घरात नकारात्मकता आणतात या ७ “वस्तू” वाढतात विनाकारण भांडण कलह.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरातही विनाकारण वाद-विवाद होतात का? अगदी छोट्या कारणावरून भांडणं विकोपाला जातात का? मग ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच वाचा. घरात असलेल्या काही गोष्टी नकारात फक्त वाढवण्याचं काम करतात. त्यांच्या प्रभावामुळे घरात अनेकदा भांडण कलाहाच वातावरण निर्माण होत असत.

या सात वस्तू जर तुमच्याही घरात असतील तर लवकरात लवकर घराबाहेर फेकून द्याव्यात. असा वास्तुशास्त्र सांगत. कोणत्या आहेत त्या सात वस्तू ज्या घरात असू नये चला जाणून घेऊयात. घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे नकारात्मकता येत असते आणि ज्याच्याकडे आपण अनेक दात दुर्लक्ष करत असतो.

परंतु या ऊर्जांमुळे घरातील वातावरण नकारात्मक बनू शकते. आणि घरामध्ये अनेकदा भांडण आणि त्रासाची परिस्थिती सुद्धा निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकते. घरामध्ये असलेल्या अशा सात वस्तू ज्या तुमच्याकडेही असतील तर दुर्लक्षित अजिबात करू नका.

त्यातली पहिली वस्तू आहेत वाढलेली फुलं ही एखाद्या सुंदर गोष्टींच्या मृत्यूचा दुःखद लक्षण मानले गेले आहे. म्हणून घरामध्ये वाढलेली फुलं असतील तर ती कधीही तशीच तोडू नये यामुळे घरात नकारात्मकता वाढते. तुमच्याकडे वाढलेली फुलं असतील तर ती फुलं बागेत टाकून द्यावीत किंवा ती पाण्यात विसर्जित करावी.

त्यानंतरची दुसरी वस्तू आहे रिकामी खुर्ची घरात रिकामी खुर्ची कायमस्वरूपी ठेवणं अशुभ मानलं जात. असं मानलं जातं की रिकामी खुर्ची ठेवून घरासाठी हानीकारक किंवा वाईट शक्तींना आमंत्रित करण्याचे एक लक्षण आहे. मग तुमच्याकडे ते रिकामी खुर्ची असेल तर कोणीतरी त्या रिकाम्या खुर्चीवर नियमितपणे बसायला हव. किंवा ती खुर्ची पूर्णपणे काढून टाकावी.

तिसरी वस्तू आहे थांबलेलं घड्याळ घरामध्ये खूप दिवसापासून बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते सुद्धा कधी ठेवू नये. ते काढून टाकावे किंवा त्याला रिपेअर करून परत वापर करावा. कारण वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रसार वाढतो. म्हणून जेव्हाही घड्याळात थांबलित किंवा ते बंद झालीत असं दिसून आलं तेव्हा समजावं की घरात नकारात्मकता प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झालाय.

त्यानंतर चौथी वस्तू आहे तुटलेली भांडी किंवा कोकरी वापरण वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली भांडी किंवा क्रोकरी वापरणं ही गरिबी दर्शवत. तुटलेली काच किंवा भांडी कधीही स्वयंपाक घरात किंवा घरात कधीही वापरू नये. कारण हे दुर्दैवाचा कारण मानले जात.

पाचवी वस्तू आहे काचेचे ग्लास घरात ठेवू नये असं मानलं जात यामुळे नशिबाचे विश्वासघात होतात. तुटलेले ग्लास किंवा काच आपल्या घरामध्ये असतील तर ते कधीही काढून टाकावेत कारण यामुळे व्यक्ती आपला मानसन्मान गमावून बसू शकतो.

त्यानंतर जुना कॅलेंडर कधीही घरी ठेवू नये. जुने कॅलेंडर नवीन कॅलेंडर येतात किंवा त्या आधीच फेकून द्यावेत. जुने कॅलेंडर भूतकाळाचे प्रतिनिधित्व करतात. कारण ते मागील वर्षाची ऊर्जा धारण केलेली असत. आणि त्यामुळे भूतकाळात राहण्यापेक्षा पुढे जाणं कधीही चांगलं असत. म्हणून जुना कॅलेंडर कधीही घरात ठेवू नये.

याबरोबरच काटेरी झाड किंवा काटेरी झाड घरात अजिबात लावू नये. यामुळे घरात नकारात्मकता वाढण्यास मदत होते. मात्र तुम्हाला काटेरी झाड लावायची आवड असेल तर ते मुख्य गेटच्या बाहेर लावाव. यात काटेरी निवडुंगाचीच निवड करावी हे वास्तू नुसार शुभ मानले जात. जेणेकरून ते रक्षणात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा घरात आणू शकते.

तर अशा प्रकारे या सात वस्तू तुमच्या घरामध्ये सुद्धा असतील तर यामुळे नकारात्मकता येण्यास मदत होईल. आणि तुमच्या घरात विनाकारण भांडण आणि कलह वाढतील. म्हणून त्या आजच काढून टाका. तुमच्याकडे सुद्धा या सात वस्तू पैकी कोणत्या वस्तू आहेत आणि त्याचा तुम्हाला काही अनुभव आला आहे का कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *