मीन रास वर्ष २०२४ कसे? या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

वर्ष २०२४ मीन राशींसाठी काय घेऊन येणार आहे. आनंदाच्या बातम्या आणणार आहे का आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे का ज्यांच्यासाठी स्थळ बघताय त्यांची लग्न जमणार आहेत का नोकरीत काही बदल होणारे का व्यवसायात प्रगती होणारे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर या माहितीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी मीन राशि मुळातच हळवी रास आहे. मीन राशीचा स्वामी गुरु महाराज आहे. आणि म्हणूनच धार्मिक वातावरणात राहायला आवडणारी मी नाशिकची लोक असतात.

मीन राशींच्या लोकांना खूप भांडणं वाद-विवाद या गोष्टी बिलकुल पचत नाहीत. त्यांना अगदी आनंदी प्रसन्न वातावरणात राहायला आवडत. जगा आणि जगू द्या या तत्त्वाची मीन राशीची लोक असतात. त्यामुळे सहसा यांचा त्रास दुसऱ्याला होत नाही. आपला त्रास दुसऱ्याला होणार नाही याची काळजी त्या घेत असतात. मीन राशीच्या लोकांचा हळवा स्वभाव भावनिक दृष्ट्या विचार करण मात्र कधीकधी त्यांना गोत्यात आणण्याची शक्यता असते.

कारण थोडासा व्यवहारी दृष्टिकोन मीन राशींच्या लोकांनी ठेवायला हवा. मीन राशीचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आतून बाहेरून सारखे असे हे लोक असतात. म्हणजे मनात एक ओठांवर एक असा या लोकांच नसत. हे त्यांच्या मनात असत तेच त्यांच्या ओठांवरही असत. कुठलाही प्रकारचा कपटीपणा मीन राशीची लोक शक्यतो करत नाही. सरळ मार्गाने जगणारी मीन राशीची लोक असतात. पण काही काही गोष्टी मात्र स्पष्ट बोलायला मीन राशिच्या लोकांना शिकवत लागतात.

कारण की तुम्ही जर स्पष्ट बोलला नाही तर लोक तुमच्या वागण्याचा बोलण्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असतात. म्हणूनच या एका गोष्टीचा अंगीकार मीन राशीच्या लोकांनी अवश्य करावा. आता २०२४ बद्दल बोलायचे झाल तर मीन राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून २०२४ हे वर्ष खास असणार आहे. कारण हे वर्ष त्यांची प्रगती करणारे ठरेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आश्चर्यकारक यश मिळेल. नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव आणि संघर्ष मात्र टाळा. त्याचा तुम्हाला फायदा होईल.

तुमच्या कामात यश मिळण्याची पुरेपूर शक्यता आहे. तुमचे वरिष्ठ ही तुमच्यावर समाधानी दिसतील. व्यवसायासाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. ज्यांना स्वतःच काहीतरी सुरू करायचा आहे त्यांना या काळात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकत. कोणताही चुकीचा मार्ग स्वीकारू नका तो तुम्हाला अडचणीत आणू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता यावर्षी शनी महाराजांची स्थिती मीन राशि साठी थोडा खर्च करेल आणि म्हणूनच या वर्षी शक्य तितके पैसे वाचवा.

कारण त्याचा फायदा तुम्हाला होईल. हा कालावधी तुम्हाला चांगली आर्थिक स्थिती देईल जर तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवल आर्थिक दृष्ट्या फायदेशीर स्थितीमध्ये तुम्ही राहू शकाल. फक्त खर्च कंट्रोल करा. तुम्ही कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यासाठी टाळा. या काळात नुकसान होऊ शकत. लक्षात घ्या कठोर परिश्रम करूनच नशीब तुम्हाला साथ देणारे आणि यश मिळणार आहे.

आता कुटुंबाबद्दल बोलायच झाल तर वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी थोडी आव्हानात्मक असणार आहे. कुटुंबात काही प्रकारचे वाद होऊ शकतात जे तुम्हाला चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. आईला आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमचा भावा बहिणीचे संबंध सकारात्मक असतील ते तुम्हाला शक्य तितकी मदत करतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी भावा बहिणींसाठी वेळ काढावा लागेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि त्यांच्या गरजांची काळजी घ्यावीच लागेल. त्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहू शकेल.

आता बघूया प्रेमसंपदांबद्दल संबंधांसाठी हा काळ खूप आव्हानात्मक आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या नात्याबाबत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकत. विश्वासाच्या अभावाने तुम्ही आणि तुमच्या जोडीदारात वाद होऊ शकतात.ज्यामुळे मानसिक तणाव देखील निर्माण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्यांवर लक्ष द्यावे लागेल. या काळात कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये आणखीन विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. वाद-विवाद वाढू देऊ नका.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून बोलायच झाल तर यावर्षी तब्येतीमध्ये काही चढ-उतार जाणवतील. कधी तुम्हाला तुमचा आरोग्य खूप चांगलं वाटेल तर कधी हाताबाहेर जाईल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचे मानसिक आरोग्य चांगले राहील असा प्रयत्न करायचा. दैनंदिन दिनचर्यामध्ये चांगल्या सवयींचा समावेश करा ज्यामुळे तुमच आरोग्य तुमच्या हातात राहील. तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल करा. ज्याचा फायदा तुम्हाला होईल.

मीन राशीसाठी २०२४ मध्ये लकी नंबर असेल ३, ७ त्याचबरोबर मीन राशि मीन काही ज्योतिषी चे उपाय सुद्धा करायचे आहेत कारण मीन राशीला साडेसाती चालू आहे. आता साडेसाती आहे म्हणून घाबरून जाण्याच कारण नाही. साडेसातीचे काही नियम आहेत साडेसाती मध्ये कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नये हा पहिला नियम आहे. कारण शनि महाराज अहंकाराला क्षमा करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साडेसातीचे काही नियम दोन्ही जाणून घ्या ज्यामुळे तुम्हाला साडेसाती त्रासदायक ठरणार नाही.

पहिली गोष्ट म्हणजे साडेसाती मध्ये निराश व्हायच नाही. आपल्या मनाविरुद्ध घटका घडल्या तरी सकारात्मक दृष्टीने पावल पुढे टाकत राहायच. ज्यावेळी जे करणे गरजेचे आहे ते करायच. निराश न होता हताश न होता आपल कर्तव्य करत राहायच. कारण कर्तव्याचा फळ हे मिळतात आपण केलेल्या चांगल्या कर्मांचा फळ सुद्धा आपल्याला साडेसातीमध्ये मिळत असतात. सगळ्यात महत्त्वाच आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा तुम्हाला जमेल तसा दान धर्म करा.

साडेसाती माणसाला स्वतःबद्दल विचार करायला भाग पाडते. साडेसाती मध्ये आपल कोण परक कोण याची चांगली ओळख होते. आणि म्हणूनच साडेसातीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाईट आतूनही चांगल शोधत पुढे जाण आवश्यक असत. साडेसातीचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे साडेसातीमध्ये तुम्ही जेवढा संयम ठेवाल तुमच्या मधल्या चांगल्या गुणांची जपवणूक जेवढी कराल तेवढी साडेसाती सरळ जाते. साडेसाती मध्ये त्रास कमी होतो आणि साडेसातीनंतर तुम्ही ठेवलेल्या संयमाचा चांगल फळ सुद्धा तुम्हाला मिळत.

आता या व्यतिरिक्त काही ज्योतिषीय उपाय सुद्धा तुम्ही करू शकता.

१) मीन राशीच्या व्यक्तींनी २०२४ मध्ये प्रत्येक शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनि महाराजांचा त्रास कमी होतो. २) त्याचबरोबर आत्मबळी येण्यासाठी दर शुक्रवारी दुर्गा चालीसाच किंवा दुर्गा स्तोत्राचे पठण कराव. ३) रोज सकाळी पृथ्वीला स्पर्श करून तिथे आशीर्वाद घ्यावे पृथ्वी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी.

४) त्याचबरोबर कबूतर आणि मुंग्यांना सुद्धा दर मंगळवारी किंवा शनिवारी अन्न द्यावा. ५) त्याचबरोबर चांगल्या आरोग्यासाठी रोज किंवा किमान रविवारी तरी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा.

आता या सगळ्या गोष्टी करायला जमणार नाहीत त्यातली एखादी गोष्ट जरी करायला जमली तरी काही हरकत नाही. पण जी कुठली गोष्ट तुम्ही करत आहात त्या गोष्टींमध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमची जी काही साधन आहे तुमच जे काही रुटीन आहे जे काही देवाच तुम्ही थोडेफार करता ते कंटिन्यू करत रहा त्यामध्ये सातत्य ठेवा.मंडळी लक्षात घ्या साडेसाती ही मानसिक शुद्धीकरण करण्यासाठी येते.

त्रास देण्यासाठी नाही साडेसाती आली नसती तर गर्विष्ठ माणसं माजली असती. जुलूम जबरदस्ती सर्वत्र झाली असती. परंतु दुःखाच्या अनुभूतीमुळेच व्यक्तीचा अहंकार आणि गर्व कमी होतो आणि व्यक्तीमध्ये समतोलपणा येतो. मीन राशीची लोक तशी तर नम्र असतात त्यामुळे त्यांनी साडेसातीला घाबरण्याच काहीच कारण नाही. फक्त आपला आचरण शुद्ध ठेवा आपली साधना उपासना चालू ठेवा.

संसारात प्रती असलेल आपल कर्तव्य करत राहा आणि जाता जाता एक मोलाचा सल्ला जरी साडेसातीत नैराश्या आल कटकटी वाढल्या आयुष्यात रस वाटेना झाला वैराग्य वाढू लागल तरी हे सगळ आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. कारण शनि महाराज कनवाळू कृपाळू आहेत जीवाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी झटणारा ग्रह म्हणजे शनी आहे. त्यामुळे प्रत्येक घटनेतून काय चांगल आहे ते बघायला शिका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *