घरात या रंगाचे लावा पडदे होईल मोठा फायदा. अचानक होईल घरात भरभराट.

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी.

घरात या रंगाच्या डावा पडते होईल मोठा फायदा तुम्ही तुमच्या घरात कोणत्या रंगाचे पडदे लावले अर्थात तुम्ही तुमच्या आवडीचे लावले असतील पण तुम्हाला हे माहिती आहे का ? वास्तुशास्त्रात देखील सांगितले आहे की घरात कोणत्या खोलीमध्ये कोणत्या रंगाचे पडदे लावल्यामुळे त्याचा आपल्या घरावर चांगला परिणाम होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तिथल्या लोकांचे मन प्रसन्न राहते .

घरात असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा परिणाम घरात राहणाऱ्या सदस्यांवर होत असतो घरातले पडदे घराचे सौंदर्य वाढवतात तसेच सूर्यप्रकाश आणि धुळीपासून घराचे संरक्षण देखील करतात वास्तुशास्त्रात घरातील पडद्यांशी संबंधित काही खास नियम सांगितले आहेत पडद्याशी संबंधित वास्तूचे नियम न पाळल्याने देखील नुकसान होण्याचे शक्यता निर्माण होते चला तर मग जाणून घेऊयात घरात कोणत्या खोलीमध्ये कोणत्या प्रकारचा पडदा लावावा.

ड्रॉइंग रूम- ड्रॉइंग रूम किंवा घरात पाहुण्यांसाठी वेगळी खोली असेल तर तिथे गडद रंगाचे पडदे लावा किंवा ग्रीन रंगाचे पडदे लावा कारण असे मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मकता कायम राहते आणि घरात सुख संपत्ती येते. घरातील प्रमुख व्यक्ती आहे घराचा मालक आहे.

त्याच्या खोलीमध्ये खिडकी आणि दरवाजा निळा तपकिरी किंवा केशरी रंगाचे पडदे लावल्यास त्या कुटुंबप्रमुखाचे आरोग्य सुधारते आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा देखील राहते आणि या रंगाच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांची प्रगती होते. रंग आपल्या मनावर परिणाम करत असतात हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली आहे.

जर तुमच नुकताच लग्न झालेले असेल तर पडद्याच्या रंगाच्या निवडीकरणांमध्ये लक्ष देणे आवश्यक आहे म्हणजे पती-पत्नीने आपल्या खोलीमध्ये लाल जांभळा गुलाबी रंगाचे पडदे लावावे त्यामुळे वैवाहिक जीवनाला नवीन ऊर्जा येते आणि पती-पत्नीमध्ये प्रेम सुद्धा वाढते त त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत हिरवे किंवा गुलाबी रंगाचे पडदे लावावेत हे रंग शांत आणि आरोग्याचे दर्शक आहेत.

अभ्यासिका असेल तर त्यात हिरवा पडदा लावल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन अभ्यासात लागून राहते तसेच जर तुमच्या घर लहान असेल तर मुले च्या ठिकाणी अभ्यासाला बसतात. तिथे एखाद्या खिडकी असेल तर तिथे सुद्धा हिरव्या रंगाचे पडदे तुम्ही लावू शकता. देवघर जिथे असेल तिथे एखादे खिडकी असेल तर तिथे तुम्ही केशरी किंवा हलक्या पिवळ्या रंगाचा पडदा अवश्य लावला पाहिजे. हे दोन्ही रंग पवित्रतेचे प्रतीक मानले जातात.

या रंगाचे पडदे लावल्याने संपूर्ण घरात पवित्र वातावरण तयार होते. घरात शांतता टिकून राहावी यासाठी कोणत्या रंगाचे पडदे निवडावेत तुमच्या घरातल्या सदस्यांमध्ये अनेक मतभेद होत असतील किंवा एकमेकांचे पटत नसेल. तर घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचे पडदे लावल्याने तुमच्या घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि परस्पर संबंध अधिक दृढ होतील.

जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर घराच्या उत्तर दिशेला निळा पडदा लावा त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमची जशी समस्या आहे त्याप्रमाणे तुम्ही पडद्याची निवड करू शकता त्यामुळे निश्चितच तुमच्या घरातले वातावरण सकारात्मक होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *