५ राशींसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची, होतील सर्व इच्छा पूर्ण.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

वृषभ, सिंह, तूळ, धनु आणि मीन या ५ राशींसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची होणार आहे. कारण अनेक चांगले योग वर्षाच्या सुरुवातीला जुळून आले आहेत. आणि याच योगांचा फायदा या पाच राशींना होणार आहे. पण नक्की कशा प्रकारचा फायदा होणार आहे चला जाणून घेऊया. मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये या ४ ग्रहांचे गोचर होणार आहे. शुक्र, वृश्चिक राशी प्रवेश करणारे बुध वक्री चरणाने धनु राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

तर मंगळ ग्रह धनु राशीत विराजमान होणार आहे आणि गुरु ग्रह मेष राशीत मार्गी होणार आहे. आता तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या खोलात जायचं नसलं तर हा भाग सोडून द्या. पण या चार ग्रहांच्या गोचारामुळे लक्ष्मीनारायण बुधादित्य मंगल योग असे चांगले राजयोग जुळून आले आहेत. थोडक्यात काय तर एकूण ग्रह स्थिती बघता शुभ योगांचा अद्भुत संयोग पाच राशींच्या व्यक्तींना फायदा देणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात अगदी दमदार होणार आहे.

१) वृषभ रास – वृषभ रास ही मोठी रसिक रास आहे. या राशीच्या लोकांमध्ये भरपूर उत्साह असतो. त्यांना त्यांच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी करून बघायच्या असतात. पण कधी कधी काही गोष्टी याच्या मनाप्रमाणे घडत नाही आणि मनाप्रमाणे नाही घडल की ही लोक लगेच निराश होतात. लोकांनी निराश न होता नवीन वर्षाचा स्वागत आनंदाने करायचा कारण जरी २०२३ मध्ये त्यांच्या मनाप्रमाणे काही घटना घडल्या नसतील तरी त्या २०२४ मध्ये घडतील असे दिसतय.

वृषभ राशीची वर्षाची सांगता खूपच शुभ होणारे आणि नवीन वर्ष नवीन आनंद घेऊन येणार आहेत. मित्रा खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांच्या मदतीने कोणताही प्रलंबित काम तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जे राजकारणाशी संबंधित आहेत त्यांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. खूप दिवसांपासून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्ही करत होतात. तर तुमची इच्छा सुद्धा आता नवीन वर्षामध्ये पूर्ण होईल. नवीन कामाच्या सुरुवातीमुळे मनात नवा उत्साह राहील. आर्थिक दृष्टिकोनातून काळ खूप शुभ आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल.

२) सिंह रास – सिंह राशि बद्दल बोलायच झाल तर सिंह रास ही बोलायला अतिशय स्पष्ट असते. कधी कधी यांच्या अति स्पष्ट बोलण्याने समोरचा दुखावला जातो. पण सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या स्पष्ट बोलण्याला जरा कौशल्याने वापरला ना तर यांचा यांच्या जीवनात खूप फायदा होऊ शकतो. समोरच्याला न दुखवता ही तुम्ही त्याला सत्य गोष्ट सांगू शकतात त्यासाठी अगदी एकदम पटकन स्पष्टपणे बोलण्याची गरज नसते. थोडस बोला मुद्देसूत नम्रपणे सुद्धा तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता.

एवढी एक गोष्ट जर सिंह रास शिकली ना तर सिंह राशीच्या लोकांमध्ये भरपूर चांगले गुण असतात जे त्यांना आयुष्यात पुढे घेऊन जातात. सिंह राशीसाठी सुद्धा या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्ष २०२४ ची सुरुवात सौभाग्यकारक ठरणार आहे. अनेक मोठ्या समस्या सुटू शकतात प्रलंबित काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळू शकेल. व्यवसायिकांना अपेक्षित यश मिळेल. जमीन आणि मालमत्तेची संबंधित वाद प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मिटतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी असा वेळ घालवाल.

३) तूळ रास – सगळ्या गोष्टींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी तुळ रास असते. तूळ राशीची लोक तसं तर समोरच्याला दुखावत नाहीत त्याचबरोबर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल कसा राहील यावर भर देतात. तूळ रास ही सुद्धा शुक्र ग्रहाची रास आहे त्यामुळे ही रास ही चांगल्यापैकी रसिक असते. तूळ राशीच्या लोकांकडे आणि चांगल्या चांगल्या कॉलिटी असतात. चांगले चांगले गुण असतात त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर रस असतो. तूळ राशीच्या लोकांनी त्यांची हीच गोष्ट आता २०२४ मध्ये वाढवायचे आहे.

नवीन गोष्टी शिकायचे आहे. येणारा काळ नातेवाईकांसोबत आनंदात जाईल. जवळच्या मित्र किंवा कुटुंबासह धार्मिक स्थळाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. नोकरदार लोकांना नवीन आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील. नोकरदारांसाठी हा काळ खूप चांगला आहे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत सुरू होऊ शकतात. खूप मानसन्मानही मिळेल नशीब पूर्ण साथ देईल. सर्व नियोजित काम पूर्ण होते पूर्वीच्या कोणत्याही योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे फायदे होतील. वैवाहिक जीवन खूप आनंददायी असणार आहे.

४) धनु रास – धनु राशीच्या लोकांबद्दल बोलायच झाल तर वाणी आणि बुद्धीने एखाद मोठ काम तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारांना काही मोठे यश किंवा सन्मानही मिळू शकतो. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल उत्पन्नाचे विविध स्रोत मिळू शकतील. गुंतवणूकदारांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित अपेक्षित यश मिळू शकत. जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या अनेक चांगल्या संधी सुद्धा तुम्हाला मिळतील.

५) मीन रास – मीन राशींला जरी साडेसाती चालू असली तरीसुद्धा येणारा काळ आनंददायी ठरू शकेल. तो आनंद जो खूप दिवसांपासून मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता तो आनंद मिळेल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. परदेशी करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर याबाबतीत काही मोठे यश मिळू शकत.

घर आणि ऑफिसमध्ये नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होण्याचे योग आहेत. ज्याच्या मदतीने भविष्यात फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रेम जीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन खूप आनंददायी असणार आहे.

मित्रांनो या त्या पाच राशीं आहेत त्या ज्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी असणार आहे. पण तुम्हाला अस वाटत असेल की तुमचा संपूर्ण नवीन वर्ष आनंददायी जावो. अत्यंत साधा उपाय आहे. तो उपाय करून बघा. तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात कशी करता बर एकतीस डिसेंबरच्या रात्री पार्टी करता का? एकतीस डिसेंबरच्या रात्री भरपूर धिंगाणा घालता का? पण तुम्ही जर तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात एका खास पद्धतीने केली विशिष्ट पद्धतीने केली तर येणार नवीन वर्ष तुमच्यासाठी नक्कीच चांगल ठरेल. सुरुवात कशी करायची आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री अगदी बाराला दहा मिनिटे कमी असताना तुम्हाला शांत बसायचे उगाच कुठेतरी पार्टीमध्ये धिंगाणा घालत एक दोन तीन असं काउंटिंग करत वेळ वाया घालण्यापेक्षा स्वतःसाठी दहा मिनिट काढायचे आहेत. डोळे झाकून शांत बसायचा आहे आणि या गेलेल्या वर्षांमध्ये तुम्हाला काय चांगल्या गोष्टी मिळाल्या कुठल्या वाईट गोष्टींनी तुम्ही चिंतेत झालात याचा क्षणभर विचार करायचा आहे. त्यानंतर उरलेल्या पाच मिनिटांमध्ये ईश्वराचे स्मरण करायचा आहे.

ईश्वराचं नामस्मरण करायच आणि येणार नवीन वर्षात चांगल जाव तुमच्या कुटुंबासाठी तुमच्यासाठी सुख-समृद्धीचे जावो यासाठी प्रार्थना करायची आहे. येणारा नवीन दिवस तुमच्यासाठी अनेक चांगल्या घटना घेऊन येवो. अशी प्रार्थना ईश्वराजवळ करायचे आहे. याप्रकारे फक्त पाच मिनिटे काढायचे आहेत आणि ईश्वराचं नामस्मरण करत करत नवीन वर्षामध्ये पदार्पण करायच. त्यामुळे तुमच नवीन वर्ष नक्कीच चांगला जाईल.

सर तुम्ही ईश्वराच नामस्मरण करत नवीन वर्षात पदार्पण केल.तर तुम्हीच विचार करा तुमच्या येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये तुमच्यावर ईश्वराची कृपा राहील की नाही तुम्ही जर ईश्वराजवळ प्रार्थना केली की येणार हे नवीन वर्ष माझ्यासाठी सुख समृद्धीचे जाऊ दे. आणि माझ्या हातून कुठलाही वाईट कृत्य घडू देऊ नकोस अशी प्रार्थना ईश्वरा जवळ केली सद्बुद्ध ईश्वरा जवळ मागितली तर ईश्वर तुमच्यासाठी या नवीन वर्षात आनंदाचा आनंद भरेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *