Chandrayaan-3 चे यशस्वी लँडिंग ज्योतिषशास्त्रात चंद्राचे काय महत्त्व आहे..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

भारताचा चंद्रयान तीन हे चंद्रावर उतरल आणि एक नवाज इतिहास रचला गेला. संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागल होत. भारतीयांच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढत होते. चंद्रयान २३ ऑगस्टला संध्याकाळी यशस्वीपणे चंद्रावर उतरल आणि भारतीयांनी आनंद उत्सव साजरा केला. भारतासाठी चंद्रयान मोहीम जितकी महत्त्वाची होती.

त्याहीपेक्षा काही पटीने अधिक महत्त्व चंद्राच मानवी जीवनात आहे. मानवी जीवनावर चंद्राचा परिणाम कसा होतो? मानवी मनावर चंद्र कसा राज्य करतो चंद्राचं ज्योतिष शास्त्रात चंद्राचे काय महत्त्व आहे? चंद्रावरून आपण कोण कोणत्या गोष्टी ओळखू शकतो चला जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे. का की ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र मानवी मनाचा कार्यक्रम आहे आणि चंद्रामुळेच आपला जन्म होत असतो. कारण मानवी मन आणि मनातल्या कामना मानवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतात आणि चंद्र हा मनावर राज्य करतो मानवी मनाची चंचलताच चंद्र असतो.

पुराणांमध्ये चंद्राला महर्षीत्री आणि अनुसूया यांचा पुत्र मानण्यात आला आहे. तसच चंद्राला बुधाचा पिताही म्हटला जात. चंद्राला दोन भाऊ आहेत जे दुर्वासा आणि दत्तात्रेय म्हणून ओळखले जातात. भगवान ब्रह्मदेवाने चंद्रदेवांना नक्षत्र ब्राह्मण तपश्चर्या आणि वनस्पती यांचा स्वामी म्हणून नियुक्त केल. चंद्राचा विवाह दक्ष प्रजापतीच्या नक्षत्रांच्या स्वरूपातल्या सत्तावीस मुलींची झाला.

त्यांच्यापासून अनेक प्रतिभावांत पुत्र चंद्राला झाले. दक्ष प्रजापतीच्या या मुलींना २७ नक्षत्र म्हणतात आणि २७ नक्षत्रांच्या भोगाने एक चंद्र महिना पूर्ण होतो. वैदिक ज्योतिष शास्त्रात चंद्राला खूप महत्त्व आहे आणि चंद्र हा श्री ग्रह मानला जातो. मन भौतिक वस्तू प्रवास सुख शांती धनसंपत्ती रक्त डावा डोळा माता धन छाती इत्यादीचा कार्यक्रम चंद्र आहे.

चंद्र कर्क राशीचा स्वामी असून रोहिणी हस्त आणि श्रवण नक्षत्रांचा स्वामी आहे. इतर देशांमध्ये तो उत्तर पश्चिम दिशेचा स्वामी आहे. चंद्र हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात लहान असू शकतो. परंतु त्याचा वेग सर्वात वेगवान आहे. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो आणि नंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. असही सांगितल जात की, सत्तावीस बायकांपैकी चंद्रदेव रोहिणीवर सर्वात जास्त प्रेम करायचे.

चंद्र रोहिणीच्या प्रेमात इतका पडला की इतर २६ बायका चंद्रदेवांवर नाराज झाल्या आणि त्यांनी त्यांचे वडील दक्ष प्रजापती यांच्याकडे तशी तक्रार केली. मुलींना दुखी पाहून दक्षाने चंद्रदेवांना शाप दिला. त्यामुळे तो क्षयरोगाचा बळी झाला. शापामुळे चंद्राची चमक नाहीशी झाली त्याचा वाईट परिणाम पृथ्वीवरच्या सृष्टीवर होऊ लागला.

पौराणिकतेनुसार शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी चंद्रदेव भगवान विष्णूंना शरण गेले. आणि भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार चंद्रदेव प्रभास तिर्थावर गेले १०८ वेळा त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि त्यानंतर भगवान जीवाच्या कृपेने चंद्रशेपातून मुक्त झाले. आज हे ठिकाण सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल जात.

आता बघूयात की चंद्राचा मानवावर प्रभाव कसा पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्र बलवान असतो ती व्यक्ती दिसायला आकर्षक सुंदर आणि स्वभावाने धैर्यवान असते. शांत असते. चंद्राच्या प्रभावाखाली एखाद्या व्यक्तीला प्रवासात रस असू शकतो. तसंच व्यक्ती जेव्हा खूप अस्वस्थ होते तुमच्या आयुष्यात खूप मनस्ताप खूप अस्वस्थता तुम्हाला ग्रासून टाकते तेव्हा मात्र तुम्हाला चंद्रासंदर्भातले उपाय करायला सांगितले जातात.

कारण मन अस्वस्थ म्हणजे कुंडलीतली चंद्राची स्थिती खराब आहे हे ओळखल जात. चंद्र मनावर परिणाम करतो ज्यांचा चंद्र मजबूत असतो. त्यांची कल्पनाशक्ती सुद्धा मजबूत असते. भावनिक आणि संवेदनशील सुद्धा असतात. ज्यांच्या कुंडलीत चंद्र मजबूत स्थितीमध्ये असतो अशा व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक परिणाम बघायला मिळतो. अशा व्यक्ती मनाने खंबीर असतात त्या सहजासहजी विचलित होत नाही.

त्यांचा चंद्र चांगला असतो त्यांचे आईबरोबरचे संबंध चांगले असतात कारण चंद्र हा आईचा सुद्धा कारक ग्रह आहे. कारण चंद्र म्हणजे मन मन म्हणजे भावना आणि भावना म्हणजे आई म्हणून ज्यांचा चंद्र खराब आहे त्यांना मोती वापरण्याचा सल्ला दिला जातो. कारण मोती हा चंद्राशी संबंधित आहे. चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीत खराब असेल तर आवर्जून मोती वापरायला सांगितला जातो.

इतकाच नाही मानसिक त्रासातून तुम्ही जात असाल तर तुम्हाला मोती परिधान करायला सांगितला जातो. चांदी सुद्धा चंद्राची कारक आहे. म्हणूनच तर ज्यांच मन चंचल असत कुठेही एका ठिकाणी लागत नाही. त्यांना चांदीच्या ग्लासात न पाणी प्यायला सांगितल जात.

चंद्र म्हणजेच मानवी मनाच्या कामना इच्छा आकांक्षा आणि वासना आणि याच वासने पोटी तर मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. म्हणूनच तर ईश्वरी मार्गावर चालणाऱ्यांना मनावर विजय मिळवावा लागतो. अर्थात चंद्र मजबूत करावा लागतो.

अनेक मनोरुगडांच्या कुंडलिक चंद्र कमकुवत असल्याच पाहिला गेलेय.पण चंद्राला मजबूत कस करायच. चंद्राला मजबूत करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक उपाय म्हणजे महादेवांची सेवा करायची महादेवांच्या पिढीवर नित्य जलाभिषेक करायचा त्यामुळे आपला चंद्र शांत होतो आणि मजबूत होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *