श्रावणात राशीनुसार महादेवांना करा प्रसन्न. राशीनुसार हे उपाय केले तर होतील महादेव प्रसन्न.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिन्यात भगवान शंकरांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे श्रावणाच्या सोमवारी भगवान शिव शंकराची आराधना केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतातच श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा करून श्रावणी सोमवारी उपवास करून भोलेनाथांना प्रसन्न केले जाते. याव्यतिरिक्त ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगितले जाते की प्रत्येक राशींच्या व्यक्तींनी त्या राशीनुसार भगवान महादेवाची विशेष पूजा करावी त्याचं सुद्धा योग्य फळ प्राप्त होतं असं म्हणतात.

तुम्हालाही त्या पूजेचा फळ लवकर हवं असेल भगवान शंकर प्रसन्न व्हावेत आणि आशीर्वाद देऊन प्रत्येक इच्छा पूर्ण करावी असे तुम्हाला हे वाटत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे तर प्रत्येक राशींच्या व्यक्तींनी आपापल्या राशीनुसार भगवान महादेवांचे उपासना करायचे आहे मग कोणत्या राशींच्या व्यक्तींनी श्रावण महिन्यात महादेवांचे पूजन उपासना कशी करायची कोणता मंत्र म्हणायचा हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

१) मेष रास:- मेष राशीच्या भाविकांनी भगवान महादेवांना लाल फुले अर्पण करावे आणि पाण्यात गूळ टाकून भगवान भोलेनाथांचा अभिषेक करावा. यासोबतच ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा.

२) वृषभ रास:- वृषभ राशींच्या व्यक्तींनी दही चंदन आणि पांढरी फुलं यांसह जल मिश्रित दूध अर्पण करावे. यासोबतच ऋषभ राशींच्या व्यक्तींनी अभिषेक करताना रुद्राष्टकाचे पठण करावे.

३) मिथुन रास:- मिथुन राशीच्या व्यक्तींनी भगवान महादेवांचा अभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावं यासोबतच ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप करावा.

४) कर्क रास:- कर्क राशींच्या व्यक्तींनी भगवान भोलेनाथांना शुद्ध तुपाचा अभिषेक करावा. आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी अक्षराचा मंत्राचा जप करत राहावं.

५) सिंह रास:- सिंह राशींच्या व्यक्तींनी शिवलिंगावर गुळमिश्रित पाणी अर्पण करून गहू अर्पण करावे याबरोबरच महादेवांच्या पिंडी समोर दिवा लावावा असे करणे खूप फायदेशीर ठरू शकते. असे सांगितले जाते.

६) कन्या राशि:- कन्या राशींच्या व्यक्तींनी भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी उसाच्या रसाचा अभिषेक करावा आणि पंचाक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

७) तुळ रास:- तुला राशि च्या व्यक्तींनी महादेवांना सुगंधी अत्तर किंवा सुगंधी पाण्याने अभिषेक करावा आणि दररोज भगवान महादेवांच्या सहस्त्रनामांचा करावा .

८) वृश्चिक रास:- वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी भगवान महादेवांना पंचामृताने अभिषेक राशीच्या व्यक्तींनी रुद्राष्टकाचे पठण करावे.

९) धनु रास:- धनु राशींच्या लोकांनी भगवान महादेवांना केशर युक्त दुधाने अभिषेक करावा. आणि बेलाची पाने आणि पिवळी फुले अर्पण करावीत. त्यानंतर पंचाक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

१०) मकर रास:- मकर राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर पाण्यात गहू मिसळून शिवपूजन करावे त्यांचा अभिषेक करावा आणि त्यानंतर पंचाक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

११) कुंभ रास:- कुंभ राशींच्या व्यक्तींनी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करावेत म्हणजेच शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि पूजा करावी शिवाय कुंभ राशींच्या व्यक्तींनी शिव चालीसा पठण करावे असे केल्याने सुद्धा लवकरात लवकर इच्छा पूर्ण होते.

१२) मीन रास:- मीन राशींच्या व्यक्तींनी शिवलिंगावर जलमिश्रित दूध आणि साखर यांचे मिठाई अर्पण करावी. आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा.

तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा आपापल्या राशीनुसार महादेवाची पूजा उपासना करू शकता त्यामुळे तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते. तुम्ही कधी तुमच्या राशीनुसार भगवान महादेवांचे उपासना केली आहे का हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *