नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो १५ ऑक्टोबर रविवारचा दिवस आज नवरात्रीचा पहिला दिवस १ माळ या मंत्राचा जप करा तुमचे घर धन धान्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरेल. मित्रांनो आज घटस्थापना आहे. पहिली माळ प्रतिपदा नवरात्रीचा पहिला दिवस आज पासून पुढील नऊ दिवस नवरात्र आणि नवरात्रीचे हे पवित्र पावन दिवस असतील.
मित्रांनो प्रत्येक दिवस नवरात्रीचा आपण त्या देवीच्या मंत्राचा जप करणार आहोत. आज आहे माता शैलपुत्रीचा दिवस पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या देवीच्या पूजनाने धनधान्य ऐश्वर्या आणि आरोग्य मिळते. म्हणून आज आपण शैलपुत्री मातेच्या मंत्राचा जप करणार आहोत.
एक माळ सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकतात. एक वेळ ठरवून घ्यायची की मी सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी एक माळ जप करणार आहे. शक्यतो संध्याकाळी करावा. संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावावा हा घट असती तर घटाच्या समोर अखंड दिवा असेल तर अखंड दिव्याच्या समोर किंवा आपल्या देवघरासमोर बसून माळ घेऊन माळेने या मंत्राचा जप तुम्हाला १०८ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ करायचा आहे.
अगदी सावकाश हळुवारपणे श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने आधी आपली दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी आपली इच्छा बोलायची आणि मग या मंत्राचा जप सुरू करायचा. हा मंत्र तर काही असा आहे, ” ओम ऐं हीं क्लीं शैलपुत्र्यै नमः |” या मंत्राचा जप एक माळ श्रद्धेने विश्वासाने करा. माता शैलपुत्री तुमचे घर धनधान्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरेल. आरोग्य सगळ्याचे चांगले राहील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.