प्रत्येक कामात येत असेल विघ्न तर असू शकतो पितृदोष, हे उपाय ठरतील प्रभावी..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी पितृदोष याबद्दल तुम्ही ऐकून असाल हा पितृदोष अत्यंत क्लेशदायक असतो. प्रत्येक कामात अडथळे येतात कुठलाही काम निर्विघ्न होतच नाही. त्याचबरोबर घरात सतत कोणीतरी आजारी असत. पैसा घरात टिकत नाही. कशातही यश मिळत नाही. मुलांनाही त्याचा त्रास होत राहतो. ज्यांच्या कुंडलीत हा प्रितृदोष असतो त्यांना अनेक मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यावर उपाय करणे आवश्यक असत. त्याचबरोबर पितृदोष याची लक्षणे काय आहेत उपाय काय आहेत चला जाणून घेऊयात.

मित्रांनो असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित म्हणजे विधीनुसार पार पडलेले नसले तर पितृदोष होऊ शकतो. त्याचबरोबर घरात एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्याशी संबंधित कुटुंबातील अनेक पिढ्यांना त्या पितृदोषाचा त्रास सहन करावा लागू शकतो.

योग्य अंतिम संस्कार हो न होण, पितरांचा अपमान करण, घरातील स्त्रियांचा आदर न करण, प्राण्यांची हत्या करण ज्येष्ठांचा अपमान करण अशा अनेक गोष्टींनी पितृदोष निर्माण होऊ शकतो अस ज्योतिष शास्त्र सांगत.बऱ्याचदा आपण आपल्या कुटुंबावर येणाऱ्या अडचणी मागे पितृदोष सुद्धा असू शकतो. कारण जीवनात काही चांगल घडत नसेल तर त्याच कारण जाणून घेण आवश्यक आहे.

पितृदोष ही समस्या तुम्हाला किरकोळ वाटण्याची शक्यता आहे. मात्र तस नसून पितृदोषामुळे जीवनात संततीचे सुख मिळत नाही.नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसान सहन करावे लागतात. कुटुंबात एखाद्या व्यक्तीच आरोग्य खराब होत राहते. जीवनातील शुभ कार्यात अडथळे येतात आजारपणे येणे विनाकारांची चिडचिड होण जेवताना भांडण होण किंवा अन्न खायच्या वेळेला आज काहीतरी विघ्नही ना अशी अनेक लक्षण पितृदोषाची सांगता येतात.

ह्या सगळ्या लक्षणांचा कारण आणखीनही वेगळा असू शकतं पण जी काही अनेक कारणे असतात त्यापैकी पितृदोष हे सुद्धा एक कारण असू शकत तेही नाकारता येत नाही आणि म्हणूनच पितृदोष लागू नये यासाठी उपाय करणे गरजेचे आहे उपाय काय करायचा.

१) त्यासाठी पितरांसाठी प्रत्येक पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध कर्म कराव. आता पितृपक्षा सध्या चालू आहे आणि या पितृपक्षामध्ये तुमचे पितरच्या तिथीला गेले असतील. त्या तिथीला तुम्हाला इतरांच्या नावाने श्राद्ध करायचा आहे. नियमित एकदा तरी पितृपक्षात श्राद्ध केल तरी पितृदोष निवारण होत.

आता श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दहीभात तरी कमीत कमी सोडावा किंवा घरातच अन्नाचा घास काढून ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी खर तर हा उपाय श्राद्ध कर्म करणे खरच शक्य नसेल पण शक्यतो पितृपक्षामध्ये नियमित शब्द पक्ष केले गेले तर पितृदोषाचा त्रास होतच नाही पित्रांचा त्रास कमी करण्यासाठी आणि उपाय आहेत ते बघुयात.

२) संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र किंवा पितृ स्तोत्र रुद्र स्तोत्र नवग्रह स्तोत्र यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करावा. त्यामुळे पितृदोषात शांती मिळते.

३) इष्ट देवतेची कुलदेवतेची रोज पूजा करा अस केल्यानही पितृदोष दूर होतो.

४)भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा. श्रीमद्भगवत गीतेचा पाठ करात्यामुळे सुद्धा पितरांची शांती होते आणि दोष कमी होतात.

आता हे जे आहे हे उपाय तुम्ही आता पितृपक्ष चालू आहे. तर या काळामध्ये करू शकत. यातला जो उपाय करणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पितृपक्षात केला तर त्याचा लाभ तुम्हाला होईल. कारण पितृ पक्षातले हे पंधरा दिवस इतरांच्या सेवेसाठी दिलेले आहेत. या काळामध्ये केलेली पितरांची सेवा पितरांपर्यंत पोहोचते अस म्हटल जात.

दिवंगत नातेवाईकांच्या मृत्यूच्या तिथीला तुम्ही गरजू लोकांना अन्नदानही करू शकता. गोरगरिबांना वस्त्रदानही करू शकता त्याचबरोबर दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी फुल गंगाजल काळे तीळ हे अर्पण करा आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागा, व त्यांच्या नावाने झाडे लावा त्यामुळे सुद्धा दोष कमी होतो. मंडळी यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही पितृपक्षांमध्ये करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *