सिंह रास वर्ष २०२४ कसे असेल? या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नवीन वर्ष २०२४ हे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक नवीन बदल घेऊन येत आहे. व्यवसाय करत असतील तर त्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. शनि महाराजांचा त्यांना पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. त्याचबरोबर कुटुंबात सुद्धा आनंदाचा वातावरण बघायला मिळेल अनेक प्रकारचे लाभ त्यांना २०२४ मध्ये होणार आहेत. ते लाभ कसे असणार आहेत चला जाणून घेऊया.

मंडळी सिंह राशीचे लोक म्हणजे कसे असतात माहिती का बोलायला अगदी स्पष्ट सरळ कारण या राशीच्या लोकांचा स्वामीग्रह आहे अर्थात सूर्यदेव आणि सूर्य देवाचे तेज या राशीच्या लोकांमध्ये नाही म्हणायला असताच असत आणि म्हणूनच ही माणस अतिशय प्रामाणिक असतात कुठलेही काम तुम्ही त्यांच्याकडून करायला घेतलं तर ते प्रामाणिकपणे करतील. त्यांचा सगळ बोलण दिव्य आणि भव्य असत.

अस तस काही या लोकांना चालतच नाही अस म्हणाना पुढारीपणाची ना सिंह राशीच्या लोकांना जन्मतात हौस असते अस म्हणायलाही हरकत नाही पण यांची निरीक्षण शक्ती दांडगी असते बर का फक्त यांना अनुभव कसा येतो यांच्या सरळ आणि स्पष्ट बोलण्याचा बरेचदा समोरचे लोक गैर अर्थ घेतात आणि त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतात. म्हणजे जी लोक यांना अगदी जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की यांच्या जे मनात आहे ते ओठावर आहे. यांच्या मनामध्ये अस कुठलंही कपट नसत.

त्याचबरोबर तुमच्या मनात एक आणि ओठात एक अशी सुद्धा परिस्थिती कधी नसते . जे मनात असत तेच ओठावर असत आणि ते तेच त्यांच्या चेहऱ्यावरही असत पण बऱ्याचदा इतर लोक यांना समजून घ्यायला जरा कमी पडतात. खर तर यांना समजून घेतलं तर यांच्यासारखा माणूस नाही. यांना थोडीशी समोरच्या व्यक्तीवर हुकूमत गाजवायची सुद्धा सवय असते. सिंह राशीचा जर तुमच्या घरात कोणी असेल तर तुम्हाला असाही अनुभव येत असेल की यांची मत हे अगदी ठामपणे मांडतात आणि एकदा ठरवल म्हणजे ठरवल त्यात बदल नाही.

स्फूर्ती शक्ती आणि उत्साह या राशीकडे असतोच असतो या राशीला आर्थिक काळ चांगला जाणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु अनावश्यक खर्च टाळण्याची ही गरज आहे. आर्थिक संतुलन राखल्यास फायदा होईल आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे वाचवू शकाल आणि ते तुम्हाला गुंतवणुकीत उपयोगी पडतील. व्यवसायात नवीन करार सुद्धा होऊ शकतात जे तुम्हाला व्यवसायात नफा मिळवून देतील.

परंतु प्रवासावर जरा विशेष त्यामुळे तिकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात पण काळजी करू नका. नोकरीत जरी बदल झाला तरी तुमची आर्थिक स्थिती त्यामुळे अधिकच चांगली होणार आहे. तसंच तुम्ही संपत्ती जमा कराल म्हणजेच काय तर तुम्ही बचत करायला आणि त्या बचत इतना संपत्ती वाढण्याचे या २०२४ मध्ये योग आहेत. तुमच्या पगारातून किंवा तुमच्या नफ्यातून पुरेसा पैसा वाचवायला २०२४ मध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि पैसे जे खर्च करता तुम्ही तुमच्या हाऊसमध्ये वर त्यावर तुम्हाला जरा कंट्रोल ठेवावा लागेल.

यावर्षी परदेशी सहलीची सुद्धा शक्यता आहे. तुम्ही एखाद्या रोमांचक सहलीला जाऊ शकतात. वर्ष २०२४ हे आर्थिक दृष्ट्या सिंह राशीसाठी खूप चांगला आहे त्याचा लाभ करून घ्या. थोडासा हुशारीने काम या चांगल्या तज्ञ लोकांचा सल्ला घ्या म्हणजे वाचलेल्या पैशांची गुंतवणूक कशी करायची याबद्दल तुम्हाला नीट मार्गदर्शन मिळेल. आता काही स्पर्धक म्हणजे नोकरीमध्ये असतील किंवा व्यवसायामध्ये काही स्पर्धक जे आहे तुमचे ते तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न यावर्षी करू शकतात.

त्यामुळे तुम्हाला तिथे मात्र जरा सावध राहाव लागेल. ते यशस्वी होणार नाहीत पण तरीही तुम्हाला सावध राहावे लागेल. आता बघूया सिंह राशीचा कौटुंबिक जीवन २०२४ मध्ये कसा असेल. घरात सामान्य परिस्थिती राहील. तोही वाढतील खऱ्या घरात आनंदाचा वातावरणही असेल पालकांची तुमचे संबंध ही चांगले राहतील आणि कुटुंबाकडून तुम्हाला चांगल सहकार्य ही मिळेल. पण मार्च जूनच्या दरम्यान तुमच्या वडिलांची प्रकृती त्याची तुम्हाला जरा काळजी घ्यावी लागेल कारण आजारी पडण्याची शक्यता आहे. योग्य ती काळजी घेतली औषधोपचार वेळीच केले तर आरोग्यात नक्कीच सुधारणा होईल.

आता करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर या वर्षात तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा फायदा तुम्हाला मिळेल. तुम्हाला नोकरीत बळ मिळेल. तुमची भीती संपेल म्हणजे नोकरीमध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीची जर भीती वाटत असेल तर ती भीती यावर्षी संपेल. तुमचं जीवन अतिशय साधा आणि आनंदी असेल. या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये बराच काळ असाल आणि दुसरी नोकरी शोधत असाल तर हा काळ चांगला आहे. आता बघूया सिंह राशीची जी मंडळी प्रेमात आहेत त्यांचा प्रेम यशस्वी होईल की नाही.

थोडस तणावपूर्ण वातावरण प्रेमासाठी असू शकतो. त्या काळात काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण प्रेमी मुलांमध्ये वाद विवादाची परिस्थिती उद्भवू शकते. पण तू रागावण यंत्रण ठेवल्यास फायदा होईल. वर्षाच्या मध्यात तुम्ही आणि तुमच्या जोडीदारांमध्ये असलेले वादविवाद संपतील आणि नातं अधिक घट्ट होईल. सप्टेंबर नंतरचा काय मात्र प्रेमी मुलांसाठी चांगला आहे. तुम्ही आणि तुमची प्रियसी किंवा प्रियकर तुमच्या नात्याचा पुरेपूर आनंद घ्याल आणि तुमच्या नात्याला पुढे नेण्याचा प्रयत्न कराल.

आता बघूया आरोग्य विषयी आरोग्याचा बोलायचं झालं तर वर्षाची सुरुवात जरा कुरभुरी होईल. म्हणजे काही समस्या तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला आरोग्याशी संबंधित जाणवू शकतात. खास करून पोटाचा त्रास किंवा ताप डोकेदुखी यासारख्या किरकोळ समस्या त्रास देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय तर वर्षाच्या पहिल्या दिवसापासून खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायच. व्यायाम करायचा आहे मेडिटेशन करायचंय आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे बाहेर काहीही खायच नाहीये.

कारण त्यामुळे तब्येत खराब होऊ शकते. आता ज्या काही समस्या सिंह राशीला २०२४ मध्ये येणार आहेत त्यावर ज्योतिषीय उपाय सुद्धा आहेत. कसा आहे सगळे दिवस सारखे नसतात काही दिवस चांगले असतात तर काही दिवस वाईट असतात आणि म्हणून या वाईट दिवसांमध्ये आपल्याला ग्रहांची मदत मिळावी ईश्वराची कृपा व्हावी यासाठी ज्योतिषीय उपाय करायचे असतात. जस की तुम्ही वर्षभर एक उपाय करू शकतात तो म्हणजे, गाईला गुळ खाऊ घालण.

आठवड्यातन कोणताही एक दिवस ठरवा आणि त्या दिवशी गाईला गुळ खाऊ घाला किंवा तुम्ही दर शनिवारी उपवास सुरू करू शकता. आणि उपास करायला नाही जमलं तर शनिवारी कमीत कमी विमास आणि मधिरा यांचा सेवन बंद करू शकता. हा नियम जरी तुम्ही वर्षभर पाहिलात तरी सुद्धा याचा देखील तुम्हाला लाभ होताना दिसेल. आता मंडळी तुमची अशी ही शंका असेल की हे सगळ तंतोतंत असंच असं आमच्या आयुष्यात घडणार आहे का?

तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय घडत हे सर्वसाधारणतः तुमच्या राशिभविष्यावरून तुम्ही सांगू शकता. पण तुमच्या पत्रिकेमध्ये कोणता ग्रह कोणता ठिकाणी आहे तो बलवान आहे की निष्क्रिय आहे या सगळ्या गोष्टींवर सुद्धा तुमच भविष्य अवलंबून असत आणि म्हणून हे सगळ अगदी शंभर टक्के होईलच अस नाही.

पण तसे योग राशिभविष्यातून दिसतात आणि योग असले तर तुम्ही प्रयत्न केले तर यश मिळू शकतात एवढे मात्र नक्की पण प्रयत्न न करता कुठली गोष्ट मिळू शकत नाही. पण हो एक मात्र खर २०२४ ची सुरुवात जर तुम्ही सकारात्मक त्याने केली तर या वर्षांमध्ये नक्कीच सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील यात काही शंकाच नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *