जर तुळशी खाली दिवा लावत असाल तर, जाणून घ्या ही गोष्ट नाही तर.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रानो.

तुळशीला आपण माता मानतो तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच श्रीहरी भगवंतांच्या पूजेला आवर्जून तुळशीचा वापर केला जातो. श्रीहरी भगवंतांची पूजन तुळशी माता अर्पण केल्याशिवाय अपूर्णच मानली जाते. असे म्हणतात की ज्या घरामध्ये तुळस मातेची पूजन केले जाते, त्या घरात दारिद्य्र प्रवेश करत नाही.

देवी लक्ष्मी अशा घराचं सदैव निवास करते. दररोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावावा. तुळशीपुढे दिवा लावल्याने आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. व आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. पण तुळशीपुढे दिवा लावताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. तुळशीपुढे दिवा लावताना काय करावे आणि काय करू नये याविषयी काही नियम सांगितले आहेत.

दररोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यास आपल्या घरात संपन्नता राहते. त्याचबरोबर शुभ समृद्धी तसेच आरोग्याची ही प्राप्ती होते. तुळस लावताना आपण कुंडी किंवा तुळशी वृंदावनात लावतो. वृंदावन असेल तर दिवा लावण्यासाठी कप्पा केलेला असतो. त्या दिव्याला वारही लागत नाही. आणि दिवा विजतही नाही. परंतु कुंडीत तुळस असेल तर आपण सर्वात मोठी चूक करतो. दिवा कुंडीतच लावतो.

कुंडीत दिवा लावल्याने तुळशी मातेला चटका लागेल इजा होणे असे प्रकार होऊ शकतात. तसेच दिव्याच्या वरच्या बाजूला फांद्या असतात त्यांना शेक लागून पेटल्या जातात. म्हणून तुळशीपुढे दिवा लावायचा असेल तर वृंदावनात लावा किंवा कुंडीच्या बाहेर ठेवा. कुंडीच्या आत दिवा ठेवू नये. कुंडीत दिवा ठेवल्याने पुण्याची प्राप्ती होतच नाही उलट आपल्या पापात भर पडते.

आपण दिवा लावताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्याला जे परवडेल आणि जे शक्य होईल तो दिवा लावा. परंतु शक्यतो गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास त्याचे जास्त फायदे आपल्याला होतात. तुळशीपुढे दिवा लावताना त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकावेत म्हणजेच तांदळाचे असं टाकावे. आणि त्यावर दिवा ठेवावा.

सरळ खाली ठेवू नये. कारण दिव्याला असं दिल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते. असं न देता दिवा लावल्यास तो दिवा पूर्ण मानला जातो. संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यास संध्याकाळी फिरणारी बारीक बारीक जीवजंतू त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि तिथेच नष्ट होतात. त्यामुळे जीव जंतूंपासून आपले संरक्षण होते. घरात प्रवेश करत नाहीत. आता आपण जाणून घेऊया दिवा लावताना या दिव्यात कोणकोणत्या तेल वस्तू टाकाव्यात. तुळशीपुढे दिवा लावताना कोणत्याही धातूचा दिवा असेल तरीही चालेल.

परंतु तो दिवा दररोज घासून पुसून स्वच्छ करून त्यानंतरच त्याचा वापर करायचा. मातीचा दिवा असेल तर तो दिवा दररोज नवीन असावा एकदा वापरलेला मातीचा दिवा पुन्हा दुसऱ्यांदा वापरू नये. तसेच कणकेचा दिवा लावत असाल तर तोही दररोज नवीन बनवून घ्यायचा आहे.

तुळशीपुढे दिवा लावताना गायीच्या साजूक तुपाचा वापर करावा. तसेच कापसाची वात न टाकता लाल पिवळ्या रंगाच्या दोऱ्याची वात टाकावी. तसेच त्या दिव्यात दोन वेलची दोन लवंगा व दोन तीन आत्तर टाकावे. वेलची लक्ष्मी वर्धक आहे देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते.

दिव्यामधे लाल दोऱ्याचा वापर करणे यामुळे देवी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्याकडे विविध मार्गाने पैसा येऊ लागतो. दिव्यात लवंगा घातल्यास आपल्या जीवनातच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिव्यामध्ये लाल रंगाचा दोरा वापर करणे त्यामुळे ही देवी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्याकडे विविध मार्गाने पैसा येऊ लागतो.

दिव्यात लवंगा घातल्यास आपल्या जवळची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. आणि आत्तराच्या सुगंधाने देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते. जर शक्य झाले तर गुलाबाचे अंतर दिव्यात टाकावे. ते अत्तर नसेल तरी इतर कोणतेही चालेल.

अशा प्रकारे दिवा तयार करून आपण जर तुळशीपुढे दिवा लावला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीचे आगमन होईल. हा उपाय खूपच प्रभावशाली आहे. अगदी सोपा उपाय आहे म्हणून तुम्ही दररोज नित्य नियमाने हा उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी पासून सुटका मिळवा.

धनसंपदा व ऐश्वर्याचे प्राप्ती करू शकतो. मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरविणे आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आम्ही कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *