नोव्हेंबर २०२३, या ५ राशींना बंपर लाभ, बघा आपली राशी आहे का यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जर तुमची रास असेल कर्क कन्या धनु कुंभ या राशींपैकी जर तुमची रास असेल तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला होणार आहे बंपर लाभ. पण नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे आयुष्यात काय बदल घडणारे आणि जर तुमची रास या पाच राशींपैकी नाहीये तर नोव्हेंबरमध्ये असा कुठला उपाय केल्याने तुम्हालाही लाभ होऊ शकतो.

चला जाणून घेऊया. मंडळी नोव्हेंबर महिन्यामध्ये शनि शुक्र बुध आणि सूर्य तसेच मंगळ हे ग्रह गोचर करणार आहेत. या ग्रहांच्या एकूणच गोचाराचा पाच राशींच्या व्यक्तींना उत्तम लाभ होणार आहे. सकारात्मक घटना त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत. पण जर त्या राशींमध्ये तुमची रास नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका कारण त्यासाठी आम्ही एक उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

१) कर्क रास – कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव मुळातच अत्यंत प्रेमळ असतो. त्यांच्या प्रेमाचा कधी कधी समोरची व्यक्ती गैरफायदा सुद्धा घेते. पण तरीही या प्रेमानेच जग जिंकण्यावर विश्वास ठेवतात. तर अशा या प्रेमळ कर्क राशीच्या व्यक्तींना पाच ग्रहांचा गोचर उत्तम ठरणार आहे. आर्थिक आघाडीवर सकारात्मक बदलताना पाहायला मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत असेल.

अनेक चांगल्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी मिळालेल्या यशाबद्दल तुम्ही समाधानी असाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अनुकूलच आहे. नृत्य नाटक संगीत चित्रकला शिल्पकला अशा अनेक कलांचा अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा यश मिळणार आहे.

२) कन्या रास- कन्या राशि मध्ये असलेला चांगला गुण म्हणजे ते त्यांचा व्यवहारीपणा त्यांच्याकडे असणारा व्यवहारी दृष्टिकोन हा कुटुंबातील इतरांचाही फायदाच करून देतो. कुटुंबातील व्यक्तींनी कुठलाही नवीन काम सुरू करण्याआधी म्हणूनच घरात जर कुणी कन्या राशीचा असेल तर त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. कन्या राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे पाच ग्रहांचा लाभ आणि तो लाभ आर्थिक दृष्ट्या होणार आहे.

परिस्थिती चांगली होणार आहे. परदेशातूनही आर्थिक लाभ होतील. करिअर आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. शुभ परिणाम अनेक पातळ्यांवर पाहायला मिळतील. कौटुंबिक बाबींसाठी तर हा काळ फायदेशीर आहेच. जे लोक विवाहित आहेत त्यांचं वैवाहिक जीवन उत्तम चालेल. जे लोक प्रेमात आहेत त्यांचे सुद्धा प्रेमामध्ये नवे रंग भरले जातील. एकंदर काळ आनंदी आनंदाचा आहे.

३) धनु रास – धनु राशीचे लोक हे अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. कुठे कधी आणि कसं वागायच कस बोलायच या गोष्टींची यांना चांगली जाण असते. धनु राशीच्या व्यक्तींना पाच ग्रहांचा गोचर आर्थिक लाभ करून देणार असेल. तुम्ही यशस्वी व्हाल ज्येष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीतही काळ नक्कीच सकारात्मक म्हणावा लागेल. मुलांच्या बाजूनेही तुम्ही समाधानी पाहायला मिळाल.

४) मकर रास- मकर राशीच्या व्यक्तींना जे काही मिळत ना ते प्रचंड कष्टानंतरच मिळत. कष्ट यांना चुकतच नाही आणि या व्यक्ती सुद्धा कष्ट करायला घाबरत नाही. बरेचदा या व्यक्तींना कुटुंबातूनही म्हणावी तशी साथ काही मिळालेली दिसत नाही. पण तरीसुद्धा या व्यक्ती कष्टाच्या जोरावर स्वतःच अस्तित्व निर्माण करताना दिसतात.

मकर राशीच्या व्यक्तींना पाच ग्रहांचा गोष्ट पैसा मालमत्ता आणि आर्थिक बाबतीत चांगले परिणाम देणारे ठरेल. नक्षत्रांची स्थिती उत्साहवर्धक असणार आहे. ज्येष्ठांची सेवा केल्याचा फळ तुम्हाला मिळेल. व्यावसायिक प्रगतीच्या अनेक उत्तम संधी मिळू शकतील. प्रवास अनुकूल ठरतील.

५) कुंभ रास – कुंभ राशीच्या व्यक्ती खूप विचार करतात. कोणतीही कृती करण्याआधी प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन त्याची शहानिशा करून घेतात आणि मग निर्णय घेतात. अशा या कुंभ राशीसाठी नोव्हेंबर महिना चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना कोणत्याही अडचणी शिवाय नफा झालेला पाहायला मिळेल. शैक्षणिक कार्यासाठी सुद्धा अत्यंत लाभदायक असा हा काळ आहे. प्रवासासाठी येणारा काळ नक्कीच अनुकूल ठरेल.

तर या होत्या त्या पाच राशी ज्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये लाभ होणार आहे. पण तुमची रास यात नाहीये म्हणून तुम्ही नाराज होऊ नका कारण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो तुम्हालाही नोव्हेंबर मध्ये लाभ मिळवून देईल. काय उपाय आहे,तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी सोळा वेळा श्री सूक्त म्हणायच आहे.

श्री सूक्त म्हणता येत नसेल तर तुम्ही अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकही म्हणू शकता. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहेत आणि माता महालक्ष्मीची कृपा मिळवून देणाऱ्या आहेत. म्हणून जर तुमची रास यामध्ये नसेल तुमच्यासाठी ग्रहमान चांगलं नाहीये असं तुम्हाला वाटत असेल तरी तुम्ही महालक्ष्मीची उपासना करा. कारण महालक्ष्मीच्या कृपेने सगळ्या ग्रहांचा गोचर तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *