गणेशमूर्ती दुकानातून आणताना ३ चुका टाळा. नाहीतर होईल मोठा अनर्थ. बघा तुम्ही तर नाही करत या चूका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे सुरू झालेली आहे आपल्याला दुकानांमध्ये गणेशाच्या सुंदर सुंदर मूर्ती सुद्धा बघायला मिळत आहेत पण गणपती बाप्पा घरी आणताना तीन चूक आहेत ज्या चुकूनही करू नयेत साधारणता या चुका कोणाकडूनही होण्याची शक्यता आहे पण शास्त्र असे सांगते की या चुका चुकूनही करू नका गणपती बाप्पांचे स्वागत करायचे असेल तर या तीन गोष्टींचे भान ठेवून करा पण कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी चला जाणून घेऊयात.

मित्रांनो गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे लाडके दैवत आहे. आणि गणपती बाप्पाच्या येण्याची तयारी महिना महिना आधीच सुरू होते गणपती बाप्पा घरी आणताना गणपती बाप्पाला सजवण्याचा साहित्य गणपती बाप्पा साठी करायचे पदार्थ गणपतीसाठी बनवण्याचे नैवेद्य या सगळ्याची सुरुवात आधीच झालेली असते पण जेव्हा आपण गणेशाची मूर्ती दुकानातून घरी आणतो तेव्हा मात्र तीन गोष्टी आहेत याची आपण काळजी घ्यायला हवी.

१) त्यातली पहिली गोष्ट म्हणजे गणेश मूर्तीचे तोंड कुठल्या दिशेला हवे तर दक्षिण दिशा सोडून गणेश मूर्तीचे कोणतेही दिशेला तोंड असलेले चालते. पूजा करताना मात्र पूर्व किंवा पश्चिमेलाच गणेशाचे तोंड हवे पण जेव्हा तुम्ही गणेशाची मूर्ती दुकानातून विकत आणाल तेव्हा त्या मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला आहे त्याची काळजी घ्या. नवसाचा गणपती एकाच वर्षे आणून चालतो का असे अनेक जण प्रश्न विचारतात नवसाला पावलेल्या गणपतीची सेवा वर्षानुवर्षे मनोभावे करायला हवी.

२) तुम्ही गणपती बाप्पाला जेव्हा दुकानातून घरी आणतात तेव्हा दारात गणेशाचे औक्षण करायला विसरू नका औक्षण करूनच गणपती बाप्पाच्या घरात प्रवेश होऊ द्यात. तसाच जी व्यक्ती गणपती बाप्पाला आणणारे तिने डोक्यावर टोपी घालायची सुद्धा लक्षात ठेवा बरं का .

३) ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतो ना म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करू नये. कारण चंद्र या दिवशी चंद्र दर्शन केल्यास एक वर्ष चोरीचा आळ येतो असे म्हणतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी जर चुकूनही चंद्राचे दर्शन झाले तर दोष परिहार अर्थ स्कंदपुराणात असलेल्या समंतकमनी या स्थानाचे वाचन किंवा श्रवण करावे. मित्रांनो आणखीन एक प्रश्न सहज विचारला जातो.

गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणल्यावर जर ती भंगली तिचं काही नुकसान झालं तर काय करावे त्या मूर्तीचे लगेच विसर्जन करून मनात कोणतीही शंका कुशंका काळजी विवंचना न ठेवता श्री गणेशाला प्रार्थना करून नवीन मूर्ती आणायला लावावी बऱ्याचदा असे सुद्धा घडते की गणेशाची घरात स्थापना झाल्यानंतर नातेवाईकांमध्ये एखादी अघटीत घटना घडते अशावेळी काय करावे हा प्रश्न पडतो.

मृत्यू ही एक नैसर्गिक गोष्ट आहे मात्र असं झाल्यास गुरुजींकडून किंवा आपल्या मित्रांकडून उत्तर पूजा लगेचच करून घेऊन गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. चिंता करू नये असे घडू शकते त्यामध्ये कोणाचाही दोष नसतो खूप मंडळींना असा सुद्धा प्रश्न पडतो की दरवर्षी गणेश मूर्ती आणून विसर्जन करण्यापेक्षा चांदीची सोन्याची किंवा पितळेच्या मूर्तीची पूजा गणेश चतुर्थीच्या दिवशी पुजा केली तर चालेल का?

तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करायचे असते त्यामुळे पार्थिव म्हणजेच मातीच्या मूर्तीची पूजा करणे अपेक्षित आहे. धातूची नाही आणि म्हणूनच भाद्रपद गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती आणावी तिची पूजा करावी आणि दहा दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतर जशी तुमच्या घरची पद्धत असेल त्याप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे.

मंडळी तुमच्या अशा अनेक शंकांचे निरसन ह्या माहिती द्वारे झालं असेल तरीसुद्धा गणपती बाप्पा बसवण्याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *