शनि देवांचे रहस्य शनि देवांच्या नजरेपासून का दूर पळतात सर्व? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

शनि देवांना कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. शनिदेव वाईट कर्मांसाठी खूपच कठोर शिक्षा देतात आणि चांगल्या लोकांना चांगल्या कर्माचे शुभ फळ देतात. शनि देवांना तेल तीळ आणि काळा रंग अत्यंत प्रिय आहे. तेव्हा शनि देवांच्या मंदिरात तुम्ही लोकांना या वस्तू आणि पदार्थ दान करताना नक्कीच पाहिले असेल. परंतु आपल्याला माहित आहे का की या गोष्टींमध्ये देखील बरेच रहस्य लपलेले आहे. तेव्हा तुम्हाला शनि देवांबद्दल काही रहस्य मी आज सांगणार आहे.

सूर्यदेव हे राजा बुध मंत्री मंडळ सेनापती शनी न्यायाधीश आणि राहो केतू प्रशासक असे मानले जातात. समाजात जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करते तेव्हा शनिदेव त्यांचा नाश करतात. राहू आणि केतू दंड देण्यासाठी तयार होतात. शनि देवांच्या दरबारात आधी शिक्षा दिली जाते आणि नंतर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सुख द्यायचे की नाही यावर खटला चालतो.

शनि देवांच्या मंदिरात सरळ रेषेत उभे राहून कधीही शनि देवांच्या मूर्तीची पूजा करू नये. तसेच त्यांची मूर्ती घरात बसवू नये शनि देवांची वाईट नजर ज्या व्यक्तीवर पडते त्यांचा वाईट काळ सुरू होतो असे म्हटले जाते. तसेच शनि देवांच्या मूर्तीला लोक घाबरतात. शनि देवांची पत्नी परम तेजस्विनी होते एके रात्री ती मुलगा होण्याच्या इच्छेने त्यांच्याकडे गेली शनिदेव तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांच्या ध्यानात मग्न होते.

तेव्हा शनिदेव ध्यानातून बाहेर येण्याची तिने बराच काळ वाट पाहिली अखेर पत्नीने संताप होऊन शनीदेवांना शाप दिला शनि देवांच्या पत्नीने सांगितले की शनि देवांची वक्रदृष्टी ज्याच्यावर पडेल तो नष्ट होईल. तेव्हा शनि देवांच्या दृष्टी पासून स्वतःचा बचाव करावा असे म्हटले जाते. चला तर आता जाणून घेऊयात की शनि देवांना तेल का अर्पण केले जाते ते.

१) एकदा सूर्य देवांच्या सांगण्यावरून हनुमान शनि देवांना समजवायला गेले. परंतु शनि देवांना हनुमानाचे म्हणणे काही पटले नाही आणि ते युद्ध करण्यास तयार झाले. हनुमानांनीही युद्धात शनिदेवांचा पराभव केला. या युद्धात शनिदेव जखमी झाले शनिदेवांच्या शरीरावरील जखम बरी होण्यासाठी हनुमानांनी शनि देवांना तेल दिले.

त्यावर शनि देवाने म्हटले जो कोणी मला तेल अर्पण करेल त्याला मी कोणताही त्रास देणार नाही आणि त्याच्या जीवनातील दुःख कमी करेल. तेव्हापासून शनिदेवांना तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.

२) चला तर आता जाणून घेऊया की शनिवारी दिवे का प्रज्वलित केले जातात. शनिदेव अंधाराचे प्रतीक आहेत त्यामुळे त्यांचा प्रभाव सूर्यास्तानंतर खूप शक्तिशाली होतात . जर शनि देवा कोणावर बिघडले तर त्याच्या जीवनातही अंधकार पसरतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी दिली प्रज्वलित केल्याने आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो. त्यामुळे शनिवारी दिवे प्रज्वलित करायला हवेत असे म्हटले जाते.

३) चला तर आता जाणून घेऊया की शनिदेवांचा रंग काळा का आहे ते शनिदेव सूर्यदेवांचे पुत्र आहेत शनि देवांचा जन्म छाया आणि सूर्य यांच्या संयोगाने झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गर्भात असताना शनिदेव सूर्यदेवांचे तेज सहन करू शकले नाहीत आणि त्यांचा रंग काळा पडला. शनि देवांचा रंग पाहून सूर्यदेवांनी त्यांना पुत्र म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. शनि देवांनाही सहन होत नव्हते तेव्हापासून शनिदेव आणि सूर्यदेवांमध्ये वैर आहे.

४) शनि देवांच्या क्रोधापासून आपण कसे वाचावे ते पाहूयात. जर आपल्यावर शनि देवांचा खूप टाळायचा असेल तर इतरां बद्दल वाईट बोलणाऱ्या आणि कटकारस्थान रचणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. इतरांबद्दल वाईट विचार करू नये तसेच वाईट चिंटू नये. कोणाचा हक्क हिरावून घेऊ नये दुष्काळचीपणा टाळावा. सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. सूर्यास्ताच्या वेळी अजिबात झोपून आहे.

गरीब आणि भुकेल्यांना शक्य तितके अन्नदान करावे. एखाद्या गरजू व्यक्तीला शूज किंवा चपला दान कराव्यात. हिवाळ्यात गरीब गरजू लोकांमध्ये ब्लॅंकेटचे वाटप करावे. शनिवारी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल टाकून ते भांडे दान करावे. शनिवारी संध्याकाळी शनि देवांना मोहरीचे तेल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. अशाप्रकारे आपण शनि देवांना प्रसन्न करून घेऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *