शनिवार ‘सर्वपित्री अमावस्या’ अत्यंत दुर्मिळ योग, होऊ शकतो हे फायदा..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

पितृपक्षात येणारी अमावस्या सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. यावेळी ही अमावस्या १४ ऑक्टोबरला येणार आहे आणि तेही पितृपक्षात अनेक जण सामान्यता या दिवशी त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करतात. याशिवाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते असेही म्हणतात. शिवाय या पुण्य कर्माने पितरही प्रसन्न होतात. यावेळी पितृपक्षातील अमावस्याला शनिवार विशेष योग आहे.

शनी देवाची कृपा मिळवण्यासाठी विशेष शुभ प्रसंग खूप खास मानले जातात. चला तर मग जाणून घेऊयात शनीचरि अमावस्याच्या दिवशी कोणते काम केल्याने शनीची साडेसाती ठेय्या आणि महादशेपासून याबरोबरच पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. याबरोबरच या दिवशी कोणती एक चूक तुम्ही करू नये यासंबंधी चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शनिवार हा न्यायदेवता शनि देवाला समर्पित आहे. या दिवशी शनि देवाची विशेष पूजा केली जाते. शनि देवाची शनिवारी पूजा केल्याने अपेक्षित फळ प्राप्त होत अशी मान्यता आहे. शिवाय पितृपक्षातील अमावस्याला एक दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे. शनि देवाचे नुसते नाव काढले तरी एक प्रकारची भीती मनात निर्माण होते. शालेय वयापासून शिक्षा करणाऱ्या शिक्षकांची सर्वात जास्त भीती वाटत असली तरीही भीती आदरयुक्त भीती असते.

कारण असे शिक्षक आपल्याला योग्य वेळ लागावा म्हणून अशी शिक्षा देतात. त्याचप्रमाणे शनिदेव हे सुद्धा कठोर शिक्षक आहेत म्हणून इतर देवांच्या तुलनेत आपल्याला त्यांची भीती जास्त वाटते. साडेसाती काळात ते आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे म्हणून प्रत्येक तऱ्हेने परीक्षा घेत असतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होता.

शिवाय सूर्यपुत्र मानला गेलेल्या शनिदेवाला अन्य देवतांप्रमाणेच पूजल जात. शनीची अनेक स्तोत्र मंत्र श्लोक असून यांचे पठण नामस्मरण जप केले जातात. शनि देवाच्या प्रतिकूल प्रभावापासून बचाव होण्यासाठी शनीची उपासना करतात असे म्हटले जाते. विशेष करून शनीची साडेसाती ठिय्या प्रभाव याचबरोबर महादशा सुरू असलेल्याना शनी पूजन नामस्मरण उपासना करण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र भगवान शनि देवाची मूर्ती किंवा प्रतिमा घरात स्थापन केली जात नाही. घरात अन्य देवांची प्रतिमा मूर्ती असून सुद्धा शनि देवाची प्रतिमा निश्चिंध का असते आणि ते का लावू नये अशी चूक का करू नये याबाबत शास्त्रीय आणि पौराणिक कारण सुद्धा सांगितले जात. पौराणिक कथा असे सांगते की शनि देवांना शाप मिळाला होता त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्यांचा विनाश होईल. म्हणून त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवली जात नाही. त्यासाठी मंदिराची जागा सुयोग्य ठरते.

याबरोबरच शनि महाराज उग्र स्वभावाचे देवता असल्यामुळे त्यांच्या सहवासात येताना सहवासात येताना सभोवतालचे वयल तेवढेच प्रभावित असावे लागते. अन्यथा वरिष्ठ परिणाम भोगावे लागतात. मात्र शनि महाराजांच्या मंदिराची रचना ही तेथील भूमीच्या वातावरणातील लहरींचा आणि सभोवताच्या परिसराचा अभ्यास करून बांधलेले असते. म्हणून या गोष्टी घराच्या चार भिंतीत साकारणे शक्य होत नाही. म्हणूनच शनि महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात न ठेवता देवळातच ठेवली जाते.

मग आता शनी देवाचे दर्शन कस घ्यायच असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर शनि देवाची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभा राहून पूजा करू नये. शिवा शनी देवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूलाच बसून घ्यावे. शनि देवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनि देवाच्या मूर्ती ऐवजी त्यांच्या पाषाण रूपाच दर्शन घ्याव. याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करावी मोहरीच्या तेलाचा दिवा लावाव किंवा शनिवारी दान कराव.

कारण शनि देवाला दान करणे हे देखील शनि देवाची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय मानला गेलाय. शिवाय गरीब असाह्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केला न सुद्धा भगवान शनिदेव प्रसन्न होतात. अशी मान्यताही आहे. तर अशाप्रकारे शनिवार आणि सर्वपित्री अमावस्येच्या योगायोगात या चुका करणे तुम्ही नक्की टाळाव. तरच त्याचे योग्य परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *