नमस्कार मित्रांनो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा घरामध्ये तेवत ठेवल्याने घरात सुख शांती येते आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. पण हा अखंड दिवस आहे तो दिवा नक्की कसा लावाचा. त्या अखंड दिव्याची ज्योत कशी बनवायची त्याचबरोबर तुम्हाला जर या वर्षी पहिल्यांदाच अखंड दिवा तेवत ठेवायचा असेल तर त्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्या.
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर तुमच्या घरामध्ये घट बसत नसतील तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता का या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज इथे मिळणार आहेत. आणि अखंड दिवा आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
आता अखंड दिव्याची ज्योत कशी बनवायची आणि दिवा कसा लावायचा याची कृती दाखवण्याआधी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्याlला हाव्यात. सर्वसामान्यपणे आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो तरीसुद्धा विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये मात्र अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. अखंड दिवा तेवत ठेवण्याला खूप महत्त्व आहे ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे.
पण ही प्रथा का आणि कशासाठी आहे हे सुद्धा जाणून घ्यायला हव. तर तुमच्या कृतीलाही अर्थ प्राप्त होईल. नवरात्रीत भक्तीचा शक्तीचा जागर केला जातो. जागरण अर्थात जागृत राहण दिवा अखंड तेव्हा हे आत्मज्योत जागृत ठेवण्याचे प्रतीक आहेत. जसा देव्हाऱ्यातील दिवा तेवत असतो तशी आपली जागृत अवस्था कायम राहून आत्मज्योत तेवत राहो ही त्यामागे भावना आहे.
कोणताही भक्त दिव्यात उपस्थित असलेल्या अग्नी तत्वाद्वारे देवाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतो. ती केवळ दिव्याची ज्योत नसून ती आत्मजत मानली जाते जीवा शिवाला जोडणारी ही वात अखंडित राहून ज्ञानदीप प्रकाशमान व्हावा ही त्या मागचे मुख्य संकल्पना आहे. अगदी थोडक्यात सांगायच झाल तर या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची सतत आणि अखंड भक्ती करावी आणि हे भक्ती करत असताना आपल मन कुठेही भटकू नये.
या नऊ दिवसांमध्ये आपण देवी शिवाय दुसरा कुठलाही विचार करू नये तिचीच पूजाअर्चा करावी आणि ही भावना सतत जागृत दैवत ठेवणारी ती अखंड दिव्याची वात असते. जी आपल्याला सतत आठवण करून देत राहते की हे नऊ दिवस हे आई जगदंबेच्या भक्तीचे नऊ दिवस आहे या नऊ दिवसांमध्ये आपण दुसरा कुठलाही विचार करता कामा नये.
खरतर कोणत्याही प्रकारच्या पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित करून केली जाते आणि पूजेच्या शेवटी आरती ओवाळून सांगता केली जाते. अस म्हणतात की दिवा भक्ताचा दूत बनवून आपल्या इष्टदेवापर्यंत आपल्या भावना पोहोचवत असतो. म्हणून ज्या घरांमध्ये देवाची नित्य पूजा होते तिथे दिवा लावण घंटा वाजवण शंख वाजवण अशी परंपरा असते. देवी देवतांचा सदैव अशा घरांमध्ये वास असतो.
आता बघूया की अखंड दिवा कसा लावायचा. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी एक चौरंग मांडावा, त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकून घ्याव, याप्रमाणे मांडणी झाल्यानंतर अक्षरांनी मंडल कराव. तुम्ही अक्षरांनी स्वस्तिक सुद्धा काढू शकता किंवा अष्टदल कमळ ही काढू शकता किंवा नुसत्या अक्षदा मांडून त्यावरही दिवा ठेवू शकता. आता पण इथे फुलांनी छोटीशी आरास करणार आहोत तुमच्याकडे जी फुल उपलब्ध असतील ती फुल तुम्ही चौरंग सजवायला वापरू शकता. याप्रमाणे आपला फुलांनी सजवलेला चौरंग दिसेल.
आता मी या चौरंगा पावती मोत्यांची रांगोळी ठेवते आहे. तुम्ही हाताने स्वतः सुंदरशी रांगोळी काढू शकता. अखंड दिव्यासाठी वात बनवायला आपल्याला याप्रमाणे कापूस घ्यायचा आहे असा पिंजून गोल केलेला कापूस तुम्हाला बाजारामध्ये मिळेल. प्रकारच्या कापसाने वाद बनवण सोप जातात.त्याच्या टोकाने आपल्याला जेवढी जाड वात घ्यायची आहे तेवढा भाग काढून घ्यायचा. ज्यांना कापूस पिंजून त्यातून एक अखंड धागा काढण जमत नसेल त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग बऱ्याच ठिकाणी कापसाऐवजी रक्षा सूत्र सुद्धा वापरला जात.
जशी तुमच्याकडे पद्धत असेल तस तुम्ही करू शकता याप्रमाणे आपल्याला हवा तेवढ भाग आपण कापसाचा काढून घ्यायचा आहे आणि साधारण ही वात हाताची एक वीत आणि पुढे चार बोट इतकी लांब असली पाहिजे. म्हणजे आपण सव्वा हात लांब वात असली पाहिजे असं म्हणू शकतो. वात थोडी जास्त झाली तरी चालेल कारण की अखंड दिवा आहे त्यामुळे वात मध्ये संपून तो विझून चालणार नाही.
आता या कापसाला हातावर घेऊन याप्रमाणे पिळे मारून घ्यायचे आहेत. सगळ्या बाजूंनी हे पिळे मारत जायचं आहे सगळ्या बाजूने कापूस एकसारखा झाला पाहिजे अशा प्रकारे वर पासून खालपर्यंत या कापसाला पिळे मारून घेयचे आहेत. त्यानंतर बोटाने सुद्धा तुम्ही याप्रमाणे पिळे पक्के करू शकता.
आता हा अखंड दिवा कोण लावू शकत तर ज्यांच्या घरी घट बसतात. त्यांनी तर हा अखंड दिवा लावायचा असतो. पण ज्यांच्या घरी घट बसत नाहीत परंतु त्यांची इच्छा आहे तर ते सुद्धा अखंड दिवा लावू शकतात.
याप्रकारे आपली वात तयार आहे आता आपण ही वात दिव्यात घालून घेऊया. आता दिवा कोणत्या प्रकारचा असावा तर कोणत्याही प्रकारचा दिवा चालेल. अगदी दगडी मातीचा किंवा पितळेचा यापैकी कुठल्याही प्रकारच्या दिव्यामध्ये तुम्ही ही वात घालू शकता. या प्रकारचा पितळेचा दिवा असेल तर एखाद्या टोकदार वस्तू ने ही वात दिव्यामध्ये घालायचे आहे. नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते.
ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्यात समस्या दूर होतात आणि आई जगदंबेचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. आता या दिव्यामध्ये तेल घालून घ्यायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा ही दिवा लावू शकता. जर तेल वापरत असाल तर ते तिळाच किंवा मोहरीचा असावा. याप्रमाणे आपला अखंड दिवा तयार होईल आता आपण हा दिवा चौरंगावर ठेवूया. आता या दिव्याला प्रज्वलित करूया याप्रमाणे आपला दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिसणार आहे.
आता या दिव्याला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहेत. एक फुल वाह्याचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. अखंड ज्योत लावल्यानंतर त्या दिव्याची योग्य ती काळजी घेतली जाण गरजेचे आहे. दिवा मध्येच विझणार नाही याकडे लक्ष द्या शक्यतो घरात कोणी ना कोणीतरी त्या दिव्याची काळजी घ्यायला असाव. घर बंद करून कुठेही जाऊ नका हो परंतु जर घरातले सगळेच लोक नोकरी करणारे असले किंवा बाहेर पडणारे असले तर सकाळीच बाहेर पडताना योग्य त्या प्रमाणात तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये घाला आणि मग बाहेर पडा.
आता ही मोठी करून घ्या जेणेकरून तुम्ही संध्याकाळी घरी येईपर्यंत दिवा विझणार नाही. याप्रकारे अखंड दिवा घरामध्ये लावल्यानंतर घरातल्या वातावरणातली प्रसन्नता नक्कीच तुम्हाला जाणवेल. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले आणि नवरात्रीचा हा उत्सव साजरा करू लागले. प्रभू श्री रामचंद्रांच्या हातून स्वतः रावणाचा वध व्हावा या उद्देशाने नारदांनी प्रभू श्रीरामांना नवरात्रीचे व्रत करायला सांगितल होत.
अशी कथा पूर्ण केली हे परत पूर्ण केल्यावरच प्रभू श्री रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली आणि रावणाला ठार मारले. जगात जेव्हा जेव्हा तामसी असुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सातवी आणि धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात तेव्हा देवी भक्तांच्या रक्षणासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेते आणि त्याच आई जगदंबेची पूजा असते.
नवरात्री ते देवी तत्व नेहमीपेक्षा हजार पटीने अधिक कार्यरत असतात देणे तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो. त्याचबरोबर एका मंत्राचा जपही तुम्ही करू शकता तो मंत्र याप्रमाणे, “श्री दुर्गादेव्यै नमः” हा मंत्र अधिकाधिक जपावा किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा मंत्र सुद्धा या नऊ दिवसांमध्ये रोज जपू शकता. त्यामुळे सुद्धा आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव येतो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.