लाखांची बोली लावून “या” रथात का बसतात ? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

शेकडो वर्षांची एक ऐतिहासिक परंपरा आणि पुत्राच्या भेटीचा एक अनोखा सोहळा इथे निघणाऱ्या रथामध्ये बसण्यासाठी लाखोंची बोली लागते पण कुठे आहे ही परंपरा? कसला असतो हा उत्सव चला जाणून घेऊयात. मंडळी शेकडो वर्षांची एक ऐतिहासिक परंपरा आहे या परंपरांमध्ये माता आणि पुत्राच्या भेटीचा अनोखा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव पार पडतो साताऱ्यातील कराडच्या उंब्रज या गावी हा सोहळा नक्की असतो तरी काय ?

काय असते त्याचे स्वरूप तर या सोहळ्यामध्ये माता कुंती आणि पुत्र भीम माता पुत्राच्या भेटीचा अनोखा उत्सव साजरा केला जातो. जो दरवर्षी उंब्रज गावामध्ये संपन्न होतो या अनोख्या उत्सवाला श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सुरुवात होते आणि या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याच्या सकाळी भीम मंडपामध्ये कुंती माता तिच्या मूर्तीसह रथात बसण्याचा मान हा बोली पद्धतीने बोलला जातो.

हा मान यंदा अजय जाधव यांनी एक लाख हजार रुपयांची बोली लावून मिळवला त्यानंतर सर्वांनी मिळून केलेली कुंती मातेची मूर्ती महामुनी यांच्या घरी नेण्यात येते तिथे जाऊन कुंती मातेच्या मूर्तीचे पूजन विधिवत पार पडते त्यानंतर कुंती मातेच्या मूर्तीला मानकरी रथात बसवतात आणि मग मिरवणुकीला सुरुवात होते.

ही मिरवणूक गावाबाहेरील मंदिराला प्रदक्षिणा घालून संध्याकाळी गोरज मुहूर्तावर भीम मंडपात दाखल होते याच ठिकाणी पुत्र भीम आणि माता कोणती यांच्या मूर्तीची भेट घडते हा सोहळा याची देही याची डोळा पाहणे ही एक अनोखी पर्वणीच असते या उत्सवामध्ये भीम गाड्यावर महाकाय अशा भिमाच्या मूर्तीच्या पोटाजवळ कुंती मातेची मूर्ती विराजमान होते नंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते भाद्रपद महिन्याची पौर्णिमेला मोठ्याशा कायलीत गोड खीर करून तो प्रसाद संपूर्ण गावाला वाटला जातो.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी भीम आणि कुंती विराजमान असलेल्या गाड्याला गावकरी ओढत दिल्ली दरवाजात घेऊन येतात. या ठिकाणी एक रात्र मुक्काम ही करतात, यंदा यावेळी आरेवाडीच्या श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेच्या शंभर मुलांनी तो हरिपाठ म्हटला गावातील युवक भीमसेनेचा गाडा ओढत घेऊन जातात. भीमसेन महाराज की जय कुंती माता की जय या जयघोशात माता कुंती आणि पुत्र भीम यांच्या मूर्तींचे विसर्जन करतात.

सलग बावीस दिवस चाललेल्या या सोहळ्याचा अशा रीतीने सांगता होते या अनोख्या उत्सवाला गावातील सगळ्या माहेरवाशीने या उत्सवाला येत असतात. साताऱ्यातील हा अनोखा सोहळा तुम्ही कधी पाहिला आहे का? याबद्दल ऐकून तुम्हाला काय वाटले आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *