नवीन वर्षात या राशींवर शनीकृपा, शनिदेव राहतील या राशींवर अतिप्रसन्न..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नवीन वर्ष २०२४ मध्ये शनि महाराजांच्या कृपेने काही राशींना लाभ पाहायला मिळणार आहे. मेष वृषभ कन्या तूळ आणि धनु या त्या पाच राशी आहेत ज्यांना २०२४ मध्ये शनि महाराजांच्या कृपेचा अनुभव येणार आहे. आता हा लाभ कशा प्रकारचा असणारे ते मी आज या माहितीमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी ज्या राशींचे नाव या यादीमध्ये नाहीये त्यांनी नाराज व्हायच कारण नाही.

करण २०२४ मध्ये कुठले उपाय त्यांनी करावे ज्यामुळे त्यांच्यावरही शनि महाराजांची कृपा होईल ते उपाय आम्ही तुम्हाला या माहितीच्या शेवटी सांगणारच आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा. मंडळी वर्ष २०२४ च्या मध्ये शनि महाराजांच्या संक्रमणामुळे मेष आणि वृषभ राशी सह आणखी काही राशींना शनी महाराजांच्या कृपेचा लाभ मिळणार आहे. आणि त्याचबरोबर काही राशींच नुकसान होणारे पण त्या राशींनी त्यावर काय उपाय करायचा आहे हे सगळ या माहितीमध्ये आता आपण बघूया.

१) मेष रास – मेष राशीचे जे लोक व्यवसाय करतात त्यांना शनीच्या शुभ प्रभावामुळे २०२४ मध्ये मोठा फायदा होणार आहे. तुमचे उत्पन्न वाढेल आणि यावर्षी तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरदारांचे पगार वाढतील मुलांच्या प्रगती बद्दल थोडी काळजी तुम्हाला वाटेल खरी पण त्यासाठी तुम्ही थोडं धैर्य ठेवा आणि मुलांना थोडा वेळ द्या. तुमच्या शरीरातील वाढत्या आळसामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जाव लागू शकत.

मे नंतर तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन दरवाजा उघडतील आणि तुम्ही पैसे सुद्धा वाचवू शकाल. बर आता तुम्हाला ज्या काही अडचणी येणार आहेत म्हणजे जो आळस जाणवणारे किंवा मुलांच्या संदर्भातल्या अडचणी आहेत त्यावर एक उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे दर शनिवारी काळे तीळ दान करा.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांना यावर्षी शनीच्या संक्रमणाचा लाभ होणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक मोठ्या संधी येतील करियर असो किंवा व्यवसाय यावर्षी तुम्हाला परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. यावर्षी तुम्ही चांगली रक्कम साठवू शकाल म्हणजे तुमची बचत होईल. कुटुंबासाठी वेळ काढण तुमच्यासाठी थोड कठीण जाईल. परंतु तुम्ही तुमच काम प्रमाणिकपणे कराल.

जून ते नोव्हेंबर या काळात तुम्हाला करिअरची संबंधित निर्णय घेताना मात्र जरा सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतोय. नोकरी बदलण्याचा विचार करा आणि तसा निर्णय घ्या आता ज्या काही थोड्या फार समस्या तुम्हाला येणार आहे २०२४ मध्ये त्यावर उपाय म्हणजे महिन्यातून एकदा एका शनिवारी कपडे दान करा. त्यामुळे तुमच्या करियर मध्ये येणारे अडचणी दूर होतील.

३) मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांना यावर्षी शनीच्या संक्रमणाचा प्रभाव जरा संमिश्र पाहिला मिळेल. म्हणजे या वर्षी तुमच्या अपेक्षा इतका भाग्य तुम्हाला साथ देणार नाही. लांबचा प्रवास केल्याने तुम्हाला थकवा येईल. तुम्हाला थोडा अस्वस्थ वाटेल. यावर्षी मिथुन राशीच्या लोकांचा खर्च वाढलेला दिसेल आणि खास करून आजारावर पैसे खर्च होताना दिसतील. यावर उपाय काय आहे तर आरोग्याची काळजी घेणे. आजारी न पडण आणि आजारी न पडण्यासाठी व्यवस्थित आहार घेणे.

करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर कठोर परिश्रम करूनच तुम्हाला यावर्षी यश मिळणार आहे. पण या सगळ्यांमध्ये तुमच्यासाठी एक चांगली बातमी पण आहे आणि ती म्हणजे तुमच उत्पन्न वाढणार आहे. परंतु तुम्हाला मेहनत करावी लागेल हेही तितकंच खर. फेब्रुवारी ते मार्चमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू शकतो तसेच ज्या काही अडचणी तुम्हाला २०२४ मध्ये येणार आहेत शनि महाराजांची संबंधित त्यावर उपाय म्हणजे दर शनिवारी माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. शक्य असल्यास ते करा त्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील.

४) कर्क रास – कर्क राशींना यावर्षी शनीच्या अशुभ प्रभावामुळे आरोग्याच्या समस्येला सामोरे जावं लागू शकत. करिअरच्या बाबतीत थोडासा तणाव जाणवू शकतो. जोडीदाराशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. पण मे नंतर मात्र तुमच्यासाठी काळ चांगला आहे. जर तुम्ही कठोर परिश्रम घेतले तर तुम्हाला अपेक्षित यश सुद्धा मिळेल. यावर्षी तुमची आर्थिक स्थिती सरासरी रहाणार आहे. पण यावर उपाय आहे यावर उपाय म्हणजे दर शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये काळे तीळ सोडा किंवा काळे तीळ दान करा. त्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील.

५) सिंह रास – सिंह राशीच्या लोकांना शनीच्या अशुभ प्रभावामुळे वर्षात व्यवसायात काय अडचणी येऊ शकतात. यावर्षी आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात तुम्हाला थकवा जाणवेल जास्त करून मे नंतर तुमचा पैसा काही शुभकार्यात खर्च होईल. तुमच्या घरात विवाह सोहळा होऊ शकतो. मेहनत केल्याने तुमचा पगारही वाढेल शनिप्रतिगामी झाल्यानंतर तुमच्या करिअरमध्ये तेजी येईल आणि व्यवसाय ही चांगला होईल. यावर उपाय म्हणून दर्शनीवारी काळा हरभऱ्याचा सेवन करा.

६) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांना शनीच्या शुभ प्रभावामुळे त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळेल. यावर्षी तुम्ही व्यवसायात चांगली कामगिरी कराल. आणि तुमच्या घरात समृद्धी आणि आनंदही वाढेल. गरज पडल्यास तुम्हाला सहज कर्ज मिळू शकत. नोकरीमध्ये बदली घेऊ शकतो. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या फेब्रुवारी ते मार्च हा काळ करिअरच्या दृष्टीने अडचणीचा ठरू शकतो. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा यावर उपाय म्हणून दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

७) तुळ रास – तूळ राशीच्या लोकांना यावर्षी शनि महाराजांच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जो काही बदल करण्याचा विचार करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. मे नंतर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत अचानक लाभ मिळेल.

शनी संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात आर्थिक लाभही होईल. तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. यावेळी अनावश्यक पणे पैसा खर्च करणे टाळा.अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जाव लागू शकत. यावर उपाय म्हणजे दर शनिवारी मारुती मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांना यावर्षी आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाव लागू शकत. काही कामात अपयश आल्याने तुम्ही निराशैवाल मे नंतर मात्र तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमची चांगली कमाई सुरु होईल. वृश्चिक राशीच्या मंडळींचे यावर्षीचे योग असे आहेत की एखाद वाहन किंवा मालमत्ता खरेदी होऊ शकते.

जवळच्या नातेवाईकांकडून मदतही मिळू शकते. चांगली बातमी ही की तुमचा पगार वाढेल जून ते नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडूनही सहकार्य मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि अनावश्यक खर्च मात्र टाळा. यावर उपाय म्हणजे दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

९) धनु रास – धनु राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी येतील. मे नंतर तुमचा प्रतिकूल काळ सुरू होईल यावेळी तुम्ही कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

कौटुंबिक संबंधात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात तुमच्यावरील जबाबदाऱ्यांचा लक्षणीय वाढेल. जून ते नोव्हेंबर हा काय तुमच्यासाठी शुभ नाही या काळात थोडी काळजी घ्यावी. या काळात कोणताही नवीन काम सुरू करू नये. करिअर बाबत कोणताही निर्णय घेताना काळजी घ्यावी आणि या सगळ्यावर उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी.

१०) मकर रास – मकर राशीच्या लोकांना यावर्षी शनीच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकत. तुमचा खर्च जास्त असेल आणि तुमची कमाई कमी असेल डोळे आणि छातीशी संबंधित समस्या आहे तुम्हाला त्रास देतील. कुटुंबातील सदस्यांचे संबंध नाही काही कारणाने खराब होऊ शकतात. कुठे पैसे गुंतवण्यापूर्वी फायदे तोटे यांचा विचार करा.

जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या मोठ्यांचा सल्ला घ्यावा लागेल. तुमचे खर्च वाढतील कुटुंबात अनावश्यक समस्या वाढू शकतात. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत कोणतेही नवीन काम करू नका. काळजी करू नका या सगळ्यावर उपाय आहे तो उपाय असा की दर शनिवारी मारुती तसेच शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

११) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांना यावर्षी आळस त्रास देईल आत्मविश्वास थोडा कमी जाणवेल. डोळे आणि दातांची संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्यामध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात. पण मे नंतर मात्र परिस्थिती सुधारेल.

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पैसे खर्च कराल. जून ते नोव्हेंबर या काळामध्ये शनी प्रतिकामी असल्यामुळे तुमच्या सर्वच कामात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू लागतील आणि ज्या काही अडचणी आहेत त्यावर उपाय म्हणजे दर शनिवारी शमीच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा.

१२) मीन रास – मीन राशीच्या लोकांना यावर्षी शनीच्या सिद्धांतरामुळे धन आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकत आणि यावर उपाय म्हणजे दर्शनीवारी शनि चालीसाचा पठण करावे.

मंडळी लक्षात घ्या फक्त शनि महाराजांच्या स्थित्यंतराचा विचार करूनच हे राशिभविष्य सांगण्यात आलय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *