हळदी कुंकू साठी शुभ दिवस कोणता, हळद कुंकू का साजरे करतात? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत सर्व स्त्रिया या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. कारण मकर संक्रांत झाले केसरी यांच्या हक्काच्या उत्सवाचे म्हणजेच हळदीकुंकू समारंभाची सुरुवात होते. स्त्रीया एकमेकींच्या घरी जाऊन हळद-कुंकू देतात आणि घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे वाण दिले आणि घेतले जाते वान देणे म्हणजे एखादी भेटवस्तू एकमेकींना दिली जाते. वान देण्याच्या बाबतीत स्त्रियांचे जणू चढावर चालली असते.

इतरांपेक्षा माझे वाण सर्वात चांगले आणि आकर्षक असावे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. आणि साठी स्त्रियांची अगदी रस्सीखेच चालते. हळदी कुंकवाचा हा उत्सव मकर संक्रांति पासून ते रथसप्तमीपर्यंत चालतो. स्त्रिया नटून-थटून एकमेकींच्या घरी जाता तेथे गप्पागोष्टी होतात. चहा नाश्ता होतो आणि हळद कुंकू लावून तिळगुळ तिळाचे लाडू आणि एखादी भेटवस्तू दिली जाते.

हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि सवाष्ण स्त्रियांनी एकमेकींना हळद-कुंकू दिल्याने व घेतल्याने त्यांच्या सौभाग्य वृद्धी होत असे मानले जाते. कुंकू हे लाल रंगाचे असते. अति प्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. कपाळावर कुंकू लावण्याची प्रथा ही आर्य तर स्त्रियांकडून चालत आलेली आहे.आर्यतर समाज हा मातृ प्रधान होता आणि मातृ प्रधान संस्कृत येथील बहुतेक देवी देवता हे रक्त वर्ण म्हणजे लाल रंगाचे आहेत.

फार पूर्वीपासून कुंकवाचा टिळा लावला जातो. प्रत्येक गावातील ग्रामदेवतेला कुंकवाचा टिळा खूप प्रिय असल्याचे दिसून येते. दुर्गा पूजेतही कुंकवाचे अधिक्य असते. पूर्वीच्या काळी कुंकू म्हणजेच केशराचा टिळा कपाळावर लावला जात असे. कुंकू लावण्याचा प्रथेचा पशु कोणीशीही संबंध असल्याचा उल्लेख आढळतो. देवीच्या कपाळावर एखाद्या पशुचा बळी देऊन रक्ताचा टिळा देवीच्या कपाळावर लावला जातो.

स्त्रीलाही देवी जगदंबेचे स्वरूप मानले जात असल्याने ज्यावेळी एखाद्या स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणले जाते त्यावेळी एखाद्या पशुची शिकार करून त्याला मारायचे आणि त्याच्या रक्ताचा टिळा नाव वधूच्या कपाळावर लावून मग ९० दिवसा ग्रुप प्रवेश करायचा अशी प्रथा पूर्वीच्या काळी आर्यतर समाजात होती. काही आदिवासी समाजात आजही ही प्रथा पाळली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या नववधूच्या हातून देवीच्या मंदिरात कुंकवाचा सडा घालण्याची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित आहे.

कुंकू प्रकारे सौभाग्याचे प्रतीक असल्याने भारतीय संस्कृतीत कुंकवाचा वापर प्रत्येक शुभकार्यात केला जातो. स्त्रियांचे कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाऊ लागले. देवी देवतांच्या पूजनात कुंकवाला मानाचे स्थान मिळाले. लग्न पत्रिकेतही हळद-कुंकू लावून मग ती पत्रिका नातेवाईक आणि आप्तेष्टांना वाटल्या जाऊ लागल्या हिंदू संस्कृतीत नवीन कपडे परिधान करण्यापूर्वी त्या कपड्यांना हळदी कुंकू लावून मग परिधान केले जातात.

एका सवाष्ण स्त्रीने दुसऱ्या समस्या स्त्रीला हळदी कुंकू लावणे एक सौभाग्याचे लेणे समजले जाऊ लागले. विवाहप्रसंगी कित्येक समजनमध्ये नवरीच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरला जातो. सवाष्ण स्त्री घराबाहेर पडत असताना घरचे गृहिणी तिच्या कपाळी हळद कुंकू लावते. त्याचा अर्थ तुझे सौभाग्य अक्षय राहो. अशी उदात्त महान मंगल भावना त्यामागे असते. लग्न प्रसंगात वधू-वरांना हळद कुंकू लावण्याची प्रथा पार्शी समाजातही आहे.

कोणत्याही समाजात मंगल प्रसंगी पुरुषांनाही कुंकवाचा टिळा लावला जातो. आपल्या बुद्धीचे स्थान म्हणजे आपले कपाळ आणि कपाळावर कोको लावणे म्हणजे बुद्धीचे पूजन करणे होय. कपाळावर कुंकू लावण्याची ही पद्धत भारतीय संस्कृतीत अजूनही चालू आहे. आता आधुनिक काळात स्त्रियांनी कुंकाकडे पाच फिरवले आहे. परंतु एखादा सण उत्सव असेल त्यावेळी कितीही आधुनिक स्त्री असली तरी परंपरागत वेशभूषेवर कपाळावर कुंकू अवश्य लावते.

हीच खरे आपले भारतीय संस्कृती भारतीय स्त्रिया कितीही आधुनिक झाल्या तरीही व्रत उत्सव व समारंभात मागे नाहीत. आणि त्यातल्या त्यात हळदीकुंकू समारंभ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून कारण कोणतेही असो भारतीय स्त्रिया हळदी कुंकू आवर्जून करतात विशिष्ट पूजा सण अशाप्रकारे स्त्रियांना आमंत्रित करून कपाळावर हळद-कुंकू लावून हा उत्सव साजरा करतात. एकमेकींना अत्तर लावतात गुलाब पाणी शिंपडतात काही प्रसंगी एकमेकींची ओटी ही भरली जाते.

मकर संक्रांतीच्या वेळी महिला एकमेकींना वान देतात. वाण म्हणून एखादी भेटवस्तू दिले जाते यावर्षी १५ जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतिपासून ते रथसप्तमी म्हणजेच १६ फेब्रुवारी पर्यंत हळदी कुंकू करता येणार आहे. एकमेकींना हळद कुंकू लावणे म्हणजे सवाष्णा स्त्रीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय. वान म्हणून एखादी भेटवस्तू देऊन आनंद वाटला जातो.

सध्याच्या धकाधकीच्या काळात स्त्रियांना तेवढाच थोडासा दिलासा आणि मन मोकळे करण्याचे हक्काचे ठिकाण नाहीतर आजकाल कोणाला कोणाकडे जायला आणि चार शब्द बोलायलाही वेळ नाही. यामुळे स्त्रियांचे एकत्र उठणे बसले होते. बोलले होते आणि यातून प्रेमही वाढीस लागते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *