मकर संक्राती २०२४ कोणत्या राशीसाठी शुभ? कोणत्या राशीसाठी अशुभ ? अवश्य बघा तुमची राशी….

राशिभविष्य

नमस्कार मंडळी

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल संक्रांत येते सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याचा परिणाम धनु राशि वर सुद्धा होतो आणि मकर राशि वर सुद्धा होतो आणि त्यासोबतच सगळ्या बारा राशीवर सुद्धा परिणाम होत असतो तर भरपूर लोकांचे प्रश्न असतात की या मकर संक्रांतीमुळे कोणत्या राशीसाठी शुभ आहे कोणत्या राशीसाठी अशुभ आहे.

तर मित्रांनो मेष राशीसाठी संक्रांति शुभ असणार आहे. त्यांना इष्ट सिद्धीचा लाभ होणार आहे,धनलाभ होणार आहे.
वृषभ राशीसाठी सुद्धा संक्रांति शुभ असणार आहे. धर्माच्या मार्गावर चालून त्यांना सुद्धा धनलाभ होणार आहे आणि त्यांची उन्नती प्रगती होणार आहे.
मिथुन राशीसाठी संक्रांती ही अशुभ असणार आहे, कारण त्यांना शारीरिक कष्ट थोडेसे होणार आहे, त्यांचे आरोग्य थोडेसे खराब होऊ शकते.

कर्क राशीसाठी संक्रांती ही शुभ असणार आहे, त्यांच्या सन्मानामध्ये वृद्धी होऊ शकते त्यांच्या धनामध्ये वृद्धी होणार आहे आणि त्यांना यशाची प्राप्ती होऊ शकते.
सिंह राशीसाठी संक्रांती ही थोडीशी अशुभ असणार आहे कारण त्यांना भय आणि चिंताग्रस्त करू शकते.
कन्या राशीसाठी सुद्धा संक्रांती थोडीशी शुभ असणार आहे त्यांच्या धनामध्ये वृद्धी होणार आहे त्यांना सुद्धा यशाची प्राप्ती होणार आहे.

तुला राशीसाठी संक्रांति अशुभ असणार आहे त्यांच्या घरात कला होऊ शकतो वादविवाद आणि मानसिक चिंता त्यांच्या वाढू शकतात.
वृश्चिक राशीसाठी संक्रांति ही शुभ असणार आहे त्यांच्या घरात धनावृद्धी होऊ शकते आणि सुख शांती ची प्राप्ती होऊ शकते.
धनु राशीसाठी संक्रांति शुभ असणार आहे, त्यांना धनलाभ होणार आहे आणि यशाची प्राप्ती होऊ शकते. मकर राशीसाठी सुद्धा संक्रांती शुभ असणार आहेत. त्यांची लक्ष्मी स्थिर असणार आहे त्यांना धनलाभ सुद्धा होणार नाही आणि धनात कमी सुद्धा होणार नाही.

कुंभ राशीसाठी सुद्धा संक्रांति शुभ असणार आहे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये लाभ होणार आहे आणि यशाची प्राप्ती होणार आहे मीन राशीसाठी संक्रांति शुभ असणार आहे त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होईल त्यांना कोणत्याही शारीरिक कष्ट होणार नाही आरोग्य त्यांचे चांगले राहील. तर मित्रांनो ह्या होत्या १२ राशी त्यांचे शुभ आणि अशुभ परिणाम.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *