३१ डिसेंबर पर्यंत गुरु वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? या राशीसाठी गुरुबळ, लाभ!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जर तुमच्यावर गुरुकृपा झाली ना तर तुमच्या कुंडलीत कितीही ग्रह भयानक बसलेले असू द्या. किंवा तुमच्या लाईफ मध्ये कितीही भयानक लोक असूद्या. कोणीही तुमचं काहीही वाकड करू शकत नाही असं ज्योतिष शास्त्र सांगत.

आणि अध्यात्म सुद्धा सांगत. म्हणजे त्याचं काय तुमचे दिवस कितीही वाईट चाललेले असू द्या तुमच्या आयुष्यात किती भयानक प्रसंग घडत असू द्या पण जर गुरुकृपा झाली तर दिवस असे पालटतात.

आणि मग आयुष्यात सुखच सुख येत. हे सगळं सांगायचं कारण एवढंच की हीच गुरुकृपा आता काही राशींवर होणार आहे. मग त्या राशींच्या आयुष्यात त्यांना आनंदी आनंद गडे पाहायला मिळणार आहे. पण कोणत्या राशी आणि गुरुकृपा व्हायला अस नक्की घडणार काय चला जाणून घेऊया.

मित्रांनो काही राशींवर अचानक गुरुकृपा होण्याचं काय कारण आहे ते आधी बघूया. त्याचं काय गुरू महाराज सध्या मेष राशीमध्ये आहेत. आणि याच मेष राशीमध्ये गुरू महाराज वक्री होणार आहेत. आणि या स्थितीमध्ये ते 31 डिसेंबर पर्यंत असणार आहेत. आणि त्यामुळेच काही राशींना त्याचा लाभ होणार आहे.

गुरुबळ आणि गुरुकृपा लाभल्यामुळे धनसंपत्ती मानसन्मान यात वाढ होऊ शकते. गुरु महाराज बुद्धिमत्ता धर्म प्रगती शिक्षण संतती ज्ञान समृद्धी या सगळ्याचे कारक आहेत. जर कुंडलीत गुरुचे स्थिती मजबूत असेल तर आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

कुंडलिक गुरुची स्थिती कमवत असेल तर व्यक्तीला समस्या समस्या बघायला मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीमध्ये गुरुच्या वक्री चलनाचा प्रभाव सर्वच राशींवर दिसून येणार आहे. देशाच्या दुनियेच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होणार आहे. आपण आपल्या राशीन पुरत बोलूया. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीच्या लोकांना गुरु महाराजांच्या कृपेने समस्यांमधून दिलासा मिळू शकतो. स्वतःच्या निर्णयावरील आत्म विश्वास वाढू शकेल. ज्यामुळे चांगला फायदा होईल. वडिलांचे तुमचा काही वाद सुरू आहे का? मतभेद आहेत का? ते सुद्धा कमी होतील या काळात अनेक अपूर्ण काम पूर्ण होऊ शकतात. अनावश्यक खर्चामुळे थोडा त्रास होईल बर का पण धार्मिक कार्यात तुम्ही व्यस्त रहाल. त्यामुळे मानसिक शांतता सुद्धा मिळेल.

वृषभ रास- वृषभ राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. मात्र तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. भावंडांसोबत तीर्थस्थळी जाण्याचा बेत आखाल. विद्यार्थ्यांना या काळात गुरूंच्या मदतीने शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. पण नात्यात प्रेम कायम राहील. खर्च आणि खर्चावर नियंत्रण याबाबत मात्र तुम्हाला योजना करावी लागेल.

मिथुन रास- परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इच्छा पूर्ण होतील. खाण्यापिण्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. अन्यथा समस्या वाढू शकतात. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात केलेल्या गुंतवणुकीचा आणि बहुतेक इच्छांचा काळजीपूर्वक विचार करा. सामाजिक वर्तुळ या काळात वाढेल. कोणी शत्रू आणि कोण मित्र हे नेमकं ओळखावे लागेल. कौटुंबिक जीवनात झालेल्या चुकांवर विचार करून सुधारण्याचा प्रयत्न करावा.

कर्क रास- भागीदारच काम करणाऱ्यांना व्यवसायात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे ठरेल. गुंतवणूक किंवा नफ्याबाबत भागीदाराशी मतभेद वाढू शकतात. ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरदारांचा प्रभाव या काळात चांगला वाढेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य ही मिळेल. वैवाहिक जीवनात झालेल्या चुकांकडे लक्ष द्या. त्या सुधारण्यासाठी सर्व तुपरी प्रयत्न करा. ज्ञान मिळवण्यावर भर राहील. गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल.

सिंह रास- वडिलांसोबत सिंह राशीच्या लोकांचे मतभेद होण्याची शक्यता आहे. परंतु परिस्थिती लवकरच मिळेल. इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेल्या समस्यांपासून सुद्धा दिलासा मिळेल. सिंह राशीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना काहीतरी चांगली बातमी मिळेल. गुरुच्या प्रभावाने शांतता सुद्धा लाभेल. कन्या रास लोकदारांचे वरिष्ठांची काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात.

कनया रास- कन्या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातोय. अन्यथा अडचणी वाढू शकतात. वैवाहिक जीवनात काही अडचण असेल. तर या काळात घरातील वडिलारांच्या मदतीने अडथळे दूर करा. मन प्रसन्न राहील भावंडांचा सहकार्य लाभेल. अनेक तुमची सुद्धा अडलेली काम पूर्ण होतील.

तुळ रास- तुळ राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना या काळात काहीतरी नवीन शिकायला मिळेल.अभ्यासात रस निर्माण होईल. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी गुरूंचा वक्रीचलन शुभ आणि फलदायी सिद्ध होईल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक स्थिती मजबूत असेल.

वृश्चिक रास- वैवाहिक जीवन चांगल असेल या काळात जोडीदाराचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकेल. या काळात वृश्चिक राशीचे जे लोक प्रेम जीवनात आहेत त्यांना लग्न करायचा आहे. अशांनी एकदा त्यांच्या निर्णयाचा पूर्ण विचार करावा. तसेच तब्येतीची पूर्ण काळजी घ्यावी. घरातील कामांची जबाबदारी घ्या. सासरच्यांशी संबंध दृढ राहतील. आणि मदतही तुम्ही त्यांना करू शकाल.

धनु रास- कुठेही मोठी गुंतवणूक करणे सध्यातरी टाळाव. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणूक करायची असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या. घर घेण्याचा विचार किंवा घर बांधण्याचा विचार करत असाल तर एकदा बजेट कडे लक्ष द्या.

नोकरदारांचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून दाखवतील नोकरदार मंडळी. अधिकाऱ्यांचा त्यासाठी त्यांना चांगलं सहकार्य मिळेल. संपूर्ण कुटुंबासह बाहेरगावी फिरायला जाण्याचा बेत तुम्ही असू शकाल.

मकर रास- जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरण मतभेद होऊ शकतात. या काळात आपल्या कामावर विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांसाठी गुरुचे बकरी चलन शुभ राहील. ज्यांना परदेशात जाऊन उच्चशिक्षण घ्यायचा आहे त्यांनाही या गोष्टीसाठी यश मिळेल.

कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांनी ना आरोग्याच्या बाबतीत दाखल राहून चालणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावे. मन धर्म आणि उपासनेच्या कार्यात गुंतून जाईल. प्रार्थना केल्याने मानसिक शांती ही मिळेल. व्यवसायात या काळात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकत. या काळात कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आराम मिळेल. पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळेल.

मीन रास- मीन राशीच्या लोकांनी बचतीवर लक्ष द्यायचे. कारण अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जबाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा तरच यश मिळेल. भावंडांसोबत काही बाबींवर मतभेद वाढू शकतात. वाटाघाटीने प्रकरण मिटवा.

अन्यथा नात्यात तीव्र दुरावा येऊ शकतो. जी काम पैशामुळे अडकली होती ती या काळात पूर्ण होऊ शकते. पण मीन राशीसाठी महत्त्वाचं काय आहे हे सगळं जरी असलं तरीसुद्धा या काळात त्यांचं मन प्रसन्न राहील. आणि मन प्रसन्न असेल तर माणसाला अजून काय पाहिजे नाही का.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *