अयोध्या राम मंदिराच्या या ५ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला पार पडणार आहे. संपूर्ण भारतासह जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले. भारतीय जनता तर आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत आहेत. याच भव्य दिव्य राम मंदिराच्या ५ अशा खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. अयोध्ये मध्ये बांधले गेलेले राम मंदिर हे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरते या राम मंदिरासाठी अनेक गोष्टी नव्याने केल्या गेल्यात ज्या आधी कधीही केल्या गेल्या नाही.

कुठल्याही मंदिरात पाहायला मिळणार नाही अशा प्रकारची रचना या मंदिरात करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराच्या भूमिपूजनासाठी देशातल्या सगळ्या पवित्र ठिकाणावरून माती आणण्यात आली होती. माती या भूमिपूजनासाठी आणण्यात आली. तसेच देशातल्या सर्व पवित्र नद्या समुद्र जलाशयांमधून सुद्धा पाणी भूमिपूजनासाठी आणण्यात आल होत. साधारण १५१ नद्यांचा पाणी या सोहळ्यासाठी आणल गेल.

राम मंदिरातील राम आणि सीता यांच्या मूर्ती या पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आल्याचाही सांगितल जात. शाळीग्राम हा अतिशय पवित्र दगड मानला जातो. शाळीग्रामाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे प्रत्येक घरात शाळीग्रामाची पूजा केली जाते. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते अशी मान्यता आहे. नेपाळमधील गंडकी नदीच्या किनारी हा दगड सापडतो आणि याच दगडाचा प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती घडवण्यात आल्याचं सांगण्यात येत.

राम मंदिरातल आणखीन एक वैशिष्ट्य असणारे ते म्हणजे या राम मंदिरामध्ये बसवण्यात येणारी घंटा गेल्या वर्षभरापासून राम मंदिरातील घंटाही जलेसर इथल्या मित्तल कारखान्यात तयार होत होती. ही देशातील सर्वात मोठी घंटा असणार आहे. घंटा तयार करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा खर्च आला तरी सांगितल जात. चारशे कर्मचाऱ्यांनी ही घंटा तयार केली असून साधारण २१०० किलो वजनाची घंटा आहे. ती घंटा पंधरा फूट रुंद आहे तर आतून पाच फूट रुंद आहेत. संपूर्ण घंटा तयार करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घंटा राम मंदिरापर्यंत पोहोचली. राम मंदिरात अभिषेकासाठी तयार करण्यात आलेला अभिषेक पात्र सुद्धा खास आहे. हे पात्र काशी मध्ये तयार करण्यात आला असून या पात्राला सहस्त्रचिद्र आहेत. आणि देशातील सर्व तीर्थक्षेत्र पवित्रांना द्या समुद्र या सगळ्या पाण्याने ही घागर भरून रामरला अभिषेक केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा विधीसाठी नव मंडप बांधण्यात आले आहेत. या मंडपामध्ये नऊ आकाराचे हवन कुंड बांधण्यात येणार आहेत. सर्व नव मंडपामध्ये एकाच वेळी धार्मिक विधी होतील.

शास्त्रानुसार तलावांचे नऊ आकार चतुर्भुज, पद्माकर, अर्धचंद्र, त्रिकोण, वर्तुळाकार, युनिकार, षटकोनी, अष्टकोनी असे आहेत. या मंदिराच्या दरवाजे आणि महाराष्ट्राचा एक खास नात आहे. या मंदिरात बारा दरवाजे असतील महाद्वार आणि गर्भगृहाचा दरवाजा हे मुख्य दरवाजे आहेत. सर्व दरवाजांच्या निर्मितीसाठी देशातल्या सर्वोत्तम सागवानी लाकडाची गरज होती त्यासाठी देहरादूनच्या फॉरेस्ट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ची संपर्क साधला गेला.

त्यांनी महाराष्ट्रातल्या चंद्रपूर परिसरातील सागवानी लाकूड सर्वोच्च क्वालिटीचा असल्याचा सांगितल आणि मग या सागवानी काष्टाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंते आणि एल अँड टी यांच्याकडून चाचणी पूर्ण झाली आणि या कास्टाची निवड झाली. राम जन्मभूमी मंदिराचा सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधला जाणारा परकोटा तामिळनाडू आणि केरळच्या मंदिरात तर कोटा बांधण्याची परंपरा आहे. राजस्थानच्या ही वृंदावन मंदिरासमोरही हा परकोटा पाहायला मिळतो.

राम मंदिराचा पर कोटा ७३२ मीटर लांब असेल आणि १४ फूट रुंद असेल. हा परकोटा दुमधली असेल त्याचा खालचा भाग ऑफिशियल कामासाठी वापरला जाईल आणि परकोट याचा वरचा भाग भक्तांसाठी परिक्रमा मार्ग असेल. या परकोट्याच्या चार भुजांवर सहा मंदिर असतील. एका कोपऱ्यात भगवान सूर्याच मंदिर असेल. राम सूर्यवंशी आहे त्यामुळे सूर्य भगवान यांच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे. दुसऱ्या कोपऱ्यात भगवान शिवशंकरांचे मंदिर असेल.

तिसऱ्या कोपऱ्यात भगवती देवीचं चौथ्या कोपऱ्यात गणरायाचं पाचव्या कोपऱ्यात हनुमानाचं तर सहाव्या कोपऱ्यात माता अन्नपूर्णेचा मंदिर असेल. या पद्धतीच्या रचनेला पंचायतन असे म्हणतात. दोन हजार वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी ही संकल्पना दिली. या पद्धतीमुळे संपूर्ण शक्तीचे एकत्रीकरणच इथे झालेलं पाहायला मिळेल. उत्तर भारतात गेल्या दोन ते चारशे वर्षात मंदिराची अशी रचना झालेली नाही. जमिनीखाली फाउंडेशन साठी परिस्थिती योग्य नसल्याचा परीक्षण दरम्यान लक्षात आलं कारण मंदिराच्या पश्चिमेकडून शरीर नदी वाहत असल्याने मंदिराच्या तळाशी खाली फाउंडेशनच्या वेळी वाळू आणि भुसभुशीत माती आढळून आली.

मग दिल्ली गोहाटी मुंबई चेन्नई इथल्या आयआयटी नॅशनल जिओग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि टाटाच्या इंजिनियर्सने प्रचंड मेहनत घेतली आणि एक मोठा खड्डा करून जवळपास दोन लाख घनमीटर माती हटवली गेली. मग स्टोन डस्ट चा वापर करून आणि अतिशय अल्प प्रमाणात सिमेंट वापरून नव्याने फाउंडेशन तयार केले गेले. मंदिराच्या दगडांपर्यंत पाणी पोहोचू नये यासाठी १७००० ग्रॅनाईट ब्लॉकचा वापर केला गेला आणि जमिनीपासून २१ फूट उंचीपर्यंत हे ग्रॅनाईट लावलं गेलं आहे.

फाउंडेशन चे काम पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा काळ लागला आणि त्यानंतर २०२२ पासून मंदिर निर्माणच मुख्य काम सुरू झाल. मंदिरात वापरला गेलेला दगड हा राजस्थानच्या भरतपूरच्या बन्सी पहाडपुर मधून आणला गेलेला आहे. त्याला पिंक स्टोन असं नाव आहे. याच्यावर कलाकुसरीचं काम अतिशय उत्तम पद्धतीने करता येत. दुर्मिळ गुलाबी आणि संगमरवरी दगड सौंदर्य आणि सामर्थ्यासाठी जगप्रसिद्ध आहे.

मंदिराच्या पश्चिमेला एक लिफ्ट आहे ज्या लेफ्ट चा वापर वृत्त आणि दिव्यांग करू शकतात. तर पूर्व दिशेला विंचर साठी दोन ग्राम असतील. जवळपास २५ हजार भाविकांचे सामान ठेवण्याची व्यवस्था सुद्धा मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. लोकल सेवेबरोबर हॉस्पिटलची सेवा ही उपलब्ध असेल. मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी शौचालय बाथरूम वॉशरूमची सुद्धा सोय आहे.

याच मंदिर परिसरात आणखीन सात मंदिर ही निर्माण केली जात आहेत. महर्षी वाल्मिकी, विश्वामित्र, निशादराज, वशिष्ठ, अगस्त शबरी अहिल्याजी मंदिरात सुद्धा या मंदिर परिसरामध्ये असतील. मंदिर परिसरात जटायूची सुद्धा एक मूर्ती उभारली जाणार आहे. साधारण १२५ पूजा परंपरेने २२ जानेवारीला राम ललाच स्वागत केलं जाणार आहे. आणि त्यानंतर २३ जानेवारी पासून पुढे ४८ दिवस मंडल पूजा केली जाईल. जय श्रीराम..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *