-पत्नी त्यांची मुले मुली असे भरलेले घर असेल तर त्या घराकडे पाहून मनालाही आनंद वाटतो म्हणून विवाह करून आपले जीवन सुखा समाधानात व्यतीत करणेच योग्य आहे. शिवाय भगवंतांच्या कोणत्याही कार्यात एकट्या पुरुषाला किंवा एकट्या स्त्रीला पूजेत स्थान नसते.

कोणत्याही पूजेसाठी पती-पत्नी दोघांची जोडी असेल तरच ती पूजा संपूर्ण मानले जाते. त्याशिवाय ते पूजन अपूर्ण असते. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की स्त्री असेल किंवा पुरुष मुलगा असेल किंवा मुलगी त्यांनी लग्न का करावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *