नवीन देव्हारा करताय? घरातील जुन्या देव्हाऱ्याचे काय करावे? चुकूनही ही चूक करू नका नाहीतर.

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी.

मित्रांनो देवघर ही आपल्या घरातील सगळ्यात पवित्र जागा आहे, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रसार इथूनच म्हणजेच देवघरातूनच होतो. मनाला शांती आपल्याला देवघरामुळेच प्राप्त होते असे हे देवघर छान सजवलेलं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण अशातच जर देवघर तुटल किंवा जर देवघर बदलायची वेळ आली तर आपल्याला एखाद्या नवीन डिझाईनचे देवघर हवे असेल, तर आपल्या जुन्या देवघराचे काय करावे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.

म्हणजेच हे देवघर विसर्जन करावे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर देवघर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न सर्व लोक करत असतात. देवघरातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपण स्वतःमध्ये साठवून घेत असतो. आपण आपल्या गरजेनुसार छोटे मोठे देवघर घेत असतो आणि आपल्या घरामध्ये स्थापित करतो.

पण जेव्हा देवघर बदलायची वेळ येते ते कुठल्याही कारणाने असू द्यात देवघर खराब झालेला असेल किंवा नवीन घर घेतलेला असेल देवघराची डिझाईन आपल्याला नवीन घ्यायची असेल असे अनेक कारणे असू शकतात.

कुठल्या ना कुठल्या कारणाने जर देवघर बदलायचे असेल तर सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा येतो तो म्हणजे जुन्या देवघराचे करायचे काय? ते कोणाला द्यावे का? विसर्जन करावे ?का विकाव? आणि याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही आपल्याला सांगणार आहे

ज्योतिषांच्या मते घरात ठेवलेले देवघर हे सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. जेव्हा आपण त्याची पूजा करतो तेव्हा त्याची ऊर्जा आपल्या घरात राहते, जेव्हा आपण देवघर विकण्याची किंवा दुसऱ्या कोणाला देण्याची इच्छा करत असते. तेव्हा त्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला तुमचे देवघर जर कोणाला दुसऱ्याला द्यायचा विचार जर तुम्ही करत असाल किंवा दान करण्याचा विचार करत असाल.

त्याआधी जुन्या मंदिरातून सगळे देवी देवता चित्रे मूर्ती काढल्यानंतर नवीन देवघराची घरामध्ये स्थापना करा. मध्ये सगळ्या देवी देवतांची पूजा करा देवघरांमध्ये देवी देवतांची स्थापना करताना मंत्र उच्चारणाने विधीवत स्थापना करून घ्यावी. आणि मग ते देवघर तुम्ही कोणालाही देऊ शकता म्हणजेच जुने देवघर तुम्ही देण्याच्या आधी आपल्या घरामध्ये नवीन देवघराचे मंत्र उच्चाराने स्थापन करून विधिवत पूजा करून घ्यायची आहे.

आणि नंतर ते जुने देवघर आपण कोणालाही देऊ शकतो कारण आता तुमच्या घरामध्ये नवीन देवघराची स्थापना झालेली आहे आणि त्याचबरोबर कोणत्या दिवशी नवीन देवघर घरामध्ये ठेवावे तर सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस नवीन देवघर घरामध्ये स्थापन करण्यासाठी उत्तम दिवस मांनले जातात.

मंगळवार शनिवार आणि रविवार या दिवशी नवीन देवघराची स्थापना करण्यास मनाई आहे देवघर हे नक्की कोणत्या दिशेला असावे हा तुमचा नेहमी पडलेला प्रश्न असतो तर देवघरांमध्ये देवघरासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये सुद्धा ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता

या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात देवघर ईशान्य दिशेला असावे कारण यामुळे देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो तसेच देवघरांमध्ये देवी देवतांचे चित्र मूर्ती किंवा अनेक प्रकारच्या फोटोंमुळे गर्दी करू नये तसेच वेगवेगळ्या प्रकारचे देवानंद देवघरांमध्ये मांडू नयेत देवघरामध्ये प्रमुख देवता असाव्यात म्हणजेच कुलदेवता असावी म्हणजे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो . जर तुम्ही नवीन देवघर स्थापन करणार असाल तर या गोष्टीची तुम्ही पुरेपूर काळजी घ्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *